आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यूED ला BJP नेत्यांच्या घराचा रस्ता माहित नाही:सिब्बल म्हणाले- तपास संस्था राजकीय झाल्या, BJP च्या इशाऱ्यावर चालतात

लेखक: वैभव पळनीटकर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2024 मध्ये मोदींच्या विरोधात कोण? विरोधकांसमोर हा पुन्हा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर शोधण्यासाठी कधी पाटणा, कधी चेन्नई तर कधी हैदराबादेत भेटी-गाठी होत राहतात. मात्र खरा प्रश्न काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी विचारला, ठिकाण होते पाटणा. विरोधी नेते माकपच्या राष्ट्रीय अधिवेशनात एकत्र आले होते. यात सलमान खुर्शीद यांनी विचारले, 'आधी I Love You कोण म्हणणार?'

सलमान खुर्शीद यांच्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. मात्र काँग्रेसमध्ये त्यांचे सहकारी राहिलेले कपिल सिब्बल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी नवीन संघटना उभारली आहे. 'इन्साफ के सिपाही'. यानिमित्ताने ते विरोधी पक्षांना एकत्र आणत आहेत. सिब्बल 11 मार्च रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर 'न्यू व्हिजन ऑफ इंडिया' सांगणार आहेत.

वाचा याच मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांच्याशी खास चर्चा...

प्रश्नः तुम्ही सुमारे 32 वर्षांपासून राजकारणात आहात, मात्र केवळ दोन वेळाच निवडणुकीत विजयी झाले, तुम्हाला पॅराशूट कँडिडेटही म्हटले जाते. तुम्हाला कोणताही जनाधार नाही. मग इतर नेते तुमच्यासोबत का येतील?

उत्तरः मी कोणतीही पार्टी चालवत नाही. पक्षाच्या यंत्रणेत किनाऱ्यावरच राहिलो आहे. पक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची समीकरणे असतात. कुठे जातीवर राजकारण चालते, कुठे दुसरे निकष असतात, मात्र हे सर्व पक्षांचे निर्णय आहेत, त्यावर मी काय बोलणार?

प्रश्नः तुमच्या व्यासपीठाला काँग्रेस, AAP, SP, RJD, JMM ने पाठिंबा दिला आहे. ही भाजपविरोधातील विरोधकांची नवी आघाडीच वाटत आहे.

उत्तरः माझे व्यासपीठ तेव्हाच यशस्वी ठरेल, जेव्हा सर्व पक्ष अन्यायाविरोधात लढा देतील. बंगालमध्ये ममता, महाराष्ट्रात उद्धव, केरळमध्ये माकप, बिहारमध्ये तेजस्वी, युपीत अखिलेश, झारखंडमध्ये हेमंत सोरेन, काश्मिरात फारूख साहेब यांच्यावर अन्याय होत आहे. जर आम्ही या विरोधात न्यायाच्या व्यासपीठावर आलो तर हा एक राष्ट्रीय मुद्दा बनू शकतो.

प्रश्नः नितीश, ममता, केसीआर, अखिलेश, स्टॅलिन, महबूबा मुफ्ती हे सर्व खरेच एका मंचावर येऊ शकतात का? हे आपली राजकीय महत्वाकांक्षा विसरतील असे तुम्हाला वाटते का?

उत्तरः इतके पक्ष सर्व मुद्द्यांवर एकत्र येतील हे शक्यच नाही. प्रत्येक राज्याची वेगळी समस्या आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता आणि भाजपत थेट लढाई आहे, इथे काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही. बंगालची लढाई तिथेच लढली जाईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी भाजपविरोधात लढेल. यासाठी विरोधी पक्ष एका व्यासपीठावर आले तर ही लढाई प्रत्येक प्रदेशात वेगवेगळीच लढावी लागेल.

प्रश्नः जागा वाटपासारख्या मुद्द्यावर विरोधकांत फूट पडते आणि भाजपला फायदा होतो?

उत्तरः तुम्ही जागा वाटपावर बोलत आहात, मी याला न्यायाची लढाई मानतो. विद्यमान सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. आपल्या संस्था, ईडी, सीबीआय सरकारला साथ देत आहेत. खरी लढाई हीच आहे. जागावाटपाविषयी बोलायचे झाल्यास पक्ष स्वतः भेटून त्यावर निर्णय घेतील, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही.

प्रश्नः तुम्ही 10 वर्षे मंत्री राहिला, तुम्हा वाटते का ईडी-सीबीआय सरकारच्या बाजूने कारवाई करत आहे? अशी कारवाई तुमच्या कालखंडातही होत होती?

उत्तरः जर तुम्ही भारताचा नकाशा बघितला तर ईडीने तो नकाशा विभागल्याचे दिसेल. जिथे भाजपचे सरकार आहे तिथे त्यांचा मार्ग जात नाही. जिथे विरोधी नेते आहेत तिथल्या गल्लीबोळात ते जातात. हे सर्वकाही भाजपच्या इशाऱ्यावर होत आहे. भाजपला वाटते की निवडणूक येत आहे सिसोदीयाला आत टाका, शिबू सोरेनविरोधात लोकपालला नोटिस द्या, लालूजींची चौकशी करा, केंद्रीय संस्था राजकीय झाल्या आहेत.

प्रश्नः तुमची आणि अरविंद केजरीवाल यांची जवळीक वाढली, तेव्हा भाजपने 14 मे 2014 रोजीचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात केजरीवाल तुम्हाला सर्वात मोठे भ्रष्टाचारी म्हणत होते. हे सर्व कसे बदलले? तुम्ही कदाचित त्यांच्याही केस लढत आहात?

उत्तरः आम्ही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात याच प्रकरणात केस केली होती. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की त्यांनी स्वतःहून नव्हे तर कुणाच्या तरी सांगण्यावरून असे म्हटले होते. त्यानंतर प्रकरण मिटले. मी राजकारणात आजपर्यंत वैयक्तिक आरोप केले नाही. त्याने काही फायदा होत नाही. मी मोदींविरोधात आहे, पण माझा त्यांच्यावर कोणताही वैयक्तिक आरोप नाही.

प्रश्नः 2011 मध्ये तुम्ही मंत्री होते, तेव्हा टॅब्लेटचे आश्वासन दिले होते. डेटाविंडला 14 लाखांची प्री-ऑर्डरही मिळाली होती. नोव्हेंबर 2012 पर्यंत 10 हजारही पोहोचू शकले नाही. त्या प्रकल्पाचे काय झाले? एखाद्या विद्यार्थ्याला हे टॅब्लेट मिळाले का?

उत्तरः नवे सरकार आल्यावर ते रखडले. नवे सरकार आल्यावर अनेक योजनांची नावे बदलली. याविषयी मी 11 मार्च रोजी जंतर-मंतरवर बोलणार आहे.

प्रश्नः तुमच्या व्यासपीठाच्या वेबसाईटवर लिहिले आहे की ज्युडिशियल सिस्टिम ची ओव्हरहॉलिंग करायची आहे. तुम्ही 50 वर्षांपासून वकील आहात. तुमचे वडीलही वकील होते, तुमचा मुलगाही वकील आहे. तुम्हाला आता वाटत आहे की न्यायव्यवस्था प्रदूषित आहे. जेव्हा तुम्ही मंत्री होते, तेव्हाही ही अशीच होती की अलिकडेच झाली आहे?

उत्तरः मी नेहमीपासून यासाठी आवाज उठवला आहे. आम्ही प्रयत्नही केले आहेत. ज्युडिशियल सिस्टिममध्ये अनेक उणीवा आहेत आणि या आता वाढत आहेत. जर जनतेचा कोर्ट आणि न्यायाधीशांवरील विश्वास उडाला तर लोकशाहीत यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही.

प्रश्नः 'इन्साफ के सिपाही' कोण असतील आणि ते कसे काम करतील?

उत्तरः इन्साफची यंत्रणा पूर्णपणे विकेंद्रितपणे काम करेल. इन्साफ का सिपाही कुणीही होऊ शकेल. तो तृणमूलचा असू शकतो, काँग्रेस, माकप कुणाचाही असू शकतो. राजकीय पक्ष कोणताही असो, मात्र ते इन्साफच्या मंचसाठी काम करू शकतात.

प्रश्नः राहुल गांधींनी तुम्हाला सल्ला मागितला की विरोधकांना कसे एकत्र आणावे, तर काय उत्तर द्याल?

उत्तरः राहुल गांधींना म्हणेल की 'इन्साफ के सिपाही' बना.

कपिल सिब्बल यांच्या आधीही अनेक नेत्यांनी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या 4 प्रसंगांविषयी वाचा, जेव्हा विरोधी पक्षाचे नेते एका मंचावर आले होते...

1. 23 मे 2018: कर्नाटकात काँग्रेस-जेडी(एस) सरकार स्थापन झाल्यावर

या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि मायावती यांच्या भेटण्याच्या शैलीची खूप चर्चा झाली होती, कारण मायावतींचा पक्ष बसपा वर्षभरापूर्वी झालेल्या यूपी निवडणुकीत पराभूत झाला होता. त्यांना केवळ 19 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ही निवडणूक सपासोबत लढवली होती.
या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि मायावती यांच्या भेटण्याच्या शैलीची खूप चर्चा झाली होती, कारण मायावतींचा पक्ष बसपा वर्षभरापूर्वी झालेल्या यूपी निवडणुकीत पराभूत झाला होता. त्यांना केवळ 19 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ही निवडणूक सपासोबत लढवली होती.

जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत युती केल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जेडीएसचे 37 आणि काँग्रेसचे 78 आमदार होते. असे असूनही, भाजपला 104 जागांसह सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनवण्यास मान्यता दिली होती.

सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात एक मजबूत विरोधी आघाडी म्हणून या मेळाव्याकडे पाहिले जात होते, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

पुढे काय झाले: 23 मे 2019 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने 303 जागा जिंकल्या. एनडीएला 353 जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या.

2. 27 ऑगस्ट 2017: पाटणा येथे लालूंच्या सभेत

लालूंच्या रॅलीबद्दल असे बोलले जात होते की, पहिल्यांदाच सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती एकाच मंचावर येतील. नंतर मायावतींनी सभेला येण्यास नकार दिला.
लालूंच्या रॅलीबद्दल असे बोलले जात होते की, पहिल्यांदाच सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती एकाच मंचावर येतील. नंतर मायावतींनी सभेला येण्यास नकार दिला.

पाटणाच्या गांधी मैदानात आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून नव्या महाआघाडीचा मार्ग तयार केला. या रॅलीला 'देश वाचवा-भाजपला हटवा' असे नाव देण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यात सहभागी झाले होते. सोनिया आणि राहुल गांधी यांचे रेकॉर्डेड संदेश रॅलीत ऐकवण्यात आले.

पुढे काय झाले: बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 125 जागा, भाजपला 74, जेडीयूला 43 जागा मिळाल्या. RJD सर्वात मोठा पक्ष ठरला, 75 जागा जिंकल्या.

3. 18 जानेवारी 2023: तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. यानंतर केसीआर यांचे हे पहिलेच शक्ती प्रदर्शन होता. यामध्ये अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासह चार राज्यांचे मुख्यमंत्री पोहोचले होते.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. यानंतर केसीआर यांचे हे पहिलेच शक्ती प्रदर्शन होता. यामध्ये अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासह चार राज्यांचे मुख्यमंत्री पोहोचले होते.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खम्मममध्ये सभा घेतली. यात सपा प्रमुख अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि कम्युनिस्ट नेते डी राजा उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी हजर राहिल्या नाहीत आणि नितीश कुमार यांना बोलावण्यात आले नाही. यात काँग्रेसचाही सहभाग नव्हता.

4. 1 मार्च 2023: स्टॅलिन यांचा 70 वा वाढदिवस

स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी पट्ट्यातील बडे नेते चेन्नईत पोहोचले होते. मात्र, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी पट्ट्यातील बडे नेते चेन्नईत पोहोचले होते. मात्र, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त द्रमुकने मोठी रॅली काढली. स्टॅलिन यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लाही सामील झाले होते. यादरम्यान स्टॅलिन म्हणाले होते की, पक्षांनी मतभेद बाजूला ठेवत भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, तिसऱ्या आघाडीची चर्चा बेईमानी आहे.

ही बातमीही वाचा...

MP, छत्तीसगड, कर्नाटकात BJP संकटात:MP त केवळ 80 जागा, छत्तीसगडमध्ये CM फेस नाही; कर्नाटक जिंकणे कठीण

बातम्या आणखी आहेत...