आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉम्प्लेक्स इमोशन म्हणजे काय, दोन भावनांमधून तिसऱ्या भावनेची निर्मिती कशी होते आणि हृदयात प्रेमाची भावना कशी तयार होते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या जीवन मंत्रच्या भागात जाणून घेणार आहोत, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून.
रॉबर्ट प्लुचिक या मानसशास्त्रज्ञाने मांडलेल्या आनंद-दुःख, राग-भीती, अपेक्षा-आश्चर्य, विश्वास-घृणा या आठ प्राथमिक भावनांचा उत्क्रांतीवादी सिद्धांत आपण गेल्या काही भागात जाणून घेतला. आता त्याच्याच पुढच्या पायरीने आपला प्रवास सुरू ठेवू.
प्राण्यामध्ये नाही...
रॉबर्ट प्लुचिकने सांगितलेल्या आठ भावनांपैकी जेव्हा एक किंवा दोन भावना एकत्र येतात, तेव्हा एक तिसरीच भावना तयार होते. तिलाच कॉम्प्लेक्स इमोशन म्हणतात. प्राण्यांमध्ये ही भावना आढळून येत नाही. मात्र, मानवामध्ये या उच्च पातळीवरच्या कॉम्प्लेक्स इमोशनचा अनुभव येतो.
चिंता अन् आशा...
पुढे काय होणार? या भावनेमध्ये भीती ही भावना मिसळली, तर या दोन्हींमधून जी नवी भावना तयार होते, तिला चिंता म्हणतात. पुढे काय होणार + चिंता = भीती, असे हे सूत्र. पुढे काय होणार + आनंद या दोन भावना एकत्र आल्या. तर त्यातून निर्माण होणाऱ्या तिसऱ्या भावनेला आशा म्हणतात.
प्रेमाचे डिकोडिंग...
आपल्याला प्रेमाचे डिकोडिंगही असेच करता येईल. विश्वास + आनंद = प्रेम. आता अनेकांवर आपला विश्वास असतो. आपले ऑफिसमधले सहकारी किंवा इतर मित्र. मात्र, त्यांना आपल्याला रोज भेटावे वाटत नाही. त्यांच्याबद्दल आपली फक्त विश्वास हीच भावना असते.
मामला गडबड...
आपल्या जीवनात असेही काही मित्र, मैत्रिणी असतात. ज्यांना आपल्याला सतत भेटावे वाटते. त्यांच्याबाबत आपल्याला आनंद वाटत असतो. त्याची पुन्हा-पुन्हा अनुभुती घ्यावी वाटते. मात्र, त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नसतो. जर एखाद्याला सतत भेटावे वाटत असेल. त्या भेटीतून आनंदही वाटत असेल. सोबतच विश्वासही असेल, तर समजा मामला गडबड आहे. ते म्हणजे प्रेम.
(टीपः भावनिक बुद्धिमत्तेचा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)
संबंधित वृत्तः
जीवन मंत्रचे इतर भाग
1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?
2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?
3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!
4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!
5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून
6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?
11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये
12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये
13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!
14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!
15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!
17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून
18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!
19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!
20) विचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून
22) कुठल्याही कामावर फोकस कसा करावा; मेंदूला कसे प्रशिक्षण द्यावे, जाणून घेऊ आज
23) भावनिक बुद्धिमत्तेत सुयोग्य निर्णय म्हणजे काय, तो नेमका कसा असावा, जाणून घेऊ आज
24) भावनिक बुद्धिमत्तेचा नेमका फायदा काय, त्यातून ऊर्जा कशी मिळते, जाणून घेऊ आज
25) भावनिक बुद्धिमत्तेचे 3 विभाग कोणते, त्यांचे काम काय; जाणून घ्या किशन वतनी यांच्याकडून
26) भावनेची मुळाक्षरे कोणती, त्यांची ओळख का महत्त्वाची; जाणून घेऊ किशन वतनी यांच्याकडून
27) मेंदूचे बंद पडलेले सर्किट कसे सुरू करावे, भावनेला नंबर का द्यावा, जाणून घेऊ किशन वतनी यांच्याकडून
28) रॉबर्ट प्लुचिकचा भावनांचा उत्क्रांतीवादी सिद्धांत काय, त्याचा उपयोग होता कसा, जाणून घेऊ आज
29) राग नेमका असतो काय, विश्वास कसा ओळखावा, जाणून घेऊन भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.