आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंथनन बनवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण:येशूशी लग्नाच्या नावाखाली अनेक मुलींचा घेतला बळी, नेमकी प्रथा काय?

केरळ येथील मलबार येथून मनीषा भल्ला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटना 5 फेब्रुवारी 2019 रोजीची आहे. पोप फ्रान्सिस त्यांच्या विमानाने यूएईहून रोमला परतत होते. विमानात पत्रकारांनी त्यांना कॉन्व्हेंटमधील नन्सच्या लैंगिक शोषणाबाबत प्रश्न विचारले. पोप यांनी उत्तर दिले होय, हे खरे आहे. अलिकडच्या वर्षांत, भारत, लॅटिन अमेरिका, इटली आणि आफ्रिकेत बिशप आणि धर्मगुरूंकडून नन्सचे लैंगिक शोषण झाले आहे. ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी हे सत्य पहिल्यांदाच स्वीकारले.

नन म्हणजे पांढरा किंवा काळा गाऊन घातलेली स्त्री. डोके झाकलेले आणि गळ्यात एक क्रॉस लटकलेला दिसतो. कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चमध्ये त्या तुम्हाला अनेकदा दिसत असतील. सामान्य बोली-भाषेत, बरेच लोक त्यांना सिस्टर देखील म्हणतात, वास्तविक या सिस्टर नसतात, त्यापेक्षा वेगळ्या असतात.

धर्माच्या नावाखाली येशूशी लग्न करणाऱ्या आणि आपले संपूर्ण आयुष्य धर्माच्या सेवेसाठी वाहून घेणाऱ्या या महिला आहेत, पण या पवित्र परंपरेचे पालन करणाऱ्या नन्सचा मोठा वर्ग सर्व प्रकारच्या शोषणाला बळी पडतो.

आमच्या पंथ या सिरीजमध्ये नन्सचे जीवन जवळून पाहण्यासाठी मी केरळच्या मलबार भागात गेले. मी कालिकतच्या चहाच्या बागा, मुसळधार पाऊस आणि दाट धुके यातून मार्गक्रमण करत डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या वायनाडमधील मनंथवडी शहरात पोहोचले.

केरळमधील मनंथवाडी येथील सेंट जोसेफ कॅथेड्रल. या चर्चची स्थापना पोप पॉल VI यांनी 1973 मध्ये केली होती.
केरळमधील मनंथवाडी येथील सेंट जोसेफ कॅथेड्रल. या चर्चची स्थापना पोप पॉल VI यांनी 1973 मध्ये केली होती.

मनंथवाडीपासून सुमारे 15 किमी अंतरावर कराक्कमला शहर आहे, जिथे 58 वर्षीय नन लुसी कल्लापुरा यांचे कॉन्व्हेंट आहे. कॉन्व्हेंट म्हणजे नन्सना राहण्यासाठी खास जागा. ख्रिश्चन धर्मात, हे कॉन्व्हेंट तसेच असतात, जसे हिंदू धर्मातील मठ असतात.

फोनवर ल्युसी म्हणाली- कॉन्व्हेंटमध्ये येऊ नकोस, लोक तुला त्रास देतील आणि मलाही त्रास होईल. मी तुमच्या हॉटेल मध्ये येतो. थोड्या वेळाने लुसी साध्या सूट-सलवारमध्ये हॉटेलमध्ये आली.

लुसी ही Franciscan Clarist Congregation (FCC) ची आहे. कॅथलिक धर्मातील नन्स वेगवेगळ्या Congregation च्या असतात. Congregation म्हणजे जिथे ख्रिश्चन समाजातील लोक प्रार्थनेसाठी जमतात. हे त्यांच्या सामाजिक-धार्मिक कार्याच्या आधारावर विभागले गेले आहेत.

भारतात त्यांची नेमकी संख्या किती आहे याचा अंदाज नाही.

ल्युसी वयाच्या 17 व्या वर्षी FCC मध्ये सामील झाली होती. 11 भावंडांमध्ये ती सातव्या क्रमांकावर होती. ती सांगते- बालपणीच्या दिवसांची गोष्ट आहे. पाच नन्स आणि पुजारी नियमितपणे घरी येत असत. ते मला नन बनण्यासाठी प्रेरित करत. सतत माझे आणि माझ्या कुटुंबाचे ब्रेनवॉश करत होते.

ते धार्मिक ज्ञान देत असत आणि स्वर्गात जाण्याचे स्वप्न दाखवत होते. तेव्हा फार समज नव्हती. सततच्या ब्रेन वॉशमुळे स्वर्गाचा प्रश्नही मनात स्थिरावला, कारण फादर नरकाच्या भयंकर कथा सांगून लोकांना घाबरवायचे.

ल्युसीने दहावीनंतरच नन बनण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने विरोध केला, पण तीने ऐकले नाही नाही आणि शेवटी 1982 मध्ये 12वी नंतर कॉन्व्हेंटमध्ये गेली, जिथे ती तीन वर्षांनी नन बनली. यानंतर ल्युसीने सरकारी अनुदानित शाळेत इंग्रजी शिक्षिका म्हणून शिकवायला सुरुवात केली, परंतु तिचा संपूर्ण पगार कॉन्व्हेंटमध्ये जमा होत होता. तीला एक रुपयाही मिळाला नाही.

दरम्यान, सप्टेंबर 2018 मध्ये फ्रँको मुलाक्कलवर मिशनरीज ऑफ जीझसच्या 46 वर्षीय ननवर 13 वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. याच्या निषेधार्थ केरळच्या रस्त्यावर नन्स जमल्या. लुसीच्या नेतृत्वाखाली त्यांनी बिशपच्या अटकेची मागणी केली.

बिशपला अटक करण्यात आली होती, परंतु नंतर सोडून देण्यात आले. पीडित ननला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.

कॉन्व्हेंटमध्ये ल्युसीशी कोणी बोलत नाही. जेवायलाही मिळत नाही. त्यांना वाचनालय, स्वयंपाकघर, लोखंडी, बाग, वैद्यकीय कक्ष, प्रार्थना कक्षात प्रवेश नाही. त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

रात्री त्या ज्या ठिकाणाहून टॉयलेटला जातात त्या ठिकाणीही कॅमेरा आहेत. किमान तो कॅमेरा तरी काढून टाका, कारण रात्री ती शॉर्ट ड्रेसमध्ये टॉयलेटमध्ये जाते, असे तिचे म्हणणे आहे. सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे. तो कॅमेरा काढण्यासाठी तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे अर्जही केला, पण त्यावर कोणतीही सुनावणी झालेली नाही.

लुसीच्या म्हणण्यानुसार, नन्सला कोणतीही गोपनीयता नसते. जर एखाद्या ननने कॉन्व्हेंटच्या चार भिंतीच्या आत होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलले तर तिचा इतका छळ केला जातो की ती आत्महत्या करते. केरळमध्ये गेल्या 20 वर्षांत 28 नन्सनी आत्महत्या केल्या आहेत.

त्यानंतर मी एखाद्या सध्याच्या ननशी बोलायचे ठरवले. केरळमधील अनेक कॉन्व्हेंटला भेट दिली, पण नन्स जगापासून दूर आहेत. त्याचे संपूर्ण जीवन एक रहस्य आहे. जर एखाद्या ननने आवाज उठवला तर तिला एकतर कॉन्व्हेंटमधून हाकलून दिले जाते किंवा तिच्यावर अत्याचार केला जातो.

1992 मध्ये, कोटय्यमच्या 30 वर्षीय नन अभयाच्या अत्यंत क्लेशकारक हत्येने कॉन्व्हेंट आणि चर्च व्यवस्थेचा पर्दाफाश केला. आधी ही आत्महत्या मानली जात होती, मात्र जनतेच्या विरोधानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासात फादर थॉमस कुट्टूर आणि सिस्टर सेफी दोषी आढळले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, पण नंतर केरळ उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

अभयाचा दोष इतकाच होता की, तिने कोट्टायम येथील कॉन्व्हेंटमध्ये फादर आणि सिस्टर सेफीचे यांचे PIUS X नाते पाहिले होते.

सर्व प्रयत्नांनंतर, अ‍ॅडरसन कॉन्व्हेंटमधील एक नन एल्सी बोलण्यास तयार झाली, परंतु भिती इतकी होती की, अनेकदा विचारल्यानंतरही ती फक्त 'आय एम व्हेरी हॅप्पी, आय एम व्हेरी हॅप्पी...’ एवढेच उत्तर देत होती. ती प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळत होती, हे स्पष्ट जाणवत होते.

हातात प्रार्थनेचे पुस्तक घेऊन उभी असलेली नन एल्सी. वारंवार प्रश्न करूनही तिने कॉन्व्हेंटच्या जीवनाबद्दल काहीही बोलणे टाळले.
हातात प्रार्थनेचे पुस्तक घेऊन उभी असलेली नन एल्सी. वारंवार प्रश्न करूनही तिने कॉन्व्हेंटच्या जीवनाबद्दल काहीही बोलणे टाळले.

मनंथवाडीनंतर मी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील जॅसेमे राफॅल या ननला भेटायला गेले. 63 वर्षीय जॅसेमे तिच्या दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहते. कॉन्व्हेंटला 50 वर्षे दिल्यानंतर आता ती आजारी आहे. जॅसेमे यांनी त्यांच्या 'आमीन' या पुस्तकात कॉन्व्हेंट आणि चर्चमधील भ्रष्टाचार आणि त्यांच्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितले आहे.

जॅसेमेने कालिकत विद्यापीठातून एमफिल केले आहे. त्या त्रिशूरच्या विमला कॉलेजमध्ये उपप्राचार्य आणि सेंट मेरी कॉलेजच्या प्राचार्या होत्या. त्यांच्या कॉन्व्हेंटचे नाव मदर ऑफ कार्मेल काँग्रीगेशन आहे. त्यांनी शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यावर त्यांना वेडी ठरवण्यात आले. आणि कॉन्व्हेंटमधून बाहेर काढले गेले.

त्यांनी त्यांची नन बनण्याची कहाणी सांगितली. त्या म्हणतात, ‘जेव्हा मी येशूच्या प्रेमात पडले तेव्हा मी 17 वर्षांची होते. मला वाटत होते की, ते माझ्या स्वप्नात येत आहेत. त्यानंतर मी येशूची वधू होण्याचा निर्णय घेतला. हे मी माझ्या आईला सांगितल्यावर ती म्हणाली की, काही दिवसांनी तू हे सर्व विसरशील.

काही दिवसांनी मी पुन्हा आईला सांगितले की मी नन होणार आहे. ती म्हणली की तू अजून विसरली नाहीस का. तु ट्रेंडी कपडे, स्वादिष्ट अन्न आणि इतर सर्व गोष्टींशिवाय जगू शकशील का? अजूनही नीट विचार कर, पण मी येशूला वचन दिले होते.

त्यानंतर मी कॉन्व्हेंटमध्ये आले. माझ्यासोबत 14 मुली नन झाल्या होत्या. मात्र, काही वर्षांनीच मला कळले की येथे देव नाही. येथे बनावट मुखवटे घातलेले लोक आहेत.

नन्स एकमेकांना शिव्या देत आहेत, वाईट भाषेत बोलत आहेत. बिशप आणि पीस्ट हे या नन्सचे लैंगिक शोषण करत आहेत. कोणी चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असून ते घरी पाठवत आहे. हे पाहून आम्हाला धक्का बसला. हे सगळं बघण्यासाठी आपण नन्स झालो का? अशी चर्चा आम्ही आपसात करु लागलो.

पूर्वी लपून-छपून रडायचे. तेव्हा मला वाटले की येशू मला सांगतोय की, तू का बोलत नाहीस, चर्च आणि कॉन्व्हेंटमधील अन्यायाविरुद्ध बोल, प्रश्न विचार. मी येशूला म्हणाले मला शक्ती दे.

ती म्हणते - चर्च व्यवस्थेतील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकच देव आहेत. म्हणूनच मी अशा नरकापासून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी मला वेडी घोषित केले. त्यांना माझ्यावर उपचार करायचे होते, पण मी हेही ठरवले होते की मी कोणत्याही किंमतीत ते करणार नाही, कारण मी पूर्णपणे बरी होते. मी दिल्लीला गेले आणि 6 महिन्यांनी कॉन्व्हेंट सोडले.

कुटुंबात कुणाचे लग्न झाले तरी नन जाऊ शकत नाही

नन्ससाठी अनेक बंधने आहेत. उदाहरणार्थ, बिशप किंवा प्रीस्ट लग्नाला उपस्थित राहू शकतात, परंतु नन जाऊ शकत नाहीत. आपल्या कुटुंबातील कोणत्याही लग्न समारंभात त्यांना सहभागी होता येत नाही. त्या फक्त त्यांच्या कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू नंतर जाऊ शकतात.

बिशप किंवा प्रीस्ट काहीही परिधान करू शकतात, परंतु नन्सने नेहमी गाऊन घालणे आवश्यक आहे. बिशप किंवा प्रीस्ट चित्रपट पाहू शकतात, मजा करू शकतात, परंतु नन्सना तसे करण्याची परवानगी नाही. कॉन्व्हेंटमध्ये फक्त येस लॉर्ड चालते. म्हणजेच जे काही सांगितले जाते ते तुम्हाला करावे लागेल.

नन कॉन्व्हेंट आणि चर्चसाठी पैशाची व्यवस्था करते. ती शिक्षण, आरोग्य, धार्मिक कार्य सांभाळते. त्यांना वेगवेगळ्या कॉन्ग्रिगेशन मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात.

जगाने मदर तेरेसांसारख्या नन्सला वंदन केले आहे, पण हेही खरे आहे की, जेव्हा बहुतेक कॉन्व्हेंटच्या भिंतीतून गोष्टी बाहेर येऊ शकत नाहीत तेव्हा आत काय चालले आहे हे कोणाला कसे कळणार.

3 वर्षे आणि 3 वचन पूर्ण केल्यानंतर बनते नन

मानंथवाडी शहरातील कॅथोलिक चर्च. चर्चच्या या खास हॉलमध्ये बसून नन्स प्रार्थना करतात.
मानंथवाडी शहरातील कॅथोलिक चर्च. चर्चच्या या खास हॉलमध्ये बसून नन्स प्रार्थना करतात.

नन बनलेल्या बहुतेक मुली 17-18 वर्षांच्या असतात. त्यांच्यासाठी प्योरिटी म्हणजेच पवित्रता किंवा शुद्धता ही पहिली अट आहे.

नन बनण्यासाठी 3 ते 5 वर्षे लागतात. या काळात कडक शिस्तीचे पालन करावे लागते. बिशप आणि प्रीस्ट त्यांना वारंवार व्याख्याने देतात. त्यांना देव आणि देवदूतांबद्दल सांगितले जाते.

पहिले वर्ष aspirancy चा असते. यादरम्यान नन बनणाऱ्या मुलीला समाजानुसार जुळवून घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

दुसरे वर्ष postlancy चे असते. यामध्ये त्या समाजाचा अभ्यास करण्यावर भर दिला जातो.

तिसरे वर्ष novices (canonical and apostolic) चे असते. हे सर्वात कठीण वर्ष आहे. नन बनणाऱ्या मुलीला रात्रंदिवस प्रार्थना करावी लागते. तसेच त्यांना वर्षभर मौन राहावे लागते. ती फक्त तिच्या वरिष्ठांशी बोलू शकते.

यानंतर तिला नवीन नाव दिले जाते आणि येशूसोबत लग्नाची तारीख निश्चित केली जाते. सुमारे 4 तासांच्या समारंभानंतर, मुलगी येशूची पत्नी बनते.

पहाटे 5 वाजता उठणे. 5.30 पर्यंत प्रार्थनागृहात उपस्थित राहणे, प्रार्थना करणे, ध्यान करणे, न्याहारी करणे, कॉन्व्हेंटचे काम करणे, जे काही काम नेमून दिलेले आहे, तेच करावे लागते.

प्रत्येक ननला तीन शपथ घ्यावी लागतात-

1. chastity म्हणजे शुद्धता. नन कधीही कोणाशीही लग्न करणार नाही किंवा ती प्रेमसंबंधही ठेवणार नाही. तसेच ती कधीही कोणाशीही संबंध ठेवणार नाही.

2. poverty म्हणजे गरिबी. त्यांना नेहमी मागूनच जगावे लागेल.

3. obedience म्हणजे आज्ञाधारक. त्यांना नेहमी यस लॉर्ड म्हणावे लागेल.

नन्सला न्याय का मिळत नाही?

इंटरनॅशनल युनियन ऑफ सुपीरियर जनरल्स, जगातील कॅथोलिक महिलांच्या धार्मिक आदेशांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था, नन्सच्या शोषणाचा उघडपणे निषेध केला आहे. 2019 मध्ये त्यांनी सांगितले की, अनेक नन्स मौन आणि गुप्ततेच्या संस्कृतीच्या नावाखाली मौन बाळगतात. त्यामुळे अधिक शोषण होते. नन्सनी त्यांच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.

कोचीचे फादर ऑगस्टीन वट्टोली म्हणतात – कॉन्व्हेंटमध्ये नन्सच्या तक्रारींची व्यवस्था आहे, पण जर एखादी तक्रार समाजात कॅथलिक चर्चचे नाव खराब करते, तर ती दाबण्याचा प्रयत्न केला जातो. धर्मगुरुची तक्रार नरकात जाते, देव क्रोधित होतो, असा विश्वास कॅथलिक धर्मातही खोलवर रुजलेला आहे. यामुळे, बहुतेक नन्स अजिबात तक्रार करत नाहीत.

आधी नन असलेली जॅसेमे, आरोप करते की चर्च खूप शक्तिशाली आहेत. त्यांच्यासमोर सत्ता आणि सरकारचेही चालत नाही. आम्ही सर्वत्र तक्रारी केल्या, महिला आयोगाकडेही दाद मागितली, पण काही झाले नाही.

ती म्हणते की तुम्ही एकदा नन बनलात तर दोनच मार्ग आहेत. एकतर बाहेर अनामिक जीवन जगणे किंवा आत राहून शोषणाचे बळी होणे. जे बंड करतात त्यांना कॉन्व्हेंटमधून हाकलून दिले जाते. कमी शिकलेल्या किंवा मागासलेल्या जातीतील महिलांना व्यवस्थेनुसार स्वत:ला जुळवून घेणे भाग पडते.

त्यांनी सांगितले की, तिसरी व्हॅटिकन परिषद लवकरात लवकर बोलवावी अशी आमची मागणी आहे. ज्याला लग्न करायचे आहे, त्याला लग्न करण्याची परवानगी दिली पाहिजे. लग्नानंतर बिशप, प्रीस्ट किंवा नन बनण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता पंथ मालिकेच्या खालील 2 कथा देखील वाचा...

पारशी लोक प्रियजनांच्या मृतदेहाला हातही लावत नाहीत:9 फूट अंतरावरून दर्शन; मृतदेहात सैतान आहे का? तेही कुत्रा ठरवतो

मी दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर आहे. इथून बाहेर पडल्यावर मी मरीन ड्राइव्हला पोहोचते. तिथून समुद्राच्या पलीकडे कोपऱ्यात घनदाट जंगल दिसते. गाडीने तिथे पोहोचायला 20 मिनिटे लागली. मलबार हिल्सवर 55 एकरांवर पसरलेले हे जंगल कित्तेक वर्ष जुने आहे. ही डुंगरवाडी आहे. म्हणजे पारशी व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे शेवटचे सांसारिक पद.

पारशी व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी त्याचा मृतदेह येथे ठेवला जातो. येथून अरुंद रस्त्यावरून सुमारे 10 किलोमीटर चालत गेल्यावर भेटते - दखमा म्हणजेच टॉवर्स ऑफ सायलेन्स. जाळण्याऐवजी, गाडून टाकण्याऐवजी किंवा पाण्यात टाकण्याऐवजी, पारशी लोक मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये ठेवतात. असे का वाचा...

देवतांशी लग्न लावून लैंगिक अत्याचार:गरोदर राहिल्यास भीक मागायला सोडून देतात; वाचा, काय आहे मंदिरांमधील देवदासी प्रथा

देवदासी. हे नाव आपण सर्वांनीच ऐकले असेलच. काहींनी कथेत तर काहींनी चित्रपटात. देवदासी म्हणजे देवांच्या तथाकथित गुलाम ज्यांना धर्माच्या नावाखाली लैंगिक गुलाम म्हणून ठेवले जाते. ती म्हातारी झाल्यावर तीला भीक मागायला सोडून दिले जाते. आश्चर्यचकित होऊ नका ही प्रथा राजे-सम्राटांच्या काळातील नाही, आजही ती सुरू आहे. (पूर्ण वृत्त वाचा)

बातम्या आणखी आहेत...