आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Japan Longevity Secrets Formula; What Country Has The Most 100 Year Olds? India Israel And United States

भास्कर इंडेप्थ:जपानमध्ये विक्रमी 86 हजार लोकांनी ओलांडली वयाची शंभरी​​​​​​​, त्यापैकी 88% महिला; जाणून घ्या शतायू होण्यासाठी जपानी लोक काय करतात

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाचा सविस्तर..

वयाची 100 वर्षे पूर्ण करणा-या अशा किती लोकांना तुम्ही ओळखता? खूप विचार केल्यावरही तुम्हाला फक्त काहीच नावे आठवली असतील, नाही का? फारशी नावे आठवणार देखील नाहीत. कारण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात अशा लोकांची संख्या फक्त 27 हजार आहे. वयाची शंभरी ओलांडणारे सर्वाधिक लोक हे जपानमध्ये आहे. याबाबतीत जपान जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

जपानच्या कल्याण मंत्रालयाने 14 सप्टेंबर रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार जपानमध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या लोकांची संख्या 86 हजार ओलांडली आहे. यापैकी 88% महिला आहेत.

जपानच्या शिमाना राज्यात प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक 134.7 लोकांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. त्यापाठोपाठ कोची आहे, ज्याची सरासरी 126.2 आहे. कगोशिमा राज्यात दर 1 लाख लोकांमागे 118.7 लोक शतायू आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात की जगातील इतर देशांमध्ये किती लोक 100 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत? जपान, दक्षिण कोरिया, इटली सारख्या देशांमध्ये दीर्घायुष्याची रहस्य काय आहे? जपानी लोक दीर्घायुष्यासाठी काय करतात?

6 असे देश जिथे लोक 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जगतात
कोस्टारिकातील निकोया, इटलीतील सार्डिनिया, यूनानमधील इकारिया, जपानमधील ओकिनावा, अमेरिकेतील लोम्बा लिंडा, ग्रीसमधील इकारिया. जगातील या 6 क्षेत्रांना 'ब्लू झोन' म्हणतात. येथे राहणारे लोक वयाची 100 वर्षे पूर्ण करत असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र यामागे कोणतेही एक कारण नाही.

ब्लू झोनवर अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येथील लोक फळे आणि भाज्या भरपूर खातात. शरीराला नियमितपणे सक्रिय ठेवतात. या भागात नैसर्गिक सौंदर्य आहे आणि येथील लोक कठीण काळात अध्यात्माचा आश्रय घेतात.

वेगवेगळ्या अभ्यासातून दीर्घायुष्याचे रहस्य काय समोर आले?

 • इटलीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे सांगितले गेले की, ज्या लोकांनी वयाची 100 वर्षे ओलांडली आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त आहे. मात्र इतर अनेक अभ्यासाचे निष्कर्ष विरोधाभासी आहेत.
 • पोलंड आणि डेन्मार्कमधील अभ्यासात असे दिसून आले आहे की, 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लाल रक्तपेशींमध्ये ग्लूटाथिओन रिडक्टेजचे अधिक प्रमाणातआढळले.
 • बोस्टन विद्यापीठाच्या थॉमस टी पर्ल्स यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व लोकांमध्ये मिसळते. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने मित्र आहेत आणि ते नातेवाईकांना देखील ते खूप उत्साहाने भेटतात.

जपानी लोक दीर्घायुष्यासाठी काय करतात?

 • जपानमधील लोकांच्या दीर्घायुष्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जनुक. या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये पाच प्रमुख घटक समोर आले आहेत, जे जपानी लोकांना दीर्घायुषी करण्यात मोठी भूमिका बजावतात.
 • जपानी लोकांच्या आहारात धान्य, मासे आणि भाज्या मोठ्या प्रमाणात असतात. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांवर त्यांचा भर कमी असतो.
 • जपानी लोक फार तणावाचे जीवन जगत नाहीत. ते एकमेकांना मदत करणारे असतात.
 • जपानी ही एक केअरिंग कम्युनिटी आहे. येथे वृद्धांना एकटे सोडले जात नाही. त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
 • जपानमधील लोक इतर देशांपेक्षा जास्त वयापर्यंत काम करतात. याशिवाय ते चालणे आणि बागकाम यासारख्या उपक्रमांवर देखील भर देतात.
 • जपानचे लोक अध्यात्मावर विश्वास ठेवतात आणि कठीण काळात देवाला प्रार्थना करतात. यामुळे त्यांचा ताण कमी होतो.

जपानमध्ये सर्वाधिक लोक शतायू असण्याबाबत 2010 मध्ये प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. जपानमध्ये हजारो वृद्ध बेपत्ता असल्याचे अनेक अहवालांमध्ये उघड झाले होते. अनेकशतायू लोकांचा मृत्यू नोंदवला गेलेला नाही. जुलै 2010 मध्ये, 111 वर्षीय सोगेन कातोबद्दल समजले होते, त्याचा 30 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा सांगाडा त्याच्या घराच्या बेडवर सापडला होता. छोटे-मोठे वाद असूनही, सत्य हेच आहे की जपानी लोक सर्वात जास्त काळ जगतात. म्हणून जर आपल्यालाही 'जिवेत शरद: शतम'चा आशीर्वाद प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी जपानी लोकांकडून शिकण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...