आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:खामगावच्या केळीची दिल्ली, जम्मू-काश्मीरला विक्री

नाना हिवराळे | खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2.5 एकरांत 5 लाखांहून जास्त उत्पन्न, 750 रुपये प्रतिक्विंटल भाव

परंपरागत शेतीला फाटा देत सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. दर्जेदार उत्पादनामुळे तालुक्यातील बोरजवळा येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर तोमर यांच्या शेतातील केळीने थेट दिल्ली अन जम्मू-काश्मीरला भुरळ घातली आहे. या केळीला ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून एकरी ३०० ते ३५० क्विंटल उत्पादन होत असल्याने शेतकरी तोमर यांना अडीच एकरात पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झाले आहे.

मागील दोन वर्षात पाऊस चांगला बरसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पुरेशी सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी नेहमीची पिके न घेता बागायतीकडे लक्ष वेधले आहे. यामध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील वर्णा, निमकवळा, कुंबेफळ, कोंटी, गेरू, सारोळा, बोरजवळा, पिंपळगाव राजा, वसाडी, ज्ञानगंगापूर, धानोरा, दिवठाणा, काळेगाव, रोहणा, पोरज, हिवरखेड, वाघळी, आंबेटाकळी, लाखनवाडा, चिंचपूर, गवंढाळा, जळका भडंग यासह इतर भागात १०० हेक्टरच्या जवळपास केळीची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील बोरजवळा येथील शेतकरी मधुकर तोमर यांनी यावर्षी अडीच एकर क्षेत्रात साडेतीन हजार केळी रोपांची लागवड केली होती.

सुरुवातीपासून तर केळी निघेपर्यंत त्यांना सव्वा लाखाच्या जवळपास मशागतीसाठी खर्च आला. केळीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी उत्पादन वाढीसाठी मेहनत घेतली. आपल्याच भागात केळी विकण्यापेक्षा परराज्यात केळी विक्री केली तर अधिकचा भाव मिळू शकतो. शेतकरी तोमर यांच्या केळीचा दर्जा उत्तम असल्याने त्यांच्या केळीला प्रति क्विंटल ७५० रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे केळी दिल्ली, जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशला विकली जात आहे. दरम्यान २७ डिसेंबर रोजी तोमर यांच्या शेतातील केळीची कटाई करण्यात आली. त्यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न अपेक्षित आहे.

मंदी असतानाही खान्देशातील केळी व्यापारी भरत सुपे यांच्या सहकार्याने आपल्या भागातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याचे केळी पुरवठादार शशिकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...