आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डदिल्ली-मुंबईला नेऊन मुलींची विक्री:प्लेसमेंट एजन्सीद्वारे अनोळखी ठिकाणी मोलकरीण म्हणून रवानगी, लैंगिक शोषणही होते

रांचीतून मृदुलिका झा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वेळच्या पोटभर अन्नाचे स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडले. आणखी एक स्वप्न होतं - अस्खलित इंग्रजी बोलायचं आणि स्वतःच घर बांधायचं. दिल्लीला पोहोचल्यावर शाळेऐवजी घरात कोंडली गेले. एका प्रेमळ कुटुंबाच्या बदल्यात, मला मानसिक आजारी असलेल्या लोकांच्या सहवासात ठेवण्यात आले. त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या शिव्या ऐकणे हे माझे काम होते.

तेव्हा मी लहान होते. भीत होते. ते कधी ओरबाडत, तर कधी चावा घेत. पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले.त्यानंतर एके दिवशी मध्यरात्री एजंटने ट्रेनमध्ये बसवले. हातात पैसे आणि तिकीटही नव्हते. दिल्लीहून झारखंडला जातांना जवळ होते ते फक्त एक गाठोडे आणि अनेक स्वप्ने. परत आले तेव्हा आयुष्यात काहीच उरले नव्हते.

आता जर कोणी विचारले की आयुष्यातील सर्वात मोठी चूक काय आहे, तर मी म्हणेन - ताजे अन्न खाण्याची इच्छा! या इच्छेने मला नरकाचा अनुभव दिला.

मंजू कठोर स्वरात बोलतात. त्यांचे बालपण अशा जगात गेले जिथे अंधार आणि विस्मृतीशिवाय काहीही नाही. खेड्यातील गरीब घरांमधील तरुण मुली जेव्हा गाव सोडतात तेव्हा त्यांच्या परतीचे सर्व मार्ग बंद होतात.

मुली वाचल्याचं तर त्यांच्यावर 'दिल्ली-रिटर्नड'चा डाग लागतो. याचा अर्थ मोठ्या शहरात जाऊन चुकीच्या गोष्टी करून परत आलेली मुलगी, अशी मुलगी जिचा आता कोणीही वापर करू शकतो असा गावातील लोकांचा दृष्टिकोन होतो.

मंजू आठवून सांगतात, त्यांचे कुटुंब मोठे होते. पालक अशिक्षित होते शिवाय त्यांच्याकडे शेती नव्हती. घरची परिस्थिती बिकट होती. एक वेळच्या जेवणाचे देखील हाल होते. तेव्हाच ही 'ऑफर' आली.

मंजू सांगतात, माझ्यासह गावातील तीन मुलींना दिल्लीला बोलावण्यात आले. त्या ताईंनी वचन दिलं होतं की, आम्हाला शिक्षण दिले जाईल त्याबदल्यात आम्हाला छोटे मोठे काम करावे लागणार होते.
मंजू सांगतात, माझ्यासह गावातील तीन मुलींना दिल्लीला बोलावण्यात आले. त्या ताईंनी वचन दिलं होतं की, आम्हाला शिक्षण दिले जाईल त्याबदल्यात आम्हाला छोटे मोठे काम करावे लागणार होते.

मी फुलपाखराप्रमाणे बागडत जाण्याची तयारी सुरु केली. आईनेही नवीन कपडे आणि किरकोळ वस्तू माझ्यासोबत दिल्या. तिला असे वाटत होते की मुलगी मोठ्या शहरात जात आहे तर इतरांपेक्षा कमी दिसायला नको. आईचे असे वागणे पाहून ती माझी शेवटची पाठवणी करत असल्यासारखे वाटले. पण मी जर वाचले नसते तर कदाचित ती शेवटचीच पाठवणी ठरली असती.

दिल्लीला पोहोचताच मला आणि माझ्या मैत्रिणींना वेगळे करण्यात आले. जिथे पोचलो तिथे सगळे 'हाफमाईंड' राहत होते. तिथे राहणारे सर्व व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे माझे काम होते. तेव्हा मी 8 वर्षांची होते. अनोळखी शहरात, एकटी आणि वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात. मंजू 'हाफमाईंड' असा मानसिक आजारी असलेल्या लोकांचा उल्लेख करतात.

मी माझ्या घरी कधीच स्वयंपाक केला नाही, इथे मात्र रोज स्वयंपाक करायचे. बनवलेले जेवण त्या लोकांच्या खोल्यांपर्यंत पोहचवून लगेच माझ्या खोलीत येऊन बसत होते. या सर्वात किती काळ गेला कळेलच नाही. गावात असताना उघडे डोळे करून सूर्याकडे नजर धरणारी मी दिल्लीच्या मंद उजेडातही डोळे उघडण्यास हिंमत करत नव्हते. तिथं माझे घर जंगलात होते, इथे मात्र एका खोलीत कैद होते.

आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही का? यावर मंजू सांगतात, 'नाही. असे करण्याची तर अधिकच भीती वाटत असे.'' एकदा मी दूध आणण्याच्या कारणाने बाहेर निघून फोन लावण्याचा प्रयत्न केला होता, पण ते जमले नाही.मी लहान होते आणि शिवाय मोठे शहर भीतीने परत आले. ही बाब एजंटच्या लक्षात आल्यावर त्याने मला मध्यरात्री घरातून हाकलून देऊ असे धमकावले.

मंजू सांगतात, मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले. संतापलेल्या एजंटने मला मैत्रिणीसोबत ट्रेनमध्ये बसवले. ट्रेन निघाल्यावर कळले की ती झारखंडला जाणारी ट्रेन नाही.
मंजू सांगतात, मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले. संतापलेल्या एजंटने मला मैत्रिणीसोबत ट्रेनमध्ये बसवले. ट्रेन निघाल्यावर कळले की ती झारखंडला जाणारी ट्रेन नाही.

घरी परतले तेव्हा आईने जवळ घेतले. आई रडायला लागली आणि म्हणाली आता मी तुला कुठेही पाठवणार नाही.हे सांगताना मंजू यांचे डोळे देखील भरून येतात, कदाचित त्या अशाच एखाद्या 8 वर्षांच्या मुलीचा विचार करत असतील या क्षणी दिल्लीतील एखाद्या अनोळखी ठिकाणी लोकांसाठी जेवण बनवत असेल किंवा तिचा सुद्धा मानसिक आणि शारीरिक छळ होत असेल.

मुलींच्या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मंजू आमचा माईक काढून सांगतात – गरीब असण्यासारखे दुसरे पाप नाही, मॅडम. जिवंतपणे नरकयातना अनुभवाव्या लागतात.

मंजू यांच्या या अपुरंजन कहाणीच्या दुसऱ्या गोष्टी अरविंद मिश्रा सांगतात, जे मानवी तस्करी रोखण्यासाठी एका संस्थेसोबत काम करत आहेत. हे अशा लोकांचे संपूर्ण नेटवर्क आहे ज्यांचे काम गावातील गरीब मुलींना फसवून त्यांना फूस लावून मुंबई- दिल्लीसारख्या मोठ्या शहरात त्यांना पोचवतात.

अरविंद मिश्रा गेल्या 15 वर्षांपासून मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करत आहेत. दिल्लीच्या एका उच्च वसाहतीत केलेल्या बचावकार्याची आठवण त्यांच्या मनात अजूनही ताजी आहे.
अरविंद मिश्रा गेल्या 15 वर्षांपासून मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करत आहेत. दिल्लीच्या एका उच्च वसाहतीत केलेल्या बचावकार्याची आठवण त्यांच्या मनात अजूनही ताजी आहे.

शरीरांवर हलक्या जखमा इस्त्रोने भाजलेली पाठ. आम्ही घरावर छापा टाकला तेव्हा मुलगी बाथरूमच्या फरशीवर पडली होती.तिच्या अंगावर खूप कमी कपडे होते की ती पळून देखील जाऊ शकणार नाही. सुमारे महिनाभर तिच्यावर उपचार सुरु होते मग त्या मुलीला तिच्या गावाचा पत्ता आठवला.

या प्रकरणांमध्ये मारहाण आणि उपासमार सामान्य आहे. अनेकदा ज्या घरात मुलींना ठेवले जाते तिथे लैंगिक अत्याचारही होतात. मात्र फार कमी मुली त्याबद्दल सांगतात.

एजेंटचे नेटवर्क कसे काम करते? बहुतांश घटनांमध्ये मुलीचे नातेवाईकच एजंट बनतात ज्यांना घरामध्ये प्रवेश करणे शक्य असते. ते मुलीच्या अशिक्षित पालकांना फूस लावतात. मोठ्या शहराची आणि शिक्षणाची स्वप्ने दाखवतात.

लोक यात अडकतात आणि आपल्या मुलीला पाठवण्यासाठी तयार होतात. तिथून दुसरा एजंट मुलीला घेऊन रांची रेल्वे स्थानकावर पोहोचतो. या वेळेतच प्लेसमेंट एजन्सी मुलींवर पैसा लावतात. मुलीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवताना प्रत्येक एजंटला पैसे दिले जातात.

अशा रीतीने दिल्लीला पोहचेपर्यंत एक हजार रुपयेही एकत्र न पाहिलेली ती मुलगी दीड ते दोन लाखांच्या कर्जात बुडून जाते.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, झारखंड मानवी तस्करीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे, जिथून दर चार दिवसांनी एका मुलाची, विशेषत: मुलीची तस्करी होते.

अरविंद नंतर, बैद्यनाथ कुमार भेटतात , जे अशा मुलींच्या सुटकेसाठी काम करतात. बैद्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, गावातून दिल्ली-मुंबईला पोहोचणाऱ्या प्रत्येक मुलीचे लैंगिक शोषण होते. सर्वात आधी लैंगिक संबंधांसाठीच तिची विक्री होते.

एजंटला याची मोठी किंमत मिळते. त्यानंतर मुलींना प्लेसमेंट एजन्सीद्वारे एका कुटुंबाला दिले जाते, जिथे त्या मोलकरीण म्हणून काम करतात. कधी-कधी असंही होतं की त्या सेक्स रॅकेटमध्येही अडकतात. लहान मुलींना मादक पदार्थांसोबत हार्मोन्स देखील दिले जातात जेणेकरून त्या लवकर वयात येतील.

मुली यातून पळून का जात नाहीत?

कारण त्यांच्याकडे ना पैसा आहे ना ताकद. शेकडो लोक असलेले गाव सोडून मुली अशा शहरात पोहचतात जिथे शेजारीही एकमेकांशी बोलत नाहीत. अशा स्तिथीत त्यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न असफल ठरतात. त्याच वेळी, एजंट त्यांचे न्यूड व्हिडिओ देखील बनवतात, मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धमकावले जाते.

बैद्यनाथ सांगतात, आतापर्यंत हजारो मुलींची सुटका करण्यात आली आहे. कधी कधी धमक्याही येतात. कधी कधी वेश बदलून जगावे लागते शिवाय कुटुंबालाही धोका आहे, पण या मुली ज्या वेदनांमधून जात आहेत, त्यापेक्षा मोठी भीती कोणतीच नाही.
बैद्यनाथ सांगतात, आतापर्यंत हजारो मुलींची सुटका करण्यात आली आहे. कधी कधी धमक्याही येतात. कधी कधी वेश बदलून जगावे लागते शिवाय कुटुंबालाही धोका आहे, पण या मुली ज्या वेदनांमधून जात आहेत, त्यापेक्षा मोठी भीती कोणतीच नाही.

चिरोंडीमध्ये, दगडी टेकड्यांमधूल, आम्ही एका निवारागृहासारख्या संस्थेत पोहोचतो, जिथे मुली राहतात. तिथे जाण्यासाठी टॅक्सी बुक होते पण परतीसाठी सुविधा नाहीत.

मुसळधार पावसात पायवाटेसारख्या रस्त्यावरून चालत मी तिथे पोहोचले. मात्र, संस्थेत पोहोचताच तिथल्या मुलींचे स्मितहास्य पाहून सर्व थकवा दूर झाला.

रविवार असल्यामुळे मुली त्यांचे आवरून शॅम्पूने केस धुवून रविवारच्या नाश्त्याचा आनंद घेतात. गाव सोडून आलेली प्रत्येक मुलगी दिल्ली-मुंबईतच हरवत नाही, तर अनेकांची स्वप्ने वीटभट्टीत जळतात.

भट्टीत काम केलेल्या रेखा विचारतात - तुम्ही कधी विटा बनवताना पाहिल्या आहेत का? जळत्या जमिनीवर चालल्याने पायांवर जखमा होतात. कधी हात भाजतो, कधी पाय मोडतो तरीही भरपाई काहीच नाही.

आणि याचे किती पैसे मिळतात? माझ्या या प्रश्नावर रेखा म्हणतात- हजार विटांचे दीडशे रुपये. हे बोलताच रेखा फ़ुटबाँल खेळायला जातात.

नोट: खबरदारी म्हणून मुलींची नावे आणि चेहरे लपवले जात आहेत.

(समन्वय- बाल कल्याण संघ, झारखंड)

बातम्या आणखी आहेत...