आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • It Is Because Of Indian Family Values That I Have Become Known As An Indian Australian Woman ... I Am Very Proud Of Her: Maria

दिव्य मराठी विशेष:भारतीय कौटुंबिक मूल्यांमुळेच माझी ओळख भारतीय-ऑस्ट्रेलियन महिला अशी झालीय... मला त्याचा खूप अभिमान वाटतो : मारिया

अमित चाैधरी | मेलबर्न9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई-वडील भारतीय... ‘मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया’ मारिया थट्टीलशी विशेष चर्चा

७ वर्षीय मारिया थट्टीलने व्हर्च्युअली आयोजित मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया स्पर्धा जिंकली आहे. ती २०२१ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करेल.

मारियाची आई कोलकात्याची, तर वडील केरळचे आहेत. मारिया यशस्वी मॉडेल, मेकअप आर्टिस्ट, फॅशन स्टायलिस्टही आहे. भारतीय मूल्यांनीच माझी ओळख भारतीय-ऑस्ट्रेलियन महिला अशी बनवली आहे, असे तिचे मत आहे.

> तुझ्या भारतीय कनेक्शनबाबत काही सांग. ऑस्ट्रेलियाला केव्हा आली?

माझी आई कोलकात्याची, तर वडील केरळचे. भारतात विवाह झाल्यानंतर दोघे ९० च्या दशकाच्या सुरुवातीला मेलबर्नला आले होते. त्यानंतर माझा जन्म झाला. भारतीय वातावरणासोबतच पाश्चात्त्य संस्कृती अंगीकारण्याची पूर्ण सूट मला आई-वडिलांनी दिली होती.

> भारताशी संबंधित काही आठवणी ? भारताला अखेरची भेट केव्हा दिली?

२००१ मध्ये मी जेव्हा ८ वर्षांची होते तेव्हा कुटुंबासोबत प्रथम भारतात गेले होते. उत्कृष्ट जेवण आणि केरळमध्ये वडिलांच्या कुटुंबाशी भेट एखाद्या सरप्राइजपेक्षा कमी नव्हते. हे दोन संस्कृतींचे मिलन होते. त्यानंतर मी भारतात जाऊ शकले नाही. मला या वर्षी केरळला जायचे होते, पण कोरोनामुळे प्रवास टाळावा लागला.

> भारताशी जोडलेलो आहोत हे तुला कशावरून वाटते?

बालपणी माझ्या कुटुंबाचे खाणेपिणे, कपडे आणि संस्कृती ऑस्ट्रेलियन समाजापेक्षा वेगळी होती. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत मी सेल्फ रिजेक्शनच्या काळातून जात होते. पाश्चिमात्य समाजात मिसळून जाण्यासाठी भारतीय संस्कृतीचा त्याग करण्याची इच्छा होती. पण हा विचार चुकीचा आहे, असे आता वाटत आहे. माझी ओळख आता एक भारतीय-ऑस्ट्रेलियन महिला अशी आहे. तीत पूर्व-पश्चिम अशा दोन्ही संस्कृतींचा समावेश आहे.

> तुला कधी रंगभेद-लिंगभेदाचा सामना करावा लागला का?

मीही लिंगभेद-रंगभेद यांचा सामना केला आहे. मी माझे अनुभव इन्स्टाग्रामवर, ‘माइंड विथ मी’ या टीव्ही मालिकेत मांडले आहेत. मी या सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि सकारात्मकतेसह त्यांचा सामना केला.

बातम्या आणखी आहेत...