आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंडेप्थ:​​​​​​​अंबानींच्या Jio ला टक्कर देण्यासाठी बेजोस लावणार Vi वर बाजी? या सौद्यामुळे पुन्हा येणार स्वस्त डेटाचे युग

आदित्य द्विवेदीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट-2021 मध्ये भारताची तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडीया बंद होण्याच्या मार्गावर होती. तिच्यावर (वी) स्पेक्ट्रम शुल्काचे सुमारे 96,300 कोटी, एजीआरचे जवळपास 61000 कोटी व बँकांचे जवळपास 21000 कोटी रुपयांची थकबाकी होती. कंपनीला यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता.

आता व्होडाफोन-आयडीयात पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. मेच्या शेवटी Vi च्या समभागांच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली. एवढेच नाही तर यंदा वीच्या 4-जी सब्सक्रायबर्समध्ये पुन्हा जोमाने वाढ होताना दिसून येत आहे.

Amazon सोबतच्या प्रस्तावित करारामुळे दिवस पालटले

अमेझॉनचा वीसोबत लवकरच 20 हजार कोटींचा गुंतवणूक करार होऊ शकतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, कंपनीचे स्टेक विकून Vi ला 10 हजार कोटी रुपये आणि कर्ज म्हणून 10 हजार कोटी रुपये मिळतील.

23 मे 2022 रोजी वी चे व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर यांनीही कंपनी 20 हजार कोटींच्या सौद्याच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे म्हणाले होते. टक्कर यांच्या मते, या गुंतवणुकीतून कंपनीचे नशिब बदलून ती स्पर्धेत राहील.

व्होडाफोन आयडीयाने एप्रिल महिन्यात 4500 कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. त्यात आता अमेझॉनसोबतचा 20 हजार कोटींचा करार फायनल झाला तर वी मोठ्या दिमाखात जीओ व एअरटेलला आव्हान देण्यास सज्ज होईल.

डीलमुळे पुन्हा येईल स्वस्त डेटाचे युग

2016 मध्ये जिओच्या लॉन्चिंगवेळी भारतात 8 मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. जिओने फ्री कॉलिंग व डेटाची रणनिती स्विकारली, यामुळे हळूहळू मार्केटमधील स्पर्धा कमी होत गेली. 2017 मध्ये टेलिनॉर, 2018 मध्ये एअरसेल व 2019 मध्ये डोकोमोने आपला गाशा गुंडाळला. 2018 मध्ये व्होडाफोन-आयडीयाचा एकमेकांत विलय झाला.

बाजारातील स्पर्धा कमी झाल्यानंतर जिओने टॅरिफ रेट्स वाढवणे सुरू केले. अमेझॉन व Viच्या डीलनंतर पुन्हा एकदा स्पर्धा वाढेल. जास्त सब्सक्रायबर्सच्या लालसेपोटी पुन्हा डेटा टॅरिफचे रेट कमी होऊ शकतात.

परिस्थितीने बनविली Amazon आणि Vi ची जोडी

अमेझॉन मागील 3 वर्षांपासून भारताच्या दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहे. 2020 मध्ये अमेझॉन भारती एअरटेलमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आले होते. पण, त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले.

गुगल व फेसबूकने मुकेश अंबानींच्या रिलायंस जिओमध्ये 10.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. त्यानंतर गुगलनेही एअरटेलमध्ये 1 अब्ज डॉलर्सची स्वतंत्र गुंतवणूक करण्याचे संकेत दिलेत.

दुसरीकडे, व्होडाफोन-आयडीयाला कोणत्याही मोठ्या कंपनीची गुंतवणूक मिळाली नाही. तसेच अमेझॉनलाही कोणत्याही भारतीय दूरसंचार कंपनीत गुंतवणूक करता आली नाही. यादरम्यान दोन्ही कंपन्यांत चर्चा सुरूच होती. अमेझॉनला भारतीय बाजारपेठेते उतरायचे असेल तर त्याच्यापुढे वीहून चांगला दुसरा कोणताही पर्याय नाही.

या सौद्याचा केवळ Vi च नाही तर अमेझॉनलाही होणार फायदा

The Ken नुसार, अमेझॉनच्या क्लाउड सर्विसच्या नजरा, वीच्या देशभरात अस्तित्वात असलेल्या डेटा सेंटर्स व फायबर नेटवर्कवर आहेत. सद्यस्थितीत अमेझॉनचे केवळ मुंबईत एक डेटा सेंटर आहे. हैदराबादेत दुसरी एक फॅसिलिटी तयार होत आहे. तथापि, अमेझॉनची टियर-2 शहरांत जाण्याची इच्छा आहे. सद्यस्तितीत व्होडाफोनकडे देशभरात असे 70 डेटा सेंटर्स असून, त्याचा वापर अमेझॉनला करता येईल.

बातम्या आणखी आहेत...