आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Kanhaiya And Khalid Entered Student Politics Together; Now Kanhaiya Has Joined Congress, But Khalid Is In Jail

कन्हैया पुढारी, खालिद मागेच:काँग्रेसमध्ये जाऊन आता खासदार किंवा आमदार होणार कन्हैया कुमार! पण, कन्हैय्याचा बॅचमेट उमर खालिद तिहार तुरुंगात; काय आहेत कारणे? येथे वाचा

पूनम कौशल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी 2001 मधील संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंदोलन केले. यावेळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी तत्कालीन जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. काही दिवसांनी उमर खालिद आणि निषेधात सहभागी असलेले इतर विद्यार्थीही शरण आले. मात्र, नंतर न्यायालयात आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

या घटनेनंतर कन्हैया कुमार आणि उमर खालिद दोघेही देशभरात प्रसिद्ध झाले. सरकारविरोधी चेहरे ठरले. त्यांनी जेवढा विरोध केला तेवढा त्यांना अधिक पाठिंबा मिळाला. आता जवळपास 5 वर्षांनंतर 28 सप्टेंबर रोजी कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यापूर्वी त्यांनी भाकपच्या तिकिटावर बिहारमधील बेगूसराय येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे उमर खालिद मात्र दिल्ली दंगलीचे षड्यंत्र रचणे, देशद्रोह आणि यूएपीए अंतर्गत तुरुंगात आहे.

अशा परिस्थितीत, एक प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे एकाच घटनेने एकाच वेळी चर्चेत आलेल्या कन्हैया कुमार यांच्या तुलनेत उमर खालिद का मागे पडला? त्याला सक्रिय राजकारणात स्थान का मिळाले नाही? यामागील कारण तो मुस्लिम असणे हे आहे का?

उमर खालिद तुरुंगात का आहे?
गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी भारताची राजधानी दिल्लीत जातीय दंगली झाल्या. पोलिसांच्या नोंदीनुसार यात 53 लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात देशभरातील मुस्लिम आणि मानवाधिकार गटांनी निदर्शने केली. उमर खालिद या चळवळीत सक्रिय होता आणि त्याने लिंचिंगच्या घटनांविरोधात युनायटेड अगेन्स्ट हेट मोहीमही सुरू केली होती.

कन्हैया कुमार अलीकडेच भाकप सोडून काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. पक्षात सामील झाल्यानंतर त्याने राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
कन्हैया कुमार अलीकडेच भाकप सोडून काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. पक्षात सामील झाल्यानंतर त्याने राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

तत्पूर्वी 17 फेब्रुवारी 2020 रोजी उमर खालिद महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये भाषण देताना म्हणाला होता, 'जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असतील, तेव्हा आपण रस्त्यावर उतरले पाहिजे. जर ट्रम्प 24 तारखेला आले तर आम्ही सांगू की भारत सरकार देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वांची पायमल्ली होतेय. आम्ही जगाला सांगू की भारताचे लोक भारताच्या राज्यकर्त्यांविरुद्ध लढत आहेत.'

उमर खालिदचे हे भाषण त्याच्याविरुद्धच्या खटल्यांचा आधार बनले. खालिदचे नाव न घेता, गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील दंगलींबाबत संसदेत दिलेल्या वक्तव्यामध्ये या भाषणाचा उल्लेख केला होता. उमर खालिदला दिल्ली दंगली घडवण्याच्या षडयंत्राच्या एका प्रकरणात जामिन मिळाला आहे, परंतु त्याला एफआयआर क्रमांक 59/60 मध्ये अद्याप जामिन मिळालेला नाही. त्याच्या जामिनावर पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

कन्हैया आणि उमर खालिद यांच्यात तुलना होतेय. आता प्रश्न निर्माण होत आहे की कन्हैया यांना भारताच्या राजकारणाने स्वीकारले आहे, पण उमर खालिद तुरुंगात आहे. उमर खालिदचे मित्र आणि लेखक दराब फारुकी म्हणतात - मला माहित नाही की पूर्वीच्या गोष्टी कशा होत्या, पण आज आपण भारतात जिथे उभे आहोत, तिथे नाव सर्वात महत्वाचे बनले आहे. तुमचे नाव काय आहे, ते तुम्ही कुठवर जाल हे ठरवते. तुमचे नाव तुमचे ओळखपत्र बनले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान गुजरातचे तरुण दलित नेते जिग्नेश मेवानी (डावीकडे), उमर खालिद आणि कन्हैया कुमार. (फाइल फोटो)
एका कार्यक्रमादरम्यान गुजरातचे तरुण दलित नेते जिग्नेश मेवानी (डावीकडे), उमर खालिद आणि कन्हैया कुमार. (फाइल फोटो)

कन्हैया आणि उमर खालिद यांची तुलना करताना फारुकी म्हणतात, 'उमरचा मार्ग अग्नी परीक्षेचा आहे. उमरला प्रत्येक टप्प्यावर अग्नी परीक्षा द्यावी लागेल. जर कन्हैया आणि उमर खालिद एकाच क्षमतेचे धावपटू आहेत आणि एकाच शर्यतीत आहेत, तर उमर अडथळे पार करत आहे आणि कन्हैया वेगाने धावत आहेत.

दुसरीकडे, उमर खालिदचे वडील कासिम रसूल इलियास म्हणतात, 'मुळात उमर हा मानवाधिकार कार्यकर्ता आहे आणि त्याने अनेक बाबींवर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. विशेषत: उमर सीएएविरोधातील निदर्शनांमध्ये सक्रिय होता.'

माध्यमांनी कन्हैयासारखे खालिदला स्थान दिले नाही
उमर खालिदचे मित्र आणि मानवाधिकार कार्यकर्ते झाकीर अली त्यागी म्हणतात की, आज कन्हैया मुख्य प्रवाहातील राजकारणात आहेत आणि उमर खालिद तुरुंगात आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे भारताच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी कन्हैया यांना स्थान दिले, पण उमर खालिदकडे दुर्लक्ष केले. टीव्ही माध्यमांनी ना त्याला डिबेटमध्ये सहभागी करुन घेतले आणि ना त्याच्या मुलाखती दाखवल्या.

खालिदचे मित्र झाकीर अली त्यागी सांगतात की, उमर खालिदला राजकारणात स्वीकारले जाणार नाही.
खालिदचे मित्र झाकीर अली त्यागी सांगतात की, उमर खालिदला राजकारणात स्वीकारले जाणार नाही.

दुसरीकडे, कन्हैया आणि उमरचे मित्र आणि टीआयएसएस मुंबई विद्यार्थी संघटनेचे माजी सरचिटणीस फहाद अहमद म्हणतात, "मला वाटत नाही की कन्हैया आणि उमर यांच्यात तुलना असावी. या दोघांची तुलना करणे हा मुद्दा नाही, मुद्दा हा आहे की आजचे राजकीय पक्ष धार्मिक अस्मितेबाबत तडजोड करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.'

राजकारण उमर खालिदला स्वीकारेल का?
खालिदचे वडील म्हणतात, 'राजकारणात स्थान दोन कारणांसाठी दिले जाते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वंचित समाजासाठी किती वचनबद्ध आहात, तुम्ही किती काळ त्याच्या समस्यांसाठी उभे आहात. अशा परिस्थितीत आज नाही तर उद्या तुम्हाला तुमची जागा मिळते. दुसरे कारण आहे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही राजकारण करता, तुम्ही जिथे संधी मिळेल तिथे जाता. मी असे गृहीत धरतो की भारतात अजूनही एक स्थान आहे. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एका गटासाठी किंवा वंचित वर्गासाठी परिश्रमपूर्वक काम केले तर त्याच्यासाठी जागा नसावी, तसे नाही. उमरसाठी आज कदाचित नसेल, पण उद्या नक्कीच संधी असेल.'

त्याचवेळी झाकीर अली त्यागी म्हणतात, 'कन्हैया कुमार यांना ज्याप्रकारे राजकारणात स्वीकारले गेले, तसे उमर खालिदला स्वीकारले जाणार नाही. राहुल गांधींनी स्वतःच्या हाताने कन्हैया यांना नियुक्त पत्र दिले होते. जर उद्या उमर तुरुंगात सुटल्यानंतर काँग्रेसमध्ये सामील होऊ इच्छित असेल तर काँग्रेस त्याचे असे स्वागत करेल का? आज भारताच्या राजकारणात मुस्लिमांसाठी जे स्थान आहे, ते फक्त नेत्यांच्या मागे उभे राहणे एवढेच आहे.

उमर खालिदचे मित्र आणि लेखक दराब फारुकी म्हणतात की, खालिद मुस्लिम असण्याची किंमत चुकवत आहे.
उमर खालिदचे मित्र आणि लेखक दराब फारुकी म्हणतात की, खालिद मुस्लिम असण्याची किंमत चुकवत आहे.

दुसरीकडे, दराब फारुकी म्हणतात की, उमरसाठी राजकीय प्रवास सोपा नसणार. या देशात ओळखीचे राजकारण इतके प्रभावी झाले आहे की आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावाच्या आधारावर न्याय दिला जात आहे. तुम्ही कोण आहात हे तुमचे नाव ठरवते.

फहादच्या मते, मुस्लिम तरुणांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी संघर्ष चालू ठेवला पाहिजे. ते म्हणतात की, मला असे वाटते की प्रत्येक मुस्लिम तरुण जो संविधानासाठी लढत आहे, समानतेसाठी लढत आहे, त्याने राजकारण स्वीकारले पाहिजे. उमर तुरुंगात आहे, पण मला याची खंत वाटत नाही कारण तो लोकशाही हक्कांसाठी लढत आहे, तो आमच्या संघर्षाचा चेहरा आहे. भारतातील हक्कांबद्दल बोलणारे लोक तुरुंगात गेले आहेत. नेहरू, गांधी, मौलाना आझाद आणि भीमराव आंबेडकर यांसारख्या नेत्यांनाही तुरुंगात पाठवण्यात आले.

उमरने हिंमत सोडली नाही
उमर खालिदचे कुटुंबीय आणि मित्र सांगतात की, तुरुंगात असूनही त्याने आपली हिंमत सोडली नाही. खालिद तुरुंगात पुस्तके वाचतो आणि आतापर्यंत 70 हून अधिक पुस्तके त्यांनी वाचली आहेच. तो दर आठवड्याला त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलतो. दराब फारुकी म्हणतात, 'व्हिडिओ कॉल दरम्यान, आम्ही उमरला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होतो, पण खरं तर तो आम्हाला प्रोत्साहन देत होता.'

उमर खालिदचे मित्र फहाद अहमद यांच्या मते, मुस्लिम तरुणांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी संघर्ष चालू ठेवला पाहिजे.
उमर खालिदचे मित्र फहाद अहमद यांच्या मते, मुस्लिम तरुणांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी संघर्ष चालू ठेवला पाहिजे.

कन्हैया संधीसाधू राजकारण करत आहे?
उमर खालिदचे वडील कन्हैया यांच्यावर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप करत म्हणाले, 'कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे नेता होते आणि नंतर भाकपमध्ये सामील झाले. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती, त्यांनी निवडणूकही लढवली. कन्हैया यांनी भाकप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचे कारण त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना भाकपमध्ये त्यांचे भविष्य दिसत नव्हते. आपले भवितव्य केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते आणि आपण कोणत्याही निवडणूका जिंकू शकतो याची त्यांना जाणीव झाली असावी.'

बातम्या आणखी आहेत...