आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकपिल शर्मा... ज्याला कॉमेडी किंग ऑफ इंडियाचा किताब देण्यात आला आहे. आज भलेही ओटीटीचा काळ आहे. मात्र आजही कुटुंब सोबत असताना 'द कपिल शर्मा शो' बघितला जातो. तसे भारतात अनेक कॉमेडियन स्टार्स बनले आहेत मात्र कपिल कॉमेडी इंडस्ट्रीचे ते नाव आहे, जे स्टारडमच्या बाबतीत मोठमोठ्या सुपरस्टार्सच्याही पुढे आहे.
आज गाव असो वा शहर, क्वचित एखादे घर असेल जिथे टीव्हीवर कपिल शर्मा शो बघितला जात नसेल. सध्या कपिल शर्मा आपला नवा चित्रपट झ्विगाटोमुळे चर्चेत आहे. आज लक्झरी लाईफमध्ये जाणून घ्या भारताला हसवणाऱ्या कपिल शर्माच्या आलिशान जीवनाविषयी...
10 वीनंतर टेलिफोन बूथवर काम केले
कपिल शर्मा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील पोलिसांत हेड कॉन्स्टेबल होते. एका मुलाखतीत कपिलने सांगितले होते की 10 वीच्या परीक्षेनंतर त्याने टेलिफोन बूथवर काम केले होते. वास्तविक त्याला एक म्युझिक प्लेअर खरेदी करायचे होते. त्याची किंमत 3000 रुपये होती.
कपिल रोज टेलिफोन बूथवर काम करायचा. तिथे त्याला 70 ते 80 रुपये रोज मिळायचे. यानंतर कपिलच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. कपिल 16 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांना शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले.
कपिल सांगतो की कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. एक वेळ अशी होती की कपिलच्या वडिलांना असह्य वेदना होत होत्या आणि कुणीही त्यांची मदत करू शकत नव्हते. यानंतर 2004 मध्ये कपिलच्या वडिलांचे निधन झाले.
पहिल्यांदा लाफ्टर चॅलेंज जिंकल्यावर प्राईझ मनीतून बहिणीचे लग्न केले
वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलने मुंबईत आपले करिअर बनवण्याचा विचार केला. एकदा अमृतसरमध्ये लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन होत होते. कपिल सांगतो की जेव्हा तो अमृतसरमध्ये ऑडिशन द्यायला गेला, तेव्हा भीतीने त्याने वाईट ऑडिशन दिली आणि पहिल्या फेरीतच तो रिजेक्ट झाला.
यानंतर तो पुन्हा दिल्लीला लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन द्यायला गेला आणि यावेळी तो सिलेक्ट झाला. रंजक म्हणजे तो केवळ यासाठी सिलेक्टच झाला नाही, मात्र नंतर लाफ्टर चॅलेंजचा विजेताही बनला. तिथे त्याला 10 लाख रुपये प्राईझ मनी मिळाली. त्याच्या आधी पैसे नसल्याने कपिलच्या बहिणीचे लग्न लांबणीवर पडले होते.
लाफ्टर चॅलेंजमध्ये जिंकल्यानंतर कपिलने मिळालेले सर्व पैसे बहिणीच्या लग्नासाठी लावले. यानंतरच त्याच्या करिअरला वेग मिळाला.
पंजाबमध्ये आलिशान फार्म हाऊस आणि मुंबईत अपार्टमेंटचा मालक आहे कपिल
आपल्या स्ट्रगलविषयी कपिल एकदा म्हणाला होता की 'स्ट्रगल ही माझ्या आयुष्यातील गुंतवणूक आहे.' याच गुंतवणुकीने आज कपिलला इतके यश दिले आहे की एका वर्षात तो 15 कोटी आयकर भरतो. संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास कपिलकडे पंजाब आणि मुंबईत आलिशान प्रॉपर्टी आहे. त्याचे पंजाबमध्ये आलिशान फार्महाऊस आहे.
सुट्यांमध्ये कपिल अनेकदा आपल्या या फार्महाऊसमध्ये वेळ घालवताना दिसतो. या बंगल्याची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. याशिवाय कपिलकडे मुंबईच्या अंधेरीत लक्झरियस अपार्टमेंटही आहे. कपिल याच अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतो. डिएलएच एन्क्लेव्हमधील या अपार्टमेंटची किंमत 15 कोटी रुपये आहे.
5.5 कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे कपिल
गेल्या 10-12 वर्षांपासून कपिल शर्मा टेलिव्हिजिन इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सध्या तो आपला शो 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेतो. शूटिंगमुळे कपिल आपला बहुतांश वेळ सेटवरच घालवतो. शुटिंगचा अनुभव चांगला करण्यासाठी कपिलने 5.5 कोटी रुपयांची लक्झरियस व्हॅनिटी व्हॅन स्वतःसाठी बनवली आहे.
ही व्हॅनिटी व्हॅन प्रसिद्ध ऑटोमोबाईल डिझायनर दिलीप छाब्रियांनी डिझाईन केली आहे. छाब्रियांनी वोल्वो बसला एका 5 स्टार लॅव्हिश व्हॅनिटी व्हॅनमध्ये कस्टमाईझ केले आहे. दिलीप छाब्रियांची कंपनी डीसी डिझाईननेच शाहरूख खानची व्हॅनिटी व्हॅनही डिझाईन केली आहे.
मर्सिडिजपासून वोल्वोसारख्या लक्झरी कार्सचा मालक आहे कपिल
माध्यमांतील वृत्तांनुसार कपिलची एकूण संपत्ती 330 कोटी रुपये आहे. अशात कपिलकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन नसेल, असे होऊ शकत नाही. कपिलकडे सव्वा कोटींची वोल्वो एक्स सी 90 आणि 1 कोटी 20 लाखांची मर्सिडिज बेन्झ एस350 सीडीआय आहे.
या लक्झरी कार्सच्या आधी कपिलने 2013 मध्ये रेंज रोव्हर इव्होक खरेदी केली होती. तेव्हा त्याने ही कार सुमारे 60 लाख रुपयांत घेतली होती. याशिवाय कपिलला बुलेट चालवण्याचाही शौक आहे. तो सहसा मुंबईतील रस्त्यांवरून बुलेट चालवाताना दिसतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.