आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट बरोबरीचीस्त्रिया कोणाशी हसून बोलल्या तरी आभाळ कोसळते:लगेच दिले जाते चारित्र्याचे प्रमाणपत्र

मृदुलिका झा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे 1536 रोजी सकाळी ब्रिटनच्या रॉयल पॅलेसमध्ये गोंधळ उडाला. दासी रडत होत्या, मात्र अशा आवाजात की कोणत्याही पुरुष गुलामापर्यंत त्यांच्या रडण्याचा आवाज पोहोचू शकू नये. एकही महिलेच्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये यासाठी सैनिक इकडून तिकडे पहारा देत होते, कारण एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर दुःख दिसले तर तिला देखील दोषी समजून मृत्यूची शिक्षा दिली जाईल.

तो शिक्षेचा दिवस होता. चोर किंवा फसवणूक करणारा किंवा देशद्रोहीच्या शिक्षेचा नाही तर राणी अ‍ॅन बुलिनच्या फाशीच्या शिक्षेचा. गुन्हा असा होता की तिचा पती राजा हेन्री आठवा याला तिच्या चारित्र्यावर संशय होता.

प्रेयसींमध्ये अधिक रस असलेल्या राजाला त्याची दुसरी पत्नी अ‍ॅन हीने विश्वासघेत केला. राजवाड्यात येताच ती प्रेमसंबंध करायला लागली. हे प्रकरण इतके पुढे गेले की राणीने आपल्या मंत्र्यांशी संबंध जोडले अशी शंका होती.

संतप्त झालेल्या राजाने घाईघाईने आपल्या पत्नीचा शिरच्छेद करण्याची शिक्षा दिली. राजवाड्याच्या आत नाही तर सगळ्यांसमोर, टॉवर ऑफ लंडन येथे, जेणेकरून इतर स्त्रियांच्या मनात देखील भीती निर्माण होईल. राजाकडे याबद्दल कोणताही पुरावा नव्हता,राणीला केवळ संशयाच्या आधारावर शिक्षा करण्यात आली.

जवळजवळ 35 वर्षीय ज्यांनी राणीच्या जीवनावर दीर्घकाळ संशोधन केले ते ब्रिटिश इतिहासकार क्लेअर रिजवे यांच्या मते, अ‍ॅन बुलिनने विनवणी करण्याऐवजी किंवा दया मागण्याऐवजी निरोपाचे भाषण दिले आणि तिचा मृत्यू होण्यापूर्वी ती आपले मस्तक झुकवून निर्भीडपणे उभी राहिली. प्रिय लोकांनो, माझ्या पतीच्या दृष्टीने मी दोषी आहे म्हणून मी येथे मरण्यासाठी आले आहे. मला माफी नको तर मृत्यूतच मला माझा सन्मान दिसतो. राजाचे राज्य दीर्घकाळ टिकावे अशी मी प्रार्थना करेन असे या राणीचे शेवटचे शब्द होते.

अ‍ॅनच्या मृत्यूनंतर खूप दिवसांनी राजाला आपली चूक कळली, पण राजाला फारसा फरक पडला नाही. त्याने केवळ मृत पत्नीच्या स्मरणार्थ तिचे बालपणीच्या घराला टिकवून ठेवले. या राणीच्या अनेक आठवणी इंग्लंडमधील हेव्हर कॅसलमध्ये जतन करण्यात आल्या आहेत, ज्या पर्यटकांसाठीही खुल्या आहेत. यामध्ये राणीच्या खेळण्यांपासून ते प्रार्थना पुस्तकांपर्यंतच्या वस्तूंचा समावेश आहे.

राणीच्या मृत्यूचे कारणही सांगितले जाते, परंतु ज्या राजाने ही शिक्षा दिली त्याबद्दल काहीच बोलले जात नाही. मग राग किंवा द्वेष तर दूरचीच गोष्ट.

महिलांच्या चारित्र्याचे सर्टिफिकेट अनेकदा पुरुषांकडून दिले जाते. अशा स्त्रियांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही शिवाय त्या सर्वांशी हसून बोलतात. एकंदरीत स्त्री जे काही करते ते तिच्या चारित्र्याशी जोडलेले असते. कॉर्पोरेट कामगारांपासून ते रोजंदारी मजुरांपर्यंत आणि अगदी राजकारणीही हे काम तितक्याच निष्ठेने करत आहेत.

अलीकडेच बिहारमधील सत्ताबदलावर भाष्य करताना एका ज्येष्ठ नेत्याने अमेरिकेत जसे मुली बॉयफ्रेंड बदलतात, तशीच स्थिती बिहारच्या मुख्यमंत्र्यांची आहे असे वक्तव्य केले होते. सत्तेवर राहण्यासाठी कधी याची तर कधी त्याची मदत घेत राहतात असे विधान पत्रकार परिषदेत देण्यात आले.

गेल्या महिन्यात छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये पतीने पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयामुळे तिच्या मानेवर काच मारून हत्या केली होती. काही दिवसांपूर्वी हरियाणातील कैथलमध्ये पतीने पत्नीची वागणूक आवडत नसल्याने चाकूने वार करून तिची हत्या केली.अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे नाव-चेहरा-जागा बदलेल, पण कारण तेच महिलेच्या चारित्र्यावर संशय.

जनरल सोशल सर्व्हे ऑफ अमेरिका (GSS) 2018 नुसार, संबंधांच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत. याचा अर्थ असाही होतो की पुरुष स्त्रियांपेक्षा कमी निष्ठावान असतात.

18 ते 80 वयोगटातील विविध श्रेणींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक वयोगटात एक समान पॅटर्न दिसून आला, बहुतेक पुरुषांनी कबूल केले की, ते त्यांच्या मैत्रिणी किंवा पत्नी व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त स्त्रियांशी जोडलेले असतात. त्याच वेळी, महिलांची 'फसवणूक' मुख्यतः अशा प्रकरणांमध्ये दिसून आली जिथे त्यांच्यावर जोडीदाराकडून अत्याचार होत असेल.

या प्रकरणाबद्दल एक नाही अनेक संशोधन आहेत, मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तर केवळ स्त्री किती आणि कोणासोबत हसते आणि बोलते किती शांत राहते किती वाद घालते याच गोष्टीचा.

1960 च्या दशकात, ब्रिटनमध्ये एक मोहीम राबनवण्यात आली, ज्याला रेस्क्यू ऑफ फॉलन वुमन असे नाव देण्यात आले. म्हणजेच चारित्र्यहिन महिलांना वाचवण्याची मोहीम. जसे वाळून जाणाऱ्या झाडांचे जतन केले जाते तसेच महिलांच्या बाबतीत होऊ लागले.

तेव्हा विल्यम ग्लॅडस्टोन हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनी ही मोहीम संपवण्याऐवजी ब्रिटीश महिलांची दिशाभूल होऊ नये म्हणून मोठा बदल केला. त्यांना धार्मिक पुस्तके शिकवली गेली आणि घरातील कामे शिकवली गेली जेणेकरून महिला योग्य मार्गावर राहतील.

वर्षांनंतर ही मोहीम बंद झाली, मात्र आजही ते विचार तसेच आहेत. म्हणूनच सत्तांतराच्या बदलाची तुलना मुलींच्या जोडीदाराच्या बदलाशी केली जाऊ शकते - केवळ विनोदाच्या निमित्ताने!

बातम्या आणखी आहेत...