आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Jeevan Mantra Special Series VIDEO; Psychology Expert Dr. Sandeep Sisode Guidance | Career Love Life Mantra

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हजीवन मंत्र VIDEO:करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

मनोज कुलकर्णी l औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. संदीप सिसोद, अध्यक्ष, राज्य मानसशास्त्र परिषद

नवीन वर्षांच्या साऱ्यांनाच शुभेच्छा. आम्ही दिव्य मराठी डिजिटल 2023 सालामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोत एक आगळीवेगळी सीरिज जीवन मंत्र. यात आपल्याला राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप शिसोदे हे मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करणार आहेत.

करिअर, नाते, प्रेम, बेकअपपासून ते मुलांना पॉर्न बघण्याचे लागलेले व्यसन या साऱ्यांवरचा रामबाण उपाय ते आपल्याला सांगणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ते सांगतायत हरवत चालेल्या संवादाविषयी...

'डब्ल्यूएच'ओ म्हणते...

जागतिक आरोग्य संघटना म्हणते 2025 पर्यंत मानसिक आरोग्याची समस्या सर्वात जास्त वाढणारय. त्यातही कोविडनंतर एंग्जायटी, डिप्रेशन, मुलांचा चंचलपणा, स्मरणक्षमतेवर परिणाम असे असंख्य प्रश्न वाढले आहेत. आपण स्वतःचा विचार, आत्मपरीक्षण जास्त करतोय. विचारांचा स्पीड वाढलाय. आपल्यालाला घड्याळ्याच्या आणि वेळेच्या आधी सगळं मिळालं पाहिजे. हा अट्टाहास दिसतोय.

संवाद अभावाने समस्या

मुलांच्या समस्या वेगळ्यात, पालकांच्या समस्या वेगळ्यात. प्रौढांच्या, तरुणांच्या, करिअरच्या समस्या वेगळ्यात. केवळ संवादाच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतायत आणि त्यामुळे अनेक मानसिक आजार जडतायत. गैरसमजातून व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतेय. ती व्यक्ती असे का बोलली..असे केवळ गैरसमजातून घडते. सासू घालून-पाडून बोलते म्हणून चक्क सुना घटस्फोट घेतायत.

तो त्याचा दृष्टिकोन

खरे तर आपल्या आयुष्यातले अनेक प्रश्न उत्तम संवादाअभावी निर्माण होतायत. माझ्या सासूला, सुनेला, मुलाला माझ्याबद्दल जे काही वाटतं, तो त्याचा दृष्टिकोन आहे. अशा घटना घडणारच आहेत. त्यावर आपण कसा दृष्टिकोन ठेवतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल असे का बोलला? त्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचा भागय. नवरा, बायको, मुलांची भांडणे केवळ संवादाच्या अभावामुळे घडतायत.

ऐका म्हणजे सुटताल

ऐकूण घेणं संवादाचा मोठा भागय. त्याला चुकीच्या गोष्टी समजल्या असतील, तर त्याच्याशी बसून बोलणं गरजेचंय. मात्र, आपण पुन्हा चुकीचा प्रतिक्रिया दिली, तर त्यातून प्रकरण टोकाला जाते. त्यामुळं तिथं संवाद साधणं गरजेचंय. ताणतणाव, नैराश्य, एंग्जायटी या सर्वापर्यंत पोहचण्याआधी संवाद क्षमता आणि ऐकूण घेण्याची क्षमता वाढवली, तर मानसिक आरोग्याला फायदाच होईल.

(टीपः मानसिक आरोग्याचा हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

बातम्या आणखी आहेत...