आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई-नीट मार्गातील अडथळे:मोशन इन वन डायमेन्शनमध्ये 47% विद्यार्थी करताहेत चुका

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या... कोणत्या प्रकरणांत किती विद्यार्थ्यांना आली अडचण

आपल्या कुटुंबात अथवा ओळखीच्यांकडे कुणी विद्यार्थी अभियांत्रिकी-वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत असेल किंवा तशी त्याची इच्छा असेल तर ही आकडेवारी पाहा. जेईई किंवा नीटमध्ये सुमारे ४७% विद्यार्थी फिजिक्समध्ये “मोशन इन वन डायमेन्शन’ व केमिस्ट्रीत “सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह क्वालिटी’ वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नसते. मॅथ्समध्येही “कंटिन्युटी अँड डिफरन्शिअॅबिलिटी’वर ४०% विद्यार्थी उत्तरे लिहू शकले नसते, तर ३७% विद्यार्थी बायोलॉजीत “रेस्पिरेशन इन प्लांट’वरील प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकले नसते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई व नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी काढलेल्या “अभ्यास’ मोबाइल अॅपच्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी म्हणतात, चुका कुठे होऊ शकतात हेच पडताळण्याचा अॅपचा उद्देश होता. सर्व विषयांच्या ज्या प्रकरणात चुका होत आहेत त्यातील १० यंदा बोर्डाच्या अभ्यासक्रमातच नाहीत.

जाणून घ्या... कोणत्या प्रकरणांत किती विद्यार्थ्यांना आली अडचण
फिजिक्स

- मोशन इन वन डायमेन्शन 47%
- रे ऑप्टिक्स 43%
- इलेक्ट्रोस्टॅटिक्स 43%
- थर्मोडायनामिक्स 38%
- करंट इलेक्ट्रिसिटी 33%
(रे ऑप्टिक्स, थर्मोडायनामिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी यंदा बोर्ड परीक्षेत नाही.)

मॅथ्स
- कंटिन्युटी अँड डिफरन्शिअॅबिलिटी 44%
- ट्रिग्नोमॅट्रिकल इक्वेशन अँड इनइक्वेशन 40%
- परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन 39%
- फंक्शन्स 37%
- इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स 36%
(कंटिन्युटी अँड डिफरन्शिअॅबिलिटी आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स बोर्ड परीक्षेत नाही.)

केमिस्ट्री
- साॅल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज 47%
- ब्लॉक एलिमेंट्स अँड हायड्रोजन 37%
- केमिकल कायनेटिक्स 35%
- अॅटॉमिक स्ट्रक्चर 34%
- केमिकल थर्मोडायनामिक्स 32%
(ब्लॉक एलिमेंट्स, केमिकल कायनेटिक्स व केमिकल थर्मोडायनामिक्स बोर्ड परीक्षेत नाही.)

बायोलॉजी
- रेस्पिरेशन इन प्लांट 38%
- फोटोसिंथेसिस इन प्लांट 36%
- मिनरल न्यूट्रिशन 33%
- रिप्रॉडक्शन इन ऑर्गेनिझम 31%
- ह्यूमन हेल्थ अँड डिसीज 30%
(मिनरल न्यूट्रिशन आणि रिप्रॉडक्शन इन ऑर्गेनिझम बोर्ड परीक्षेत नाहीत.)

54 लाखनी अॅपवर नीट मॉक टेस्ट दिली. 28 लाखनी जेईईची मॉक टेस्ट दिली. (मे, 2020 ते आतापर्यंत) 180 मिनिट नियोजित वेळ टेस्टसाठीचा. 155 मिनिटांत पूर्ण होतेय नीट मॉक टेस्ट. 156 मिनिटांत पूर्ण होतेय जेईई मॉक टेस्ट (विद्यार्थ्यांना लागणारा सरासरी वेळ)

ज्या पेपरमध्ये वेळ अधिक, त्यात गुण कमी
नीटमध्ये विद्यार्थी सर्वाधिक वेळ फिजिक्स विषयाला देतात. मात्र, यातच त्यांना सर्वात कमी गुण मिळत आहेत. जेईईमध्ये विद्यार्थी मॅथ्सला अधिक वेळ देतात, तरी यातही कमी गुण मिळत आहेत. दोन्ही परीक्षांचा विचार करता केमिस्ट्री विषयात सर्वाधिक गुण त्यांनी मिळवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...