आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांच्या बळावर शेतकरी आंदोलन टिकले:पडद्यामागून लढा देणारे शेतकरी आंदोलनातील 5 हीरो, कुणी डॉक्टर तर कुणी आहे सैनिक

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यांच्यामुळे मोदी सरकारला नमते घ्यावे लागले.

ज्यांच्या बळावर वर्षभर शेतकरी आंदोलन टिकून राहिले ते लोक तुम्हाला माहित आहेत का? पडद्यामागून हा लढा सुरु ठेवणा-या त्या 5 व्यक्तिमत्त्वांची ओळख आम्ही तुम्हाला करून देत आहोत. त्यांच्यामुळे शेतकरी आंदोलन कमकुवत झाले नाही आणि पहिल्यांदाच मोदी सरकारला नमते घ्यावे लागले.

60 वर्षीय गुरनाम सिंग चढूनी हे भारतीय किसान युनियन हरियाणाचे अध्यक्ष आहेत. 10 सप्टेंबर 2020 रोजी हरियाणातील पीपली येथे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला तेव्हा त्यांनी शपथ घेतली की ते आंदोलन कमकुवत होऊ देणार नाही. त्यांनी हरियाणात आंदोलन सुरू केले. चढूनी यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती. ते अपक्ष उमेदवार होते.

दर्शन पाल हे एमबीबीएस, एमडी डॉक्टर आहेत. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि तेव्हापासून ते शेतकर्‍यांचा आवाज उठवत आहेत. डॉ. दर्शन पाल यांनी शेतकरी संघटनांमध्ये समन्वय निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते शेतकरी नेतृत्वातील अशा चेहऱ्यांपैकी एक आहेत जे प्रादेशिक भाषांबरोबरच इंग्रजीतही शेतकऱ्यांचे प्रश्न खंबीरपणे माध्यमांसमोर ठेवतात. डॉ. दर्शन पाल हे क्रांतिकारी किसान युनियनशी संबंधित आहेत.

बलबीर सिंग राजेवाल हे शेतकरी आंदोलनातील तो चेहरा आहे ज्यांना अमित शहा थेट फोन करतात. 77 वर्षीय बलबीर हे भारतीय किसान युनियनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी बीकेयूची घटनाही लिहिली आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांना वैचारिक किनार देण्यात आणि सरकारशी वाटाघाटीसाठी किमान अटी निश्चित करण्यात बलबीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते सध्या बीकेयू राजेवालचे अध्यक्ष आहेत.

भारतीय किसान युनियन (उगराह) ही पंजाबमधील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे. जोगिंदर सिंग हे त्याचे अध्यक्ष आहेत किंवा असेही म्हणता येईल की जोगिंदर यांनी स्वतः ही संघटना तयार केली आहे. ते निवृत्त सैनिक आहेत. त्यांच्या प्रभावामुळे ही संघटना अधिकाधिक लोकप्रिय झाली. महिला शेतकरीही संघटनेत सहभागी होऊ लागल्या. दिल्लीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांमध्ये जोगिंदर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

भारतीय किसान युनियन (उगराह) नंतर पंजाबमध्ये सर्वात मजबूत पकड असलेली शेतकरी संघटना म्हणजे भारतीय किसान युनियन (डकौंडा). जगमोहन सिंग हे या संघटनेचे नेते आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतरच जगमोहन सिंग यांनी आपले आयुष्य पूर्णपणे सामाजिक कार्यात वाहून घेतले. चळवळीत नवनवीन संघटनांना सहभागी करून घेण्यात आणि 30 हून अधिक शेतकरी संघटनांना एकत्र ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अजून पाच नावे आहेत. ज्यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. फ्रंटफूटवर येऊन त्यांनी ही लढाई लढवली. हे पाच चेहरे थेट सरकारला भिडले.

सध्याच्या शेतकरी आंदोलनाचे वर्णन फक्त पंजाब आणि हरियाणापुरतेच मर्यादित आंदोलन असे केले जात होते, पण हा समज राकेश टिकैत यांनी खोडून काढला. उत्तर प्रदेशातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन ते या आंदोलनात उतरले. ते भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत.

सुरजित कौर शेतकरी आंदोलनातील महिला चेहरा ठरल्या. शेतकरी आंदोलनात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी समोर येऊन सरकारवर थेट शब्दांत टीका करत राहिल्या. एक काळ असा होता की चळवळीचे नेतृत्व महिलांच्या हातात होते.

27 नोव्हेंबर 2020 रोजी हरियाणातील या तरुणाने हिवाळ्यात शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा वापर करणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर चढून त्याला कुलूप लावले होते. त्याचे नाव नवदीप. त्या घटनेनंतर, नवदीपवर हत्येचा प्रयत्न, जन्मठेपेची शिक्षा, दंगल आणि कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तेव्हापासून तो शेतकरी आंदोलन आणखी मजबूत करण्यात गुंतला.

हा तो चेहरा आहे ज्याला शेतकरी आंदोलनाला डिजिटल जगात पुढे नेणे आणि टूलकिट बनवल्याबद्दल अटक झाली होती. दिशा रवी असे तिचे नाव आहे.

या यादीत योगेंद्र यादव हे शेवटचे नाव आहे. शेतकरी आंदोलन मोठी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, नंतर हे शेतकरी आंदोलनातून बाहेर पडले होते.

बातम्या आणखी आहेत...