आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा तपास करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांवर पदाच्या गैरवापराचा आरोप लागला आहे. ईडीचे अधिकारी राहुल वर्मा यांनी दोन अभिनेत्रींची चौकशी करताना त्यांच्यावर दबाव आणला. तसेच बळजबरी दोन मुलींचे इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करण्यास भाग पाडले. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फातेही अशी या अभिनेत्रींची नावे आहेत.
सुकेश प्रकरणाचा तपास करताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही अभिनेत्रींनी वेग-वेगळ्या वेळा देऊन चौकशीसाठी बोलावले होते. त्याच दरम्यान या दोघींची चौकशी राहुल वर्मा नामक अधिकारी करत होता. याचवेळी ईडीच्या कार्यालयात दोन इतर तरुणी सुद्धा होत्या. या दोन्ही मुली ईडी अधिकारी राहुल वर्माच्या जवळच्या होत्या. मोनिका पांडे आणि अनामिका पांडे अशी या मुलींची नावे आहेत.
भास्करला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्याने सुरुवातीला या दोन्ही अभिनेत्रींसोबत फोटो काढले. या फोटोंमध्ये आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुद्धा सामावून घेतले. यानंतर जॅकलीन आणि नोरा फातेही या दोघींवर दबाव आणून त्यांना मोनिका आणि अनामिका यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करण्यास सांगितले. अभिनेत्रींनी त्यावेळी तसे केले. परंतु, नंतर मात्र त्या दोघींना अनफॉलो केले.
आरोपांवर काय म्हणाले राहुल वर्मा
याच प्रकरणी दिल्लीतील एक वकील विक्रम चौहान यांनी ट्विट करून PMO, गृहमंत्री आणि ED यांना टॅग केले. त्यांनी संबंधित ईडी अधिकाऱ्याचे नाव लिहून पदाच्या गैरवापराचा आरोप केला. तसेच अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या आरोपांची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यावर राहुल वर्मा यांना जाब विचारण्यात आला. त्यावर बोलताना, आपल्याला यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले.
प्रसिद्ध आयटी एक्सपर्ट पवन दुग्गल यांच्या मते, राहुल वर्मा यांनी असे केले असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. देशातील कुठलीही तपास संस्था चौकशीच्या नावे असे करूच शकत नाही. सोबतच, या आरोपांमध्ये तथ्य किती आहे याचा देखील तपास केला जाऊ शकतो. देशातील तपास संस्था याचा शोध घेऊ शकतात.
आम्ही यासंदर्भात नोरा फातेही आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.
सुकेश प्रकरणात का चर्चेत आल्या नोरा, जॅकलीन?
अंमबजावणी संचलनालयाच्या (ईडी) माहितीनुसार सुकेश आणि जॅकलीन यांच्यात जानेवारी 2021 पासून संपर्क सुरू झाला. त्यावेळी सुकेश तिहाड जेलमध्ये होता आणि तुरुंगातूनच सुकेश जॅकलीनला फोनवर बोलायचा. या दरम्यान त्याने जॅकलीनला कोट्यधी रुपयांचे गिफ्ट पाठवले होते असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. यामध्ये 52 लाखांचा एक अरेबियन घोडा, 9-9 लाख रुपयांच्या पर्शियन मांजरी, डायमंड सेट्स अशा भेटवस्तूंचा समावेश होता.
सुकेशने जॅकलीनसाठी फ्लाइट सुद्धा बुक करून दिल्या होत्या. यासोबत जॅकलीनच्या भावासोबत सुद्धा त्याने आर्थिक व्यवहार केला होता. आपण जॅकलीनसोबत रिलेशनशिपमध्ये होतो असा दावा सुकेशने केला आहे.
यासोबतच सुकेशने नोरा फातेहीला सुद्धा अनेक भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने नोराला एक BMW कार आणि आयफोन गिफ्ट केला होता असा दावा करण्यात आला आहे. यावरूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोरा आणि जॅकलीन यांना चौकशीसाठी बोलावले होते.
200 कोटी हवाला प्रकरण काय?
तिहाडच्या तुरुंगात असतानाच सुकेशने रॅनबॅक्सीचे माजी प्रोमोटर शिविंदर सिंह आणि मालविंदर सिंह यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सुकेशने त्या दोघांच्या पत्न्यांडून 200 कोटी रुपये वसूल केले होते. तो स्वतःला पीएमओचा अधिकारी तर कधी गृहमंत्रालयाचा अधिकारी म्हणवून घ्यायचा. त्याच्या या फसवणुकीमध्ये तिहाडच्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केल्याचा आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.