आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यश. केजीएफच्या यशानंतर आता भारतीय सिनेमातील सुपरस्टारच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. यश आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण देशात रॉकी भाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. केजीएफ चॅप्टर-2 साठी त्याला 30 कोटींचा चेक मिळाला. कर्नाटकमधील मध्यमवग्रीय कुटुंबात जन्मलेला यश आज ब्रँड एन्डॉर्समेन्टसाठी सुमारे 60 लाख रुपये चार्ज करतो आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 57 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
आज लक्झरी लाईफमध्ये तीन चॅप्टरमधून जाणून घ्या यशचे आलीशान जीवन
स्वप्नासाठी शिक्षण सोडले
यश म्हणजेच केजीएफचा रॉकी भाई कर्नाटकच्या एका छोट्या गावात लहानचा मोठा झाला आहे. यशचे वडील कर्नाटकच्या सरकारी बस सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करायचे. मुलगा यशस्वी अभिनेता बनल्यानंतरही अनेक वर्षे ते ड्रायव्हरच राहिले. तर यशला मात्र लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 12 वीतच यशने ठरवले होते की तो भविष्यात चित्रपटांत हिरो होईल. या स्वप्नासाठी त्याने शिक्षण अर्ध्यातच सोडले. यशने अभिनेता व्हावे अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा नव्हती.
घर सोडून बंगळुरू गाठले
यशने घर सोडून बंगळुरू गाठले. फक्त 300 रुपये खिशात घेऊन अभिनेता होण्यासाठी तो कुटुंबापासून दूर आला. सुरुवातीला बंगळुरूतील एका थिएटर ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले. खूप दिवस स्ट्रगल केल्यावर त्याला थिएटरमध्ये काम मिळाले. यानंतर तो हळूहळू पुढे जात गेला. चित्रपटांत सहायक दिग्दर्शनही केले. यादरम्यान तो चित्रपट आणि मालिकांसाठी सातत्याने ऑडिशन देत होता.
2008 मध्ये पहिला चित्रपट रिलीज झाला
अनेक टीव्ही मालिकांत काम केल्यानंतर यशचा पहिला चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला. मोग्गिना मानसू नावाच्या या चित्रपटात यशने सहायक अभिनेत्याची भूमिका केली. यासाठी त्याला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर यशने मागे वळून बघितले नाही आणि तो सुपरस्टार झाला.
स्ट्रगल आणि यशादरम्यान भेटली जीवनसाथी राधिका
यश आणि त्याची पत्नी राधिकाची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. दोघेही सर्वप्रथम 2004 मध्ये नंद गोकुळच्या सेटवर भेटले होते. हळूहळू दोघांत मैत्री झाली. मैत्री घट्ट झाल्यावर यशने व्हॅलेंटाईन डे ला राधिकाला प्रपोज केले. राधिकाने 6 महिन्यांनंतर उत्तर दिले. अखेर यश आणि राधिकाने 9 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूत लग्न केले. आज राधिका आणि यशला दोन मुले आहेत. मुलाचे नाव यथार्थ आणि मुलीचे नाव आयरा आहे.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर मिळाले सर्वात मोठे यश
2008 पासूनच कन्नड सिनेमात सक्रीय असलेल्या यशला देशभरात ओळख मिळायला एक दशकाचा कालावधी लागला. 2018 मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ-1 चे देशभरात कौतुक झाले. कन्नड सिनेसृष्टीतील या चित्रपटाने जगभरात 250 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला.
केजीएफ-2 नंतर सर्वांच्या ओठांवर 'सलाम रॉकी भाई'
केजीएफ-1 च्या यशानंतर 2022 मध्ये केजीएफ-2 आला. या चित्रपटानंतर यशची क्रेझ इतकी वाढली की प्रत्येक जण त्याला 'सलाम रॉकी भाई' म्हणायला लागला. रिपोर्टनुसार 100 कोटींच्या बजेटमधून बनलेल्या या चित्रपटाने 1000 कोटींपेक्षाही जास्त वर्ल्डवाईड कलेक्शन केले.
केजीएफ-1 नंतर घेतले शानदार डुप्लेक्स
केजीएफ-1 च्या यशानंतर यशने 2021 मध्ये एक नवे डुप्लेक्स खरेदी केले. हे घर बंगळुरूतील विंसर मनोरजवळील प्रेस्टिज अपार्टमेन्टमध्ये आहे. याची सध्याची किंमत 8 ते 8.5 कोटी इतकी आहे. यश पत्नी राधिका आणि दोन मुलांसह इथे राहतो.
लक्झरी कारचा मालक
यशच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर इव्होकचा समावेश आहे. याची किंमत 60 ते 80 लाख आहे. या एसयुव्हीचा युएसपी तिचे एन्ड टू एन्ड सनरूफ आहे. लॉन्ग ड्राईव्हसाठी हे एक परफेक्ट पिक बनते. याशिवाय यशकडे दोन मर्सिडिजही आहेत. पहिली मर्सिडिज 5-सीटर GLC 250 Coupe आहे. हीची किंमत 78 लाख रुपये आहे. तर दुसरी मर्सिडिज कार आहे 7-सीटर Benz GLS 350D लक्झरी एसयुव्ही. हीची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे.
रॉकी भाई घड्याळांचाही शौकीन
यशची स्टायलिस्ट सानिया सरधरियाने एका मुलाखतीत सांगितले की फॅशनबद्दल यशची आवड साधी आहे. मात्र यश या सिंपल आणि सोबर स्टाईलला लक्झरी घड्याळांनी चार चांद लावतो. यशच्या हातावर अनेकदा स्टायलिश घड्याळे दिसतात. यशच्या घड्याळ्यांचा कलेक्शनमध्ये 17 लाख रुपयांची रोलेक्स जीएमटी मास्टर II, 5 लाख रुपयांची ब्रिटलिंग सुपरओसियन हेरिटेज 42 आणि 18 लाख रुपयांची ऑडिमर्स पिगुएट रॉयल ओक क्रोनोग्राफ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.