आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हजीवन मंत्र:कुठल्याही कामावर फोकस कसा करावा; मेंदूला कसे प्रशिक्षण द्यावे, जाणून घेऊ आज

मनोज कुलकर्णी । छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही कामात फोकस अथवा लक्ष नसेल, तर ते काम यशस्वी होत नाही. यश, तणाव व्यवस्थापनात फोकस अतिशय महत्त्वाचा असतो. आपले योग्य ठिकाणी लक्ष असेल, तरच आपली कामगिरी चांगली होते.

फोकस मॅनेज करता येणे, ही अनेक कौशल्यासाठी महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून कुठल्याही कामावर फोकस कसा करावा, त्यासाठी मेंदूला कसे प्रशिक्षण द्यावे, हे जाणून घेऊ.

तरच चांगले काम...

आपला फोकस हे आपले लक्ष संचलित करते. आपले लक्ष आपल्या भावना संचलित करतात. आपल्याला फोकसचे व्यवस्थापन करायचे असेल, तर आपल्याला आपल्या लक्षाचे व्यवस्थापन करावे लागेल किंवा आपल्या भावनांचे तरी योग्य व्यवस्थापन करावे लागेल. तरच आपल्या फोकसचे व्यवस्थित व्यवस्थापन होईल. तो मॅनेज करता येईल. आपल्याला तो जिथे हवा, तिथे ठेवता येईल. तरच आपण उत्तम आणि जास्त काम करू शकू.

श्वासावर लक्ष ठेवा...

आपला उद्या पेपर असतो. आपल्याला अभ्यास करावा लागेल, हे कळते. मात्र, तरीही आपण अभ्यास करत नाही. ही ट्रॅजेडी असते. कारण आपण आपल्या मेंदूला फोकस कसे रहायचे हेच शिकवलेले नसते. मग त्यासाठी काय करावे. त्यासाठी एक सोपी कृती आहे. आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रीत करायचे. दिवसभरातून किमान वीस वेळा असे करा.

लक्ष नाकावर येते...

श्वास नाकाला कुठे स्पर्शून आत जातो, कुठे स्पर्शून बाहेर येतोय. याकडे लक्ष द्या. जातानाचा श्वास थंड आहे की गरम आहे. येतानाचा उच्छवास थंड आहे की गरम आहे. यावर आपल्याला लक्ष द्यायचे आहे. हे जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले भरकटलेले लक्ष थेट नाकावर येते.

तर काम फत्ते...

आपले लक्ष नाकावर ठेवताना मध्येच आपल्या मनात दुसरे विचार येतात. हे आपल्या लक्षात आले की, पुन्हा आपले भरकटलेले विचार आपल्याला नाकावर आणून ठेवायचे आहेत. असे करायला जागरुकतेची जागरुकता म्हणणे योग्य ठरेल. अशा पद्धतीने आपण आपल्या मेंदूला विशिष्ट विषयावर कसे लक्ष द्यायचे, यात पारंगत करू. आपले लक्ष भरकटले तरी त्याच विषयावर आणू. तेव्हा कुठलेही काम लगेच फत्ते होईल.

जीवन मंत्रचे इतर भाग

1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?

3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून

6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?

7) जीवनमंत्र:मोबाइल व्यसनाचा वेग दारूपेक्षा 300 टक्के जास्त; मेंदूवर कंपन्यांचा ताबा, अशी करून घ्या सुटका!

8) डोक्यातला केमिकल लोचा!:यशात 85 टक्के वाटा असणाऱ्या भावनांची निर्मिती होते कशी; जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

9) करिअर कसे निवडावे ?:मुलांचा कल कसा ओळखावा, पालिकांची भूमिका काय असावी, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

10) भावना वैश्विक कशा असतात ?:आपण प्रेमात का पडतो, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये

13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!

14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!

15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!

16) भावनेतून ऊर्जा कशी मिळते?:जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून

18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!

19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!

20) विचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

21) ब्रेकअप ते लव्ह:प्रेम कसे टिकवावे, नाते खोलवर कसे रुजवावे, सपोर्ट सिस्टीम म्हणून काम कसे करावे, जाणून घेऊ

बातम्या आणखी आहेत...