आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफताबने 35 तुकडे करून क्रूरपणे हत्या केली. या बातमीने देश हादरला. खरे तर एकमेकांवर जीव ओवाळून टाकायला तयार असणारे प्रेमी इतके टोकाचे पाऊल का उचलतात? त्यांचा असा भयंकर विनाशाकडे प्रवास कसा सुरू होतो? जीवन मंत्रमध्ये आज आपण हेच जाणून घेणार आहोत, राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांच्याकडून.
मुंबईची श्रद्धा वालकर. आफताब पूनावालावर जीवापाड प्रेम करायची, पण त्याने दिल्लीत तिची अतिशय निर्घृणपणे आणि थंड डोक्याने हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यातला एकेक तुकडा तो रोज फेकून यायचा. शेवटी पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणले तेव्हा ओळख पटवण्यासाठी या तुकड्यांची डीएनए चाचणी करावी लागली. या प्रकरणाने देश हादरला. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची काळजी वाटली. प्रेम ते ब्रेकअपचा हाच प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
सुरुवातीला ओळख...
खरे तर आपण प्रेमात कसे पडतो, माहिती नसते. असे म्हणतात की, ते होते. सुरुवातीला ओळख होते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. बऱ्याचदा काही दिवसांमध्ये एकमेकांकडून अपेक्षा ठेवल्या जातात. मुळात प्रेम होते कसे? ठोस उत्तर सांगता येणार नाही, पण बऱ्याचदा व्यक्तीच्या भावनिक संतुलनासाठी, मला कोणीतरी माझे हवे आहे. शेअरिंग करण्यासाठी हवे आहे...यातूनच प्रेम सुरू होते. फुलतेही.
परतफेडीचा आग्रह...
प्रेमात पडल्यानंतर एकमेकांकडून अपेक्षा आणि मागणी सुरू होते. सुरुवातीला भरभरून दिले जाते. मात्र, अगदी काही दिवसांमध्ये त्याची परतफेड होण्यासाठी आग्रह धरला जातो. खरे तर प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते. काही अती संवेदनशील असतात. काही अंर्तमुख असतात. काही बहिर्मुख असतात. प्रत्येकाची व्यक्त होण्याची तऱ्हा वेगवेगळ्या प्रकारची असते. सुरुवातीला सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून तरुण आणि तरुणी एकमेकांजवळ येतात. येथे सगळे भेद गळून पडतात.
गोष्टी लक्षात राहतात...
प्रेमात पडल्यानंतर काही काळ जातो. मग नंतर सलग कुठेतरी काही छोट्या छोट्या कारणांनी सगळ्या गोष्टी लक्षात राहायला लागतात. त्यावेळी आपण फोन केला होता, पण तो घेतला नाही. माझ्या वाढदिवसाला सगळ्यात उशिरा मेसेज केला. गिफ्ट दिले नाही. कधी उत्तर व्यवस्थित मिळाले. कधी उत्तर दिले नाही. ही कारणांची भली मोठी यादी तयार होते.
चुका काढल्या जातात...
प्रेमात हा टप्पा कठीण असतो. ही यादी एकदा मनात तयार झाली की, त्याचे रूपांतर एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात होते. मागे ज्या चुका झालेल्या असतील, केलेल्या असतील, त्याचा संभाषणात उल्लेख होतो. समोरचा व्यक्तीही जशास तसे उत्तर देतो. तो त्या व्यक्तीच्या चुका काढतो. दोघांनाही एकमेकांचा राग येतो. अबोला धरला जातो. मात्र, पुन्हा कोणीतरी एखादा मेसेज करते, कोणीतरी पुन्हा बोलणे सुरू करते.
हे थांबवता येते...
दोघांमध्ये पुन्हा भांडण होते. संपर्क तुटतो. पुन्हा बोलणे सुरू होते. त्यानंतर त्याचे रूपांतर पुन्हा एकमेकांच्या चुका दाखवण्यात होते. मी तुझ्यासाठी काय काय केले, किती खस्ता खाल्ल्या, काय काय कष्ट केले? जे असेल ते, सांगितले जाते.त्याची उदाहरणे दिली जातात आणि पुन्हा दुसरा व्यक्तीही तसेच उत्तर देतो. हे इथेच थांबवता येते. प्रेम फुलले नाही तरी, ते जीवघेण्या वळणापर्यंत न जाता हे नाते थांबवता येते. त्यासाठी काय करावे, संवाद कसा हवा, हे जाणून घेऊ पुढच्या भागात.
(टीपः मानसिक आरोग्याचा हा विषय सविस्तर जाणून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)
जीवन मंत्रचे इतर भाग
1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?
2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?
3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!
4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!
5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून
6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?
11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये
12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये
13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!
14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!
15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!
17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून
18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.