आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हजीवन मंत्र:भावनेची मुळाक्षरे कोणती, त्यांची ओळख का महत्त्वाची; जाणून घेऊ किशन वतनी यांच्याकडून

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मनात भावनेचे अनेक हिंदोळे येतात. मात्र, त्याची नेमकी ओळख आपल्याला नसते. ही भावना ओळखता येणे गरजेचे आहे. तसे केले, तरच आपण त्या भावनेचा उपयोग करून घेऊ शकू. ते कसे करायचे, हे जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून.

भावनिक बुद्धिमत्तेत आठ कौशल्ये ही तीन विभागात विभागलेली आहेत. त्यातला पहिला विभाग असतो स्वः जाणीव, दुसरा निर्णय प्रक्रिया आणि तिसरा निर्णयामागचे कारण. ते आपण समाज जीवनासोबत कनेक्ट करतो का? यातला पहिला विभाग आहे स्वः जाणीव. त्याच्या पहिल्या कौशल्याची म्हणजेच भावना ओळखता येणे, याची माहिती आज आपण घेणार आहोत.

विचार प्रकट करतो

आपल्याला स्वतःच्या भावना ओळखता येणे फार महत्त्वाचे आहे. मी अनेक कार्यक्रमात जातो. तेव्हा श्रोत्यांना एक प्रश्न हमखास विचारतो. तुम्हाला आता काय वाटते? काय जाणीव होते? या प्रश्नाचे बहुतांश जणांना समर्पक उत्तर देता येत नाही. कोण म्हणते, खूप ऊन आहे. त्यामुळे गर्मी वाटते. कोण म्हणते, माझी बायको आजारी आहे, त्याची काळजी वाटते. होते काय, तर उत्तरादाखल मला ते करत असलेला विचार सांगतात. इथे आपल्याला विचार प्रकट करायचे नाहीत.

भावनिक साक्षरता

कुठलिही भावना आपल्यासाठी ऊर्जा असते. एक संदेश असतो. या महत्त्वाच्या गोष्टीचा वापर करण्यासाठी ती भावना कोणती, हे ओळखता येणे महत्त्वाचे आहे. भावनेला आपण ओखळूच शकलो नाही, तर तिचा उपयोग करून घेता येणार नाही. भावना ओळखता येणे, तिला नाव देता येणे, यालाच आपण भावनिक साक्षरता म्हणतो. त्यासाठी सतत आपल्याला आता काय फिल होते आहे, ते कळाले पाहिजे. आपल्याला आनंद वाटतो, राग येतो, दुःख वाटते, भीती वाटते. याची योग्य जाणीव स्वतःला झाली पाहिजे.

भावनेची मुळाक्षरे

एखादी भाषा शिकायची असेल, तर आपण त्या भाषेची मुळाक्षरे पहिल्यांदा शिकतो. तसेच भावनिक बुद्धिमत्ता शिकत असताना भावनिक बुद्धिमत्तेची मुळाक्षरे म्हणजे या भावनेची ओळख आपल्याला झाली पाहिजे. जेव्हा आपण भावनेला ओळखतो आणि नाव देतो, तेव्हा त्या भावनेची तीव्रता जवळपास 30 ते 40 टक्के कमी होते. त्यामुळे आपल्या मनात कोणती भावना आहे, हे ओळखता येण्याची गरज आहे.

(टीपः भावनिक बुद्धिमत्तेचा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

जीवन मंत्रचे इतर भाग

1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?

3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून

6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?

7) जीवनमंत्र:मोबाइल व्यसनाचा वेग दारूपेक्षा 300 टक्के जास्त; मेंदूवर कंपन्यांचा ताबा, अशी करून घ्या सुटका!

8) डोक्यातला केमिकल लोचा!:यशात 85 टक्के वाटा असणाऱ्या भावनांची निर्मिती होते कशी; जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

9) करिअर कसे निवडावे ?:मुलांचा कल कसा ओळखावा, पालिकांची भूमिका काय असावी, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

10) भावना वैश्विक कशा असतात ?:आपण प्रेमात का पडतो, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये

13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!

14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!

15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!

16) भावनेतून ऊर्जा कशी मिळते?:जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून

18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!

19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!

20) विचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

21) ब्रेकअप ते लव्ह:प्रेम कसे टिकवावे, नाते खोलवर कसे रुजवावे, सपोर्ट सिस्टीम म्हणून काम कसे करावे, जाणून घेऊ

22) कुठल्याही कामावर फोकस कसा करावा; मेंदूला कसे प्रशिक्षण द्यावे, जाणून घेऊ आज

23) भावनिक बुद्धिमत्तेत सुयोग्य निर्णय म्हणजे काय, तो नेमका कसा असावा, जाणून घेऊ आज

24) भावनिक बुद्धिमत्तेचा नेमका फायदा काय, त्यातून ऊर्जा कशी मिळते, जाणून घेऊ आज

25) भावनिक बुद्धिमत्तेचे 3 विभाग कोणते, त्यांचे काम काय; जाणून घ्या किशन वतनी यांच्याकडून