आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यूबहुपत्नित्व समानतेविरोधात:जावेद अख्तर म्हणाले- नवरा अनेक बायका ठेवतो, मग स्त्रीलाही अधिकार हवा

लेखक: अलीम बज्मी आणि वैभव पळनीटकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावेद अख्तर, गीत-गझल आणि शायरीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्यांचे लिखाण जितके ह्रदयाला भिडणारे असते, तितकेच ते सामाजिक मुद्द्यांवर परखड असतात. जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर एक नवीन पुस्तक आले आहे. नाव आहे - 'जादूनामा'. वास्तविक जादू हे जावेद अख्तर यांचे बालपणीचे नाव आहे. हे नाव त्यांचे वडील जाँ निसार अख्तर यांनी आपल्याच एक कवितेतून घेतले होते.

'जादूनामा'च्या निमित्ताने दिव्य मराठीने जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधला. यावेळी अख्तर यांनी भारतातील राजकारण, समान नागरी कायदा, जीवन, शायरी, चित्रपट जगतातील ओटीटीच्या एन्ट्रीसह अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

अख्तर यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून मुस्लीम पर्सनल लॉवरही भाष्य केले. मुस्लीम पर्सन लॉमध्ये बहुपत्नीत्वाला मुभा आहे. हे समानतेविरोधात आहे. जर पतीला अनेक पत्नी करण्याची मुभा आहे, तर पत्नीलाही हा अधिकार असायला हवा. एकापेक्षा जास्त विवाह आपल्या कायद्याच्या विरोधात आहे. जर कुणाला स्वतःच्या सवलती कायम ठेवायच्या असतील तर बिनदिक्ततपणे ठेवाव्या. पण घटनेशी कसलीही तडजोड कदापि मान्य होणार नाही.

'मी आधीपासूनच समान नागरी कायद्याचे पालन करत आहे. मी माझा मुलगा आणि मुलीला संपत्तीत समान वाटा देणार आहे. मुस्लीम पर्सनल लॉनुसार तलाक झाल्यावर 4 महिन्यांच्या नंतर पती पत्नीला पोटगी देण्यास जबाबदार नसतो. हे चूकीचे आहे.' असे अख्तर म्हणाले.

समान नागरी कायद्याला मुद्दा बनवणाऱ्यांनी सांगावे, त्यांना हे मान्य आहे का?

'जे लोक समान नागरी कायद्यावर बोलत आहेत, ते आपल्या बहीण-मुलींना संपत्तीत समान वाटा देणार आहेत का? याचे उत्तर मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे. सर्वात आधी समान नागरी कायद्याचा मसूदा आला पाहिजे. भारतासारख्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात कायदा एकसमान असू शकतो का? हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे. जर कुणाचे पर्सनल लॉ असतील तर असावे. पण पर्सनल लॉ आणि घटनेपैकी एकाची निवड करायची असेल तर मी घटनेची निवड करेन.' असे अख्तर म्हणाले.

'समाजात वेगळाच तणाव. हा निर्माण झाला नाही. तो निर्माण करण्यात आलाय.'

देशात द्वेषाचे वातावरण तयार झाल्याविषयीच्या प्रश्नावर अख्तर म्हणाले - 'मला वाटते की समाजात एक वेगळाच तणाव आहे. हा तणाव निर्माण झालेला नाही. तो निर्माण करण्यात आला आहे. तो कायम ठेवण्यासाठी माध्यमेही हातभार लावतात.'

'जर तुम्ही एखाद्या भारतीयाचा डीएनए तपासला तर कळेल की 8-10 पिढ्यांच्या पूर्वी आपल्या सर्वांचे पूर्वज हे शेतकरीच होते. शेतकरी नेहमी मध्यमार्गी असतात. ते कधीही एक्स्ट्रिम नसतात. कोणत्याही बाजूची गोष्ट असली तर तो मध्यभागीच राहतो.'

टुकडे-टुकडे गँग, अँटी नॅशनल, अर्बन नक्षलींसारख्या उपमांच्या वाढत्या वापरावर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, 'जर तुम्ही सरकारविरोधात आहात, तर तुम्ही गद्दार आहात? हे पूर्णपणे चूकीचे आहे. 2014 पूर्वीही सरकार होते. सरकारे येतात आणि जातात. विरोधी पक्ष नेहमी सरकारविरोधात बोलतो. त्यांचे हेच तर काम आहे.'

'भाषेची मर्यादा आणि संस्कार टिकून रहावे'

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. म्हणाले - 'जेव्हा एक राजकीय पक्ष पदयात्रा करतो तेव्हा दुसरा पक्ष त्याला विरोधच करणार. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिका आहे. पण भाषेची मर्यादा आणि संस्कार या गोष्टीही असतात. त्याही पाळल्या गेल्या पाहिजे.'

'हे तर विचारावेच लागेल की, कितने आदमी थे'

आपल्या 77 वर्षांच्या जीवन प्रवासाविषयी बोलताना भावूक होण्याऐवजी ते म्हणतात की, 'हे वास्तव आहे की, मी 77 वर्षांचा म्हातारा झालो आहे. हेच सत्य आहे. माझ्या जीवनात जितक्या लोकांशी माझा संपर्क आला, भाऊ, मित्र, कुटुंब, निर्माते, व्यावसायिक त्या सर्वांचे मिळून 'जादूनामा' हे पुस्तक बनले आहे.'

चित्रपटाच्या संवाद लेखकाच्या भाषेत या पुस्तकाविषयी काय सांगाल असे विचारल्यावर म्हणाले की, 'मला हे पुस्तक एका व्यक्तीचे वाटत नाही. मला विचारावे लागेल की, कितने आदमी थे'

काही लिहिणे बाकी आहे असे तुम्हाला वाटते की आता काही अपेक्षा उरल्या नाही? असा प्रश्न विचारल्यावर म्हणाले की, अनेकदा मला वाटते की मी खूप काही लिहू शकत होतो. खूप काही माझ्या आत आहे. मात्र ते कागदावर उतरवण्याच्या शोधात मी आहे.

'भाषा ही वाहणारी नदी आहे, त्याचा नाला होऊ नये याची काळजी घ्या'

नव्या पिढीच्या शायरी, जीवन आणि विचारांवर बोलताना अख्तर साहेब अतिशय पुरोगामी वाटतात. म्हणतात - '50 वर्षांपूर्वी लोक म्हणायचे की आधी जे होते, ती गोष्ट आता राहिली नाही. आजही म्हातारे लोक असेच बोलतात. सत्य तर हेच आहे की, भाषा ही वाहती नदी आहे. ती थांबत नाही. त्यात अनेक धारा मिसळत राहतात.'

बोलताना जेव्हा अल्फाज हा शब्द आम्ही वापरला तेव्हा ते म्हणाले की अल्फाज हा शब्द चूकीचा आहे. हे लफ्जचे बहुवचन आहे. ही वाहती नदी अशा शब्दांनी नाला बनू नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

अलिकडील काळात चित्रपटांतून स्टार तयार होत नाही आणि बॉक्स ऑफिसवर कलेक्शनची धूम नसल्यावर बोलताना ते म्हणाले की - 'निर्मात्याच्या भूमिकेतून ते या नव्या बदलांमुळे त्रस्त आहेत. बॉलीवूडमध्ये नव्या कथा येत नाही हे यामागील कारण असल्याचे ते म्हणाले. जास्त हिट चित्रपट हे एक तर रिमेक आहेत किंवा दक्षिणेतील चित्रपट आहेत. बॉलीवूडला नव्या कथा शोधाव्या लागतील' असे ते म्हणाले.

ओटीटी कन्टेन्टचा उल्लेख आल्यावर ते उत्साही झाले आणि म्हणाले, मला स्वतःला ओटीटी कन्टेन्ट आवडतो. पाताल लोक, सॅक्रेड गेम्स, मिर्झापूर मला खूप आवडले. मात्र कुटुंब, संसार अशा विषयांवर चित्रट बनायचे. तीच कथा घरांमध्ये सांगितली जात आहे. आता ओटीटीने एक मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे ओढला आहे. ओटीटीवर खूप मजबूत आणि वास्तववादी कन्टेन्ट तयार होत आहे.

'जगातील सर्वात मोठ्या सत्यावर चर्चा केली जाऊ शकत नाही'

नास्तिक असताना धार्मिक लोकांसोबतचे संबंध तुम्ही कसे जोपासता? या प्रश्नावर ते म्हणाले - 'हे खूप सोपे काम आहे. दोन वेगळ्या धर्माचे व्यक्ती एकमेकांसोबत कसे राहतात. आपल्याला काही अडचण नाही. आपले एकमेकांसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद असतात. आपसांत असहमती असूनही आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. कधी हा मुद्दा उपस्थित झाला तर त्यावर बोलले पाहिजे. स्वतःहून शक्य होईल तितका उल्लेख न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'

'आज भोपाळ पाहून आनंद वाटतो'

ज्या भोपाळमध्ये तुम्ही वेळ घालवला, त्यात आणि आज काय फरक दिसतो? या प्रश्नावर ते म्हणतात - 'भोपाळला जातो तर पाहून आनंद होतो. आता किती चांगले शहर झाले आहे. वास्तविक, भोपाळ आधीपासूनच सुंदर होते. खेद याचा आहे की माझे कॉलेजमधील सर्व मित्र आता राहिले नाही. माझा एकही मित्र आता इथे नाही. जे एक-दोन आहेत ते बाहेर राहतात.'

बातम्या आणखी आहेत...