आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरमहाराणींच्या शाही जीवनाचे किस्से:कोहिनूरजडित मुकुट 4500 कोटींचा; 775 खोल्या व 78 बाथरूमच्या भव्य महालात वास्तव्य...

लेखक: अनुराग आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्कॉटलंडच्या 'बाल्मोरल कॅसल'मध्ये 8 सप्टेंबरला ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-II यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे 50 हजार एकरात पसरलेल्या 1,116 कोटी रुपयांच्या या भव्य किल्ल्याच्या मालकीण महाराणी एलिझाबेथ-II याच होत्या.
हा किल्ला केवळ एक वास्तू आहे. लंडनचे शाही कुटुंब आणि महाराणीच्या शाही जीवनात असे अनेक महाल, मुकुट, बग्गी, गाड्या होत्या. त्याचीच गोष्ट तुम्हाला सांगत आहोत...
लंडनच्या शाही कुटुंबाकडे 2.23 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या राजा किंवा राणीच्या नावे 28 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.23 लाख कोटींची संपत्ती आहे. यात दोन प्रकारच्या संपत्ती असतात...
पहिलीः शाही कुटुंबाच्या सर्वोच्च पदावरील 'द क्राऊन'च्या नावे असलेली संपत्ती.
दुसरीः त्या पदावर बसणाऱ्या राजा किंवा राणीची खासगी संपत्ती.
हे असे समजून घ्या की, बकिंघम पॅलेसचा किल्ला शाही कुटुंबाच्या सर्वोच्च पद 'द क्राऊन'च्या नावे असलेली संपत्ती आहे, तर स्कॉटलंडमधील 'बाल्मारोल कॅसल' एलिझाबेथ-II यांची खासगी संपत्ती आहे. तो आता त्यांच्या मुलाच्या नावे होईल.

‘बाल्मोरल कॅसल’बाहेर कुटुंबासोबत बसलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जुना फोटो. याच किल्ल्यात महाराणींनी अखेरचा श्वास घेतला.
‘बाल्मोरल कॅसल’बाहेर कुटुंबासोबत बसलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जुना फोटो. याच किल्ल्यात महाराणींनी अखेरचा श्वास घेतला.

क्राऊनच्या नावे जी संपत्ती आहे, ती त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीची खासगी संपत्ती नसते, तसेच ती संपत्ती सरकारचीही नसते. या संपत्तीवर क्राऊन स्टेट बोर्डाचे नियंत्रण असते.
आता पाहूया ब्रिटनचे राजे किंवा राणीच्या नावे जी एकूण 2.23 लाख कोटींची संपत्ती आहे, त्यात काय-काय आहे...
1. राजा किंवा राणीच्या क्राऊन पदाच्या नावे संपत्तीः 1.55 लाख कोटी
2. बकिंघम पॅलेसची एकूण किंमतः 39 हजार कोटी रुपये
3. डचेस ऑफ कॉर्नवालच्या नावे संपत्तीः 10 हजार कोटी रुपये
4. केनसिंग्टन पॅलेसची किंमतः 5 हजार कोटी रुपये
5. डचेस ऑफ लँकास्टरच्या नावे संपत्तीः 5.96 हजार कोटी रुपये
6. स्कॉटलंडमधील क्राऊनच्या नावे एकूण संपत्तीः 4.71 हजार कोटी रुपये

शाही कुटुंबाच्या बकिंघम पॅलेसचा फोटो. या महालात 775 खोल्या आणि 78 बाथरूम आहेत.
शाही कुटुंबाच्या बकिंघम पॅलेसचा फोटो. या महालात 775 खोल्या आणि 78 बाथरूम आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे 4 हजार कोटींची खासगी संपत्ती
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे 4 हजार कोटींची खासगी संपत्ती होती. यात त्यांची गुंतवणूक, कला, मौल्यवान दगड आणि रिअल इस्टेटचा समावेश आहे. सँडरिंघम हाऊस आणि बाल्मोरल किल्लाही महाराणींची खासगी संपत्ती आहे.
4500 कोटी रुपयांचा मुकुट घालत होत्या महाराणी
महाराणी एलिझाबेथ-II यांच्या शाही जीवनाची कल्पना यावरूनच केली जाऊ शकते की, त्या ज्या बकिंघम पॅलेसमध्ये गेल्या 70 वर्षांपासून राहत होत्या, त्यात 773 खोल्या आणि 78 बाथरूम आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मुकुटाला 2900 मौल्यवान रत्नांनी सजवण्यात आले आहे. या मुकुटाची किंमत सुमारे 4500 कोटी रुपये आहे. यात भारताचा कोहीनूर हिराही आहे.

1849 मध्ये शीखांसोबत झालेल्या दुसऱ्या युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीने शीख साम्राज्यासह कोहिनूर हिराही हस्तगत केला होता. नंतर लॉर्ड डलहौसीने कोहिनूर ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरियांना हा भेट म्हणून दिला.
1849 मध्ये शीखांसोबत झालेल्या दुसऱ्या युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीने शीख साम्राज्यासह कोहिनूर हिराही हस्तगत केला होता. नंतर लॉर्ड डलहौसीने कोहिनूर ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरियांना हा भेट म्हणून दिला.

मुकुटासह जर महाराणींकडे असलेल्या दूसऱ्या मौल्यवान रत्नांची किंमत जोडली तर ती सुमारे 31 हजार कोटी इतकी आहे. इतकेच नव्हे तर एलिझाबेथ यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या 200 हून जास्त हँडबॅग होत्या. ज्या त्या वापरत होत्या. महाराणी एलिझाबेथ-II यांना लँडरोव्हर कार खूप आवडायची. तिचे नाव डिफेंडर होते.

महाराणी एलिझाबेथ 1948 पासून लँड रोव्हर कार वापरतात. त्यांचे वडील किंग जॉर्ज VI यांना लँड रोव्हरची 100 वी गाडी भेट देण्यात आली होती. हा फोटो डिफेंडरमध्ये बसलेल्या महाराणी एलिझाबेथ यांचा आहे.
महाराणी एलिझाबेथ 1948 पासून लँड रोव्हर कार वापरतात. त्यांचे वडील किंग जॉर्ज VI यांना लँड रोव्हरची 100 वी गाडी भेट देण्यात आली होती. हा फोटो डिफेंडरमध्ये बसलेल्या महाराणी एलिझाबेथ यांचा आहे.
महाराणी एलिझाबेथ यांची शाही बग्गी. 4 टन वजनाची ही बग्गी 8 घोडे ओढायचे. महाराणी म्हणायच्या यातून प्रवास करणे खूप कठीण असायचे.
महाराणी एलिझाबेथ यांची शाही बग्गी. 4 टन वजनाची ही बग्गी 8 घोडे ओढायचे. महाराणी म्हणायच्या यातून प्रवास करणे खूप कठीण असायचे.

संपत्तीतील कमाईच्या केवळ 25% शाही कुटुंबाला मिळाले
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये शाही कुटुंबाशी संबंधित संपत्तीतून 3.78 हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. याचा केवळ 25% हिस्सा शाही कुटुंबाला मिळाला. उर्वरीत हिस्सा ब्रिटिश खजिन्यात जमा झाला.
शाही कुटुंबाच्या अनेक शाही परंपरा
ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या अनेक शाही परंपराही आहेत. शाही कुटुंबाच्या या परंपरा इतक्या मजबूत आहेत, की त्या तोडने कुणासाठीही खूप कठीण आहे. अशा तीन परंपरा आणि त्याच्याशी निगडीत घटनांविषयी आम्ही सांगत आहोत...
1. घटस्फोटीतेसोबतच्या प्रेमामुळे प्रिन्स हॅरींवर नाराज झाल्या होत्या महाराणी
ब्रिटनच्या शाही कुटुंबातील सदस्याचे कुणावर प्रेम जडले तर त्या व्यक्तीला मागणी घालण्यापूर्वी आधी महाराणींची परवानगी घ्यावी लागते. प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्केल यांचे नाते याला अपवाद आहे. शाही कुटुंब आणि महाराणींचा या नात्याला विरोध होता, कारण प्रिन्स हॅरींनी घटस्फोटीत महिलेसोबत लग्न करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. पण हॅरी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अखेर महाराणींनी याला मंजुरी दिली.
2. शाही परंपरा मोडल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका
शाही कुटुंबाची एक परंपरा अशीही आहे की, सार्वजनिक ठिकाणी कुणीही महाराणी किंवा राजाच्या पुढे चालू शकत नाही. इतके की, महाराणींचे पती प्रिन्स फिलिपही त्यांच्यापासून काही पावले अंतर ठेवूनच चालायचे. जुलै 2018 मध्ये एका सार्वजनिक समारंभादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पुढे निघून गेले होते, यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
3. किंग जॉर्ज-VI यांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ द्वितीय काळा ड्रेस घालू शकल्या नाही
शाही कुटुंबाची एक परंपरा आहे की, शाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यावर सर्व सदस्य काळ्या रंगाचे कपडे घालतात. 1952 मध्ये जेव्हा किंग जॉर्ज-VI यांचे निधन झाले, तेव्हा महाराणी एलिझाबेथ-II पती प्रिन्स फिलिप यांच्यासह केनिया दौऱ्यावर होत्या. जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली, तेव्हा शोकसभेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे काळा ड्रेस नव्हता. त्यामुळे लंडनला परतताना त्यांना दुसऱ्या रंगातील कपडे घालूनच परतावे लागले होते.

शाही कुटुंबातील सदस्य कुठे जात असेल तर काळ्या रंगाचे कपडेही सोबत घेऊन जातो. हातमोज्यांशिवाय कोणताही पोषाख पूर्ण होत नाही. कॉर्नेलिया जेम्स गेल्या 70 वर्षांपासून महाराणींचे हातमोजे बनवत आहेत.
शाही कुटुंबातील सदस्य कुठे जात असेल तर काळ्या रंगाचे कपडेही सोबत घेऊन जातो. हातमोज्यांशिवाय कोणताही पोषाख पूर्ण होत नाही. कॉर्नेलिया जेम्स गेल्या 70 वर्षांपासून महाराणींचे हातमोजे बनवत आहेत.
कोणत्याही देशाच्या दौऱ्यात महाराणींसोबत 34 लोक असतात. यात 6 सेक्रेटरी, 8 बॉडीगार्डस्, 2 ड्रेसर्सचा समावेश असतो.
कोणत्याही देशाच्या दौऱ्यात महाराणींसोबत 34 लोक असतात. यात 6 सेक्रेटरी, 8 बॉडीगार्डस्, 2 ड्रेसर्सचा समावेश असतो.
महाराणी एलिझाबेथ यांनी 1947 मध्ये हनीमूनसाठी ग्लोब-ट्रॉटरचा सुटकेस घेतला होता. तेव्हापासून त्या याच बॅगचा वापर करतात.
महाराणी एलिझाबेथ यांनी 1947 मध्ये हनीमूनसाठी ग्लोब-ट्रॉटरचा सुटकेस घेतला होता. तेव्हापासून त्या याच बॅगचा वापर करतात.
बातम्या आणखी आहेत...