आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरिअरच्या यशात भावनिक बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाची असते. त्याच्याशिवाय आपली प्रगती अशक्यच. आपल्या कर्तबगारीत जवळपास 85 टक्के या भावनांचे महत्त्व असते.
मग या भावनेची निर्मिती होते कशी, डोक्यातला हा केमिकल लोचा नेमका असतो काय, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून.
संशोधनातून उलगडले
गेल्या पन्नास वर्षांत न्युरो सायन्समध्ये मेंदूवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, भावनांची निर्मिती अशीच कशीही होत नाही. त्यामागे खूप मोठी प्रक्रिया आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये होत असते. त्याचा खूप मोठा अर्थ आणि महत्त्व आहे. हे जेव्हा कळले, तेव्हा जग जास्त गांभीर्याने याकडे वैज्ञानिक नजरेने पाहायला लागले.
विचार म्हणजे काय?
आता आपल्याला पक्के माहिती आहे की, भावना कशा तयार होतात? प्रत्येक भावनेचे महत्त्व काय आहे? त्यामुळे आपण आज या भावनांची निर्मिती कशी होते, ते जाणून घेऊयात. एक असतात विचार. विचार म्हणजे काय? असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर सांगता येणार नाही. मानसशास्त्रात विचार म्हणजे काय, तर सेल्फ टॉक. आपण स्वतःशी जे बोलत राहतो. त्याला आपण विचार म्हणतो. मग ते कसलेही बोलणे असो. यामुळे ब्रेनमध्ये काही होत नाही.
भावनेचे थोडे वेगळे
भावनेचे विचारांसारखे नसते. आपली जी पंचेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये आहेत, त्यांनी आपण बाहेरच्या जगातल्या अनेक गोष्टींची जाणीव करून घेतो. डोळ्यांनी पाहतो. कानांनी ऐकतो. या पंचेंद्रियाकडून बाहेरच्या जगातली गोष्ट जेव्हा आपल्याला जाणवते, तेव्हा ती आपल्या मेंदूमध्ये जाते. मग मेंदू आधीच्या अनुभवाच्या आधारे या इनपुटचे विश्लेषण करतो.
विश्लेषणावर अॅक्शन
विश्लेषण केल्यानंतर त्यावर काय अॅक्शन घ्यायची आहे, याचा एक प्रकारचा आदेश मेंदूच आपल्या शरीराला देतो. त्याचीच प्रतिक्रिया आपला चेहऱ्यावर, शरीरावर प्रतिक्रिया उमटते. भीती असेल, तर ती आपल्या चेहऱ्यावर दिसते. आनंद असेल, तर तो सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतो. ही अशी व्यक्तता म्हणजेच भावना. आपल्या प्रत्येक सुख अन् दुःखामागे ही भावनाय.
(टीपः भावनेची निर्मिती होते कशी, हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)
जीवनमंत्रचे इतर भागः
1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?
2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?
3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!
4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!
5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून
6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.