आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Jeevan Mantra Special Series Video; Psychology Expert Dr. Sandeep Sisode Guidance | Life Home Career Success

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हजीवनमंत्र:एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

मनोज कुलकर्णी । औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती भांडणात एखादे वाक्य बोलून जाते. ते मनाला असे टोचते की, ते सुंदर नाते तिथेच मातीमोल होते. ती व्यक्ती असेच का बोलली, हा विश्वास मनात इतका घट्ट रुजतो की, आपण सतत अस्वस्थ राहतो. अनेकदा त्याचा आपले घर, करिअर, यश यावरही भयंकर परिणाम होतो.

एखाद्या व्यक्तीबद्दलची याच बैचेनीमुळे आपल्यामागे डिप्रेशन, ओसीडी (Obsessive Complusive Disorder), एंग्जायटी, ताणतणाव, बीपी वाढण्याचे प्रकार होऊ शकतात. हे फक्त आपला बिलीफ म्हणजेच विश्वास बदलून दूर करता येते. ते कसे, हे सांगतायत राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे.

क्षणात नाते संपते

बिलीफ म्हणजेच विश्वास. तो एखाद्या विचाराशी घट्ट जोडलेला असतो. त्यातून वेगवेगळ्या मानिसक समस्या निर्माण होतात. त्यातून एखादे नाते क्षणात उद्धवस्त होते. एखादी अशी घटना घडते की, त्यावर आपण कसा विचार करतो. आपले दृष्टिकोन कसे आहेत? यावरून त्याचे परिणाम चांगले की वाईट ठरते. म्हणजेच काय, या साऱ्यांच्या पाठिमागे हा बिलीफ, विश्वास असतो.

घटना राहतात ताज्या

बऱ्याचदा वीस-वीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटना लोकांना आजही तशाच ताजा तवान्या वाटतात. अनेकजण त्या घटनेवर तेवढाच विचार करतात. ही घटना घडली तेव्हा जितका त्रास झाला, आजही अनेकांना त्या घटनेच्या विचाराने तितकाच त्रास होतो. आता असेही समोर आले आहे की, डिप्रेशन, ओसीडी, एंग्जायटी, ताणतणाव यामागे जुन्या कुठल्या घटनावरचा आपला हाच विश्नास कारणीभूत असतो.

चक्क झोप उडते

अनेकांची मुख्यतः अशी तक्रार असते की, मला झोप येत नाही. मी अस्वस्थ असतो. माझा बीपी वाढला आहे. इतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. लक्षात रहात नाही. मेमरी लॉस होत आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर असे समजते की, दहा वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने त्यांचा अपमान केला आहे. तोच विचार, विश्वास त्यांनी मनात घट्ट रुजवला आहे.

सतत विपरित परिणाम

अनेकजण म्हणतात, ता माणसाची लायकी नव्हती. तो माझ्या जवळचा नातेवाईक होता. तो माझ्या घरातला सदस्य होता. त्याने माझ्या बाबतीत असे गैरसमज केले. त्यामुळे त्याचा मला खूप राग आलेला आहे. ती सनक आजही ताजी असते. त्याचे मनावर आणि शरीरावर सतत विपरित परिणाम होत असतात.

दृष्टिकोन ठरतो घातक

घटना तर घडलेली आहे. त्याचे परिणामही सतत होत आहेत. मग या घटनेवरचे हे विश्वास कसे बदलायचे. त्याच्यावर कसे काम करायचे, हे माहित नसते. आपण काय, तर घडलेल्या घटनेचा विचारच करत बसतो. त्या घटनेकडे पाहण्याचा तोच दृष्टिकोन ठेवतो. माझा अपमान झाला आहे. इतकेच आपल्या डोक्यात सुरू असते.

मी तसा नाही

आपल्या मनातले हे मानसिक दंद्व टाळण्यासाठी आपण असा विचार करायची गरज आहे की, माझा अपमान दहा वर्षांपूर्वी झाला होता. हो खरे आहे. अशा प्रकारचे वाक्य तो बोलला होता, पण त्या वाक्यावर मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत नाही. तो त्या व्यक्तीचा माझ्याकडे बघून बोलण्याचा त्याचा दृष्टिकोन होता. त्यात एकच गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे तो माझ्याकडे पाहून बोलला. मात्र, तू जे बोलतो आहे, मी तसा नाही.

मी खरा व्यक्ती

आपल्याला बोलणाऱ्याच्या मनात, डोक्यामध्ये काय असेल? तो फ्रस्टेड असेल. त्याच्यामागे कसला तरी ताण असेल. त्याला कसली तरी गोष्ट ट्रीगर झाली असेल. त्यामुळे तो मला बोलला असेल. किती चांगले झाले, की त्या व्यक्तीने त्याच्या जे काही मनात आहे, ते माझ्यासमोर बोलला. म्हणजे मी चांगला माणूस आहे. मी खरा व्यक्ती आहे. त्यामुळे तो व्यक्ती माझ्याशी एवढे स्पष्ट बोलू शकला. असा विश्वास आपण आपल्या मनात निर्माण करू शकतो.

नव्याने विश्वास निर्मिती

आपण कोणत्या विचारामुळे अस्वस्थ होतो, त्या विचारांना काउंटर थॉट जर आपण दिले, त्या विचारांना आपण सकारात्मक बदलण्याची गरज आहे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, आता मी अस्वस्थ होत नाही. मला झोप चांगली येते. मग आपण केले काय, की मनात नव्याने विश्वास निर्माण केला. कारण घटना आपल्या हातात नसतात. मात्र, त्यावरचे सकारात्मक विश्वास आणि विचार तयार करणे कोणत्याही क्षणी आपल्या हाती असते. आपण ते केले पाहिजे.

(टीपः 'बिलीफ'चा हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

बातम्या आणखी आहेत...