आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Kanta Pathak Of Wardha Has Been Making Ganesh Idols For 38 Years, This Year 10 Out Of 50 Idols Were Sold

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:काेराेनाच्या संकटात वर्षभराची 22 हजारांची पदरमोड गेली, तरी बाप्पाच्या सेवेचे समाधान

आशिष पावडे | वर्धा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातीपासून गणेशमूर्ती साकारल्यानंतर रंगवताना कांता व त्रिकेश.
  • वर्ध्यातील कांता पाठक 38 वर्षांपासून साकारताहेत गणेशमूर्ती, यंदा 50 पैकी 10 मूर्ती विकल्या
  • बहिणीच्या निधनानंतर कांता यांनी आई बनून दोन मुलांची सांभाळली जबाबदारी

वर्धा शहराजवळ राहणाऱ्या सिंदी मेघे येथील मूर्तिकार कांता राजाभाऊ पाठक यांचे वय ५८ वर्षे. वयाच्या १८ व्या वर्षी लग्नानंतर अवघ्या काही कालावधीनंतर पतीचे निधन झाले. त्यानंतर माहेरी येऊन वृद्ध आईसह बहिणीच्या दोन मुलांचा त्या सांभाळ करत आहेत. आयुष्यातील पदोपदी आव्हानांचा सामना त्यांना करावा लागतोय. पण न डगमगता त्या आजही संकटांना सामोरे जात आहेत. यावर्षी त्यांनी मातीच्या ५० गणेशमूर्ती घडवल्या. लाॅकडाऊनमध्ये यातल्या १० मूर्तीच विकल्या गेल्या. वर्षभराची २२ हजारांची पदरमोडही गेली. ३८ वर्षांपासून मूर्ती घडवताना अनेकदा ताेटा सहन करावा लागला. पण बाप्पाच्या सेवेत एका वर्षही त्यांनी खंड पडू दिला नाही. बाप्पाच जगण्यासाठी प्रेरणा देताे आणि मार्गही दाखवताे असे म्हणत त्या ही कला जाेपासत आहेत.

वर्ध्याजवळ सिंदी मेघे येथे कांता यांचे वडील बळीरामजी बोरसरे मूर्तिकार म्हणून काम करायचे. कांता यांना मूर्ती घडवण्याच्या कलेचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह यवतमाळ येथील राजाभाऊ पाठक यांच्याशी झाला. काही कालावधीनंतर पतीचे निधन झाले व त्या वडिलांकडे राहायला आल्या. काही वर्षांपूर्वी कांता यांची बहीण व त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांची दाेन मुले दुर्गेश (२३) व त्रिकेश (२०) यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. गणेशमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती व माठ त्या बनवतात.

दरवर्षी बनवतात मातीच्याच मूर्ती

कांता यांनी कधीही पीओपीच्या गणेशमूर्ती घडवल्या नाहीत. सिंदी मेघे येथून ८० किलाेमीटर दूर सावरगावला जाऊन माती आणून मूर्ती साकारणे खूप कष्टाचे आहे. पण पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्या म्हणतात. विशेष त्यांनी साकारलेल्या मूर्ती मातीपासून बनलेल्या असल्या तरी पीओपीसारखी फिनिशिंग दिसते.

वडिलांचा वारसा जपला

कांता यांनी बालपणापासून आपल्या वडिलांना मूर्ती साकारताना पाहिले होते. त्यामुळे त्यांना यात आपसुकच रुची निर्माण झाली व तो वारसा त्यांनी आजपर्यंत जपला.