आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Jeevan Mantra Special Series Video; Breakup To Love, Relationship | Expert Dr. Sandeep Sisode | Love To Breakup

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हब्रेकअप ते लव्ह:प्रेम कसे टिकवावे, नाते खोलवर कसे रुजवावे, सपोर्ट सिस्टीम म्हणून काम कसे करावे, जाणून घेऊ

मनोज कुलकर्णी । छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येमुळे गेल्या काही दिवसांत देश हादरला. गेल्या भागात आपण लव्ह ते ब्रेकअपचा प्रवास कसा होतो, हे पाहिले. या भागात आपण ब्रेकअप ते लव्ह असा प्रवासही होऊ शकतो, ते कसे, हे जाणून घेऊ.

प्रियकर - प्रेयसी असो की, पती-पत्नी. यांच्यातले प्रेम कसे टिकावे, नाते खोलवर कसे रुजवावे, आपण एकमेकांची सपोर्ट सिस्टीम म्हणून काम कसे करावे, हे जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांच्याकडून.

अशी होते सुरुवात...

प्रेमप्रकरणात टोकाचे पाऊल का उचलले जाते, त्याची कारणे आपण पूर्वीच्या भागात पाहिली. त्यात एकमेकांकडून सतत अपेक्षा केल्या जातात. माझ्या मनाप्रमाणे समोरची व्यक्ती वागली पाहिजे. मला पाहिजे तसाच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे. त्या व्यक्तीने प्रतिक्रिया देऊच नये, अशी अपेक्षा कारणीभूत असते. खरे तर व्यक्तीमत्वे वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळ्या प्रकारची असते. तुम्ही जर समोरच्याला एक्का दिला. तर त्याच्याकडूनही एक्काच मिळाला पाहिजे. त्याच्याकडे इतर पत्ते असतील, तर ती आपल्याला नको असतात. असा अट्टाहास धरला जातो. यात अगदी एकमेकांना धमकावण्यापर्यंत प्रकार घडतात. त्यानंतर टोकाचे पाऊल उचलले जाते.

शेअर करायला शिका...

कमी वेळेत जवळ आल्यानंतर हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र, आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचे असेल, तर भरपूर वेळ देण्याची गरज आहे. झाड जेवढे मोठे असेल, तेवढ्या त्याच्या मुळा खोलवर गेलेल्या असतात. प्रेमामध्ये सुद्धा एकमेकांना ओळखण्यासाठी खोलवर जाण्याची गरज आहे. तुम्हाला खोलवर जाता येत नसेल, तर मी पसरेन. माझा मित्र मैत्रिणींच्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष देईन. मला त्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतले पाहिजे. त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्या व्यक्तीशी मोकळे बोलले पाहिजे. कुठल्याही गोष्टी माझ्या मनात ज्या धुसमुसत आहेत. मनात संघर्ष होतो आहे, ते समोरच्या व्यक्तीशी शेअर केले पाहिजे. हे आपण ध्यानात ठेवावे.

अनकंडिशनल प्रेम ठेवा...

बऱ्याचदा आपले प्रेम कंडिशनल असते. असे असेल, तर ठीक आहे. तसे असेल तर नको. वगैरे, वगैरे. असे न करता खूप वेळ देणे, अन कंडिशनल प्रेम करणे महत्त्वाचे आहे. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांशी बोलणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीकडून आपण सर्व नात्यांच्या अपेक्षा ठेवत असतो. आपण फक्त प्रेम एके प्रेम करतो. घरातल्या व्यक्ती, मित्र मंडळींचा वेळ कमी करतो. आणि त्या एका व्यक्तीला देत राहतो. यातून आपल्या अपेक्षा वाढत असतात. एकांगी व्यक्तिमत्व सुरू होते. आपण समाजातून तुटतो. तेव्हा त्या व्यक्तिशिवाय आपल्या हातात काहीच नाही. ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये. असे सतत वाटत असतो. त्यामुळे टोकाचे पाऊल गाठले जाते.

नाते खोलवर न्या...

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण सारखी नाती ठेवली पाहिजेत. इतर व्यक्तींसोबतही वेळ शेअर केला पाहिजे. मित्रांकडून वेगळ्या अपेक्षा, पत्नीकडून वेगळ्या अपेक्षा, आई-वडिलांशी संवाद या सगळ्या गोष्टीवर काम करावे लागेल. नाते खोलवर न्यावे लागेल. अनकंडिशनल प्रेम करावे लागेल. संवादात एकमेकांचे प्रश्न, मनातील जी सल असेल त्याच्यावर आपण बोलायला हवे. एकमेकांची सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण काम करा. आपण एकमेकांसाठी जगूया आणि प्रेम करूया. हे नेहमी लक्षात ठेवा.

(टीपः मानसिक आरोग्याचा हा विषय सविस्तर जाणून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

जीवन मंत्रचे इतर भाग

1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?

3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून

6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?

7) जीवनमंत्र:मोबाइल व्यसनाचा वेग दारूपेक्षा 300 टक्के जास्त; मेंदूवर कंपन्यांचा ताबा, अशी करून घ्या सुटका!

8) डोक्यातला केमिकल लोचा!:यशात 85 टक्के वाटा असणाऱ्या भावनांची निर्मिती होते कशी; जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

9) करिअर कसे निवडावे ?:मुलांचा कल कसा ओळखावा, पालिकांची भूमिका काय असावी, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

10) भावना वैश्विक कशा असतात ?:आपण प्रेमात का पडतो, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये

13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!

14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!

15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!

16) भावनेतून ऊर्जा कशी मिळते?:जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून

18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!

19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!

20) विचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

बातम्या आणखी आहेत...