आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेम्स स्टिविर्डिस अमेरिकी नेव्हीचे माजी अॅडमिरल आणि नाटो अलायन्सचे ग्लोबल सुप्रीम कमांडर होते. त्यांनी आतापर्यंत ९ पुस्तके लिहिली आहेत. ते सांगतात की, ट्रम्प यांचे जाणे आणि बायडेन यांचे येणे जगासाठी फायदेशीर ठरेल. दैनिक भास्करचे रितेश शुक्ला यांनी त्यांच्याशी विशेष बातचीत केली. मुख्य अंश...
> अमेरिकेची लोकशाही धाेक्यात आहे?
मला सांगताना खेद वाटतो की, ६ जानेवारीची घटना अमेरिकेच्या इतिहासात एक असा दिवस म्हणून नोंद झाली आहे, ज्याला आठवताना लोकांना अपमानित वाटेल. अमेरिकेत ६ जानेवारीचा दिवस ९/११ सारखा लक्षात ठेवला जाईल. तरीही बायडेन नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील व अमेरिका एक सजग राष्ट्रासारखा धडा घेऊन पुढे जाईल.
> ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन यांची कार्यशैली कशी असेल?
मी ३६ वर्षापेक्षा जास्त सर्वात शक्तिशाली नेव्हीत सेवा केली आणि नाटोचा ग्लोबल अलाइड कमांडरही होतो. मी माझ्या अनुभवाच्या बळावर सांगू शकतो की, ट्रम्प यांचे जाणे आणि बायडेन यांचे येणे जगासाठी फायद्याचे ठरेल. बायडेन यांची टीम अनुभवी आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बायडेन यांची टीम अमेरिका फर्स्टसारख्या घोषणांमध्ये रमणारी नाही. ही टीम पुढे येत जगासोबत काम करण्यास तत्पर राहील.
> बायडेन आल्याने जागतिक व्यवस्थेवर काय परिणाम होईल?
मला वाटते की, १००-२०० वर्षांनंतर जर जगाचा इतिहास लिहिला गेला तर उल्लेखनीय विषय चीनचा उदय नसेल तर भारताचा उदय असेल. भारत अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाचा भागीदार असेल. बायडेन काळात अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया मिळून भारतासोबत क्वाॅडची व्यवस्था एवढी मजबूत करतील की, चीनच्या वन बेल्ट वन रोडचा पर्याय म्हणून जगात येईल. लॅटिन अमेरिका, कॅरेबियन आणि आफ्रिका जे जगासाठी ऊर्जेसाठी पॉवर हाऊस होत आहेत, तेथे भारताच्या मदतीने अमेरिका अनेक मित्रांची आघाडी करेल. बायडेन काळात भारत अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.