आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Kerala Monsoon 2021 News: Skymet Vs IMD Southwest Monsoon Rainfall Prediction Comparison Update | Skymet Weather Latest News Today

दिव्य मराठी विशेष:5 वर्षांनंतर यंदा मान्सून समाधानकारक; सरासरीच्या 103 टक्के पावसाचा अंदाज, जाणून घ्या किती अचूक असतात स्कायमेट आणि हवामान विभागाचे मान्सूनविषयक दावे?

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेव्हा सरकार अंदाज वर्तवते तर खासगी एजन्सीच्या अंदाजांची आवश्यकता का असते?

स्कायमेटने 2021 च्या मान्सूनचे आकडे जाहीर केले आहेत. पाच वर्षानंतर मान्सून पुन्हा जोरदार होण्याचा अंदाज आहे. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार 2021 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. कमी-जास्त पावसाचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो, कारण मान्सूनच्या परिस्थितीवरुन दुष्काळ असेल की पूर येईल याचा अंदाज वर्तवला जातो.

यावर्षी पावसाळ्याचा सुरुवातीचा महिना जून आणि शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये देशभरात व्यापक पावसाची चिन्हे आहेत. 96 टक्के ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस सरासरी किंवा सामान्य पावसाळा म्हणून परिभाषित केला जातो. नैऋत्य मान्सून साधारणत: 1 जूनच्या आसपास केरळमार्गे भारतात प्रवेश करतो. पावसाळ्याच्या 4 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरअखेर मान्सून राजस्थानमार्गे परत येतो.

हवामानाची माहिती देणारी स्कायमेट ही एक खासगी भारतीय संस्था पावसाळ्याच्या दोन महिन्यांआधीच म्हणजेच एप्रिलमध्ये दरवर्षी मान्सून (जून ते सप्टेंबर) कसा असेल, याचा अंदाज वर्तवते. स्कायमेटचे जीपी शर्मा सांगतात की, अंदाज बांधण्यासाठी त्यांची हवामानशास्त्रज्ञांची टीम देशातील प्रत्येक 9 किलोमीटरनंतर तपासणी करते. तेथील हवेचा प्रवाह, तापमान, दबावाची स्थिती मोजतो आणि त्यावर आधारित त्याचा अहवाल तयार केला जातो.

त्याचप्रमाणे एप्रिल-मेमध्येच भारत सरकारचा हवामान विभाग (आयएमडी) देखील आपला अंदाज वर्तवतो. या दोघांच्या अलवालाच्या आधारावर शेती, पूर आणि आपत्तींची तयारी सुरू केली जाते. अशा परिस्थितीत या दोन संस्थांच्या आकडेवारीत किती अचूकता आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, बातमीच्या इमेजमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षात स्कायमेट, हवामान विभागाचा अंदाज आणि पावसाचा वास्तविक डेटा आकड्यांत दिला आहे.

गेल्या 10 वर्षातील सर्वात वाईट अंदाज 2015 मध्ये वर्तवला गेला होता
आकडेवारीनुसार 2015 स्कायमेटने एलपीएच्या तुलनेत 102% तर हवामान विभागाने 93% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, तर प्रत्यक्ष पाऊस एलपीएच्या तुलनेत केवळ 86% पडला होता. गेल्या 10 वर्षातील हा सर्वात वाईट अंदाज होता. त्यानंतर 16% कमी पाऊस पडला. जीपी शर्मा सांगतात की, केवळ केरळ आणि कर्नाटकमध्ये कमीतकमी 16% पाऊस कमी किंवा जास्त झाल्याने फारसा परिणाम होत नाही, परंतु राजस्थान आणि गुजरातमधील शेतक-यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. म्हणूनच पावसाळ्याबाबत अचूक अंदाज वर्तवणे फार महत्वाचे आहे.

ते म्हणतात, "चुका होण्याची शक्यता नेहमीच असते, कारण भारत केवळ संस्कृतीतच नाही तर वातावरणाच्या बाबतीतही खूप वैविध्यपूर्ण आहे. येथे वन, पर्वत आणि सपाट या तिघांचे समृद्ध मिश्रण आहे. त्यामुळे अगदी योग्य अंदाज लावणे फार कठीण आहे. '

पूर्वी प्रत्येक 27 किमी. नंतर तपासणी करीत असे स्कायमेट, आता लक्ष्य प्रत्येक 3 किमीचे भारतीय वायुसेनेत एअरमार्शल राहिलेले जीपी शर्मा म्हणतात की, पूर्वी स्कायमेट दर 27 किलोमीटर नंतरचा अंदाज वर्तवत असे, परंतु आता तांत्रिक विकासामुळे 9 किलोमीटपर्यंतचा अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे. मात्र हा शेवटचा टप्पा नाही. आता संस्थेचे ध्येय प्रत्येक तीन किमीच्या तपासणीपर्यंत पोहोचणे आहे आणि त्यानंतर अधिक अचूक माहिती दिली जाऊ शकेल. भारतातील पावसाचे एक प्रमुख कारण म्हणजे पाश्चात्य देशांमधील वारे. स्कायमेटच्या महेश पलावत यांच्या मते, आपल्या देशात पश्चिमेकडून पूर्वेकडे सतत वारे वाहत असतात. हे वारे युरोपियन देशांपासून सुरू होतात. इराक, इराण आणि पाकिस्तानमध्ये अशी डोंगरवाट नाही, ज्यामुळे त्यांची वाट अडेल. त्यामुळे जम्मूच्या पर्वतांना धडक दिल्यानंतर उत्तर भारतात बर्‍यापैकी पाऊस पडतो. यामुळे ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान पंजाब, हरियाणा आणि अगदी पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडतो, म्हणजेच हिवाळ्यातील पाऊस या कारणामुळे पडतो.

जी.पी. शर्मा म्हणाले की, भारतात जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. याकाळात बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वाफांमुळे पाऊस पडतो.

जेव्हा सरकार अंदाज वर्तवते तर खासगी एजन्सीच्या अंदाजांची आवश्यकता का असते?
स्कायमेटचे जीपी शर्मा म्हणतात की, यापूर्वी हवामानविषयक आकडेवारी आणि प्रत्यक्षात पावसाच्या आकडेवारीत बराच फरक होता. स्कायमेटने भारतात काम सुरू केल्यापासून हवामान खात्यानेही अत्यंत दक्षतेने काम सुरू केले आहे. खासगी एजन्सीच्या गरजेचा कोणताही थेट अर्थ नाही, परंतु वाढत्या स्पर्धेमुळे देशातील शेतकरी आणि लोकांना योग्य माहिती मिळाल्यास कोणतीही हानी होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...