आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Isreal Software Pegasus Spyware Controversy; Siddarth Varadrajan | The Wire Founder Exclusive Interview To Dainik Bhaskar

एक्सक्लूसिव्ह मुलाखत:भारत सरकारकडून हेरगिरी केली जात नाही तर मग यात नेमका कुणाचा हात? पीएम नरेंद्र मोदींनी याची चौकशी करायला हवी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: संध्या द्विवेदी
  • कॉपी लिंक

भारतात पेगासस प्रोजेक्ट अर्थात एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार, नेते आणि न्यायाधीशांसह महत्वाच्या व्यक्तींची हेरगिरी केली जात आहे. एमनेस्टी संस्था आणि फ्रान्सच्या मीडिया कंपनीला मिळालेला डेटा जगभरातील 16 माध्यम संस्थांना देण्यात आला आहे. भारतात ही माहिती 'द वायर' या न्यूज पोर्टलला डेटा देण्यात आला आहे.

द वायरने रविवारी रात्री हेरगिरीवर धक्कादायक बातमी जारी केली. यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांसह मोठ्या लोकांची यादी आहे. यादीत द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावांचा देखील समावेश आहे. हेरगिरी होणाऱ्यांच्या यादीत आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे नाव पाहून वरदराजन यांनाही धक्का बसला. यासंदर्भात दिव्य मराठीने विचारलेल्या काही प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली आहेत.​​​​​​​

प्रश्न- पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी होत असल्याचा अहवाल तुम्हाला मिळाला कसा?
हा काही अहवाल नाही. फोन क्रमांक असलेला एक डेटाबेस आहे. फ्रान्स मीडिया फॉरबिडन स्टोरीजने हा डेटा मिळवला. त्याची माहिती आणि यादी 16 माध्यम समूहांना देण्यात आली. द वायर त्यापैकीच एक आहे.

प्रश्न- हा डेटा पब्लिश करण्यासाठी तुम्ही कोणती तयारी केली होती?
ज्या-ज्या माध्यम समूहांना ही आकडेवारी मिळाली. त्यांनी एकत्र येऊन आकडेवारीची सत्यता तपासून पाहण्याचे काम केले. ज्या लोकांचे फोन क्रमांक यात समाविष्ट होते, त्यांच्याशी बातचीत करण्यात आली. आम्ही त्यांच्या मोबाईल, कम्युनिकेशन इंस्ट्रुमेंट्सची न्यायवैद्यक तपासणी करण्याचा प्रयत्न देखील केला.

प्रश्न- आकडेवारी समोर येण्यापूर्वी तुम्हाला असे वाटले की आपल्यावर पाळत ठेवणे किंवा हेरगिरी केली जात आहे?
होय, खूप दिवसांपासून वाटत होते माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझ्या फोनची हेरगिरी केली जात आहे. पण, असे विचार करण्यात आणि ते सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधून काढण्यात मोठा फरक असतो. अर्थातच आधीपासूनच वाटत होते पण, आता तांत्रिक पुरावा मिळाल्यानंतर धक्का बसला आहे.

प्रश्न- केवळ पत्रकारांची हेरगिरी का? त्यातही फक्त 40 पत्रकार आणि तुम्ही का?
पत्रकारांची हेरगिरी करणे हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. याचा हेतू काही ठराविक बातम्या तपासणे किंवा त्या पब्लिश होण्यापासून रोखणे असा आहे. आमच्याकडे 40 लोकांची यादी आहे. पण, निश्चितच ही यादी यापेक्षा मोठी असणार आहे.

प्रश्न- सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे का?
पेगासस हे सॉफ्टवेअर केवळ सरकारांनाच विकल्या जाते. भारत सरकारने आपण पेगासस वापरत नाही असे म्हटलेच नाही. त्यामुळे, भारत सरकार पेगाससचा वापर पत्रकार, विरोधीपक्षाचे नेते आणि इतरांवर हेरगिरीसाठी करत आहे असा तर्क लावता येईल.

परंतु, भारतातील या लोकांची हेरगिरी दुसऱ्या देशाकडून केली जात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची चौकशी करावी. नेमत्या कोणत्या देशातले सरकार भारतातील नेते, मंत्री, न्यायाधीश आणि निवडणूक आयुक्तांसह पत्रकारांची हेरगिरी करत आहे. याची चौकशी नक्कीच व्हायला हवी.

प्रश्न- इतर प्रोफेशनल्स किंवा संस्थांच्या फोन संभाषणांची हेरगिरी केली जात आहे का?
या आठवड्यात आम्ही रोज नवीन माहिती जारी करणार आहोत. विविध भागांमध्ये हा डेटाबेस सर्वांसमोर आणला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...