आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशी कोणती गोष्ट आहे जी माणसाकडे असते पण परत मिळत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे वय. मग वय परत करणे, म्हणजेच कमी करणे शक्य आहे का? होय, हे शक्य आहे आणि दक्षिण कोरिया जानेवारी 2023 पासून ते करणार आहे. म्हणजेच ते त्यांच्या 5.7 कोटी नागरिकांचे वय एक ते दोन वर्षांनी कमी करणार आहे. मात्र, हे केवळ कागदावरच राहणार आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, दक्षिण कोरिया सरकारच्या निर्णयामुळे दक्षिण कोरियाचे नागरिक एक वर्षांनी कसे तरुण होतील?
प्रश्न-1: कोरियातील पारंपारिक पद्धत काय आहे, जी रद्द केल्याने त्या देशातील नागरिक एका वर्षांनी लहान होतील?
उत्तरः दक्षिण कोरियामधील वयाची गणना इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. येथे वय मोजण्यासाठी कोरियन पद्धतीचा वापर केला जातो. दक्षिण कोरियामध्ये जेव्हा मूल जन्माला येते त्याच वेळी त्यांचे वय एक वर्षाचे मानले जाते. दुसरीकडे, जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा मुलाच्या वयात आणखी एक वर्ष जोडले जाते, म्हणजेच ते मुल 2 वर्षांचा होते.
सोप्या भाषेत, 31 डिसेंबर रोजी मूल जन्माला आले तर त्याचे वय 1 वर्ष असेल. तर, 1 जानेवारीला तेच मूल 2 वर्षांचे होईल. म्हणजेच कोरियात 24 तासांत त्याचे वय 2 वर्षे होईल.
प्रश्न-2 : ही व्यवस्था का बदलली जात आहे आणि ते कधी होईल?
उत्तरः दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यूं सूक योल हे वय मोजण्याची ही पद्धत बदलण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. निवडणुकीदरम्यान, योल यांनी आश्वासनही दिले होते की, ते अध्यक्ष झाले तर ते ही पारंपारिक व्यवस्था संपवतील. तसेच जगातील इतर देशांप्रमाणे दक्षिण कोरियातील लोकांचे वय आंतरराष्ट्रीय वय प्रणालीवरून मोजले जाईल.
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणूक समितीचे प्रमुख ली योंग-हो यांनी अलीकडेच सांगितले की, नवीन सरकार जगातील इतर भागांप्रमाणेच देशात समान वय-गणना पद्धत लागू करू इच्छित आहे. वय मोजण्याच्या या पद्धतीमुळे शाळेत प्रवेश घेताना विशेषत: विद्यापीठात आणि देशाबाहेर नोकरी करताना अनेक अडचणी येतात, असे ते म्हणाले होते.
द कोरियन हेराल्डच्या म्हणण्यानुसार, कोविड लसीकरणाच्या वेळी या वर्षी जानेवारीमध्ये पारंपारिक प्रणाली रद्द करण्याच्या मागणीला वेग आला. यादरम्यान, आरोग्य प्राधिकरणाने कोविड लसीकरणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आंतरराष्ट्रीय वय प्रणाली तसेच कोरियन वय प्रणालीचा समावेश केला. त्यामुळे लोकांमध्ये वयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याच कारणामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा ठरला.
दक्षिण कोरियाच्या खासदारांनी गुरुवारी वय मोजण्याची पारंपारिक पद्धत कोरियन एज रद्द करण्यासाठी मतदान केले. जानेवारी 2023 पासून, दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणेच लोकांच्या वयाची गणना केली जाईल. म्हणजेच, जर एखाद्या मुलाचा जन्म 15 जून 2021 रोजी झाला असेल, तर ते मूल 15 जून 2022 रोजी एक वर्षाचे मानले जाईल.
प्रश्न-3: कोरिया वय मोजणीचे आंतरराष्ट्रीय मानक पाळत नाही का?
उत्तर : हो, ते पाळतात. वास्तविक, दक्षिण कोरियामध्ये वयाची गणना 3 प्रकारे केली जाते.
1. 1962 पासून, दक्षिण कोरिया कायदेशीर आणि प्रशासकीय हेतूंसाठी आंतरराष्ट्रीय वय मोजणी प्रणाली वापरते.
2. दुसऱ्या पद्धतीनुसार, जन्माच्या वेळी मुलाचे वय शून्य म्हणून घेतले जाते. वास्तविक, जेव्हा नवीन वर्ष म्हणजेच जानेवारी येते तेव्हा ते मूल 1 वर्षाचे होते.
आपण हे असे समजू शकता. जर एखाद्या मुलाचा जन्म 1 डिसेंबर 2021 रोजी झाला असेल तर 1 जानेवारी 2022 रोजी त्याचे वय 1 वर्षाचे होईल. दक्षिण कोरियाच्या सैन्यात भरती आणि गुन्हेगारांवर कारवाईसाठी वय मोजण्याची ही पद्धत अवलंबली जाते.
3. तिसरी आणि सर्वांवर लागू होणारी पद्धत आहे - मूल जन्माला येताच एक वर्षाचे होते. वय मोजण्याच्या या पद्धतीनुसार, जर एखाद्या मुलाचा जन्म डिसेंबरमध्ये झाला तर तो जानेवारीमध्ये 2 वर्षांचा होतो. मग त्याची जन्मतारीख काहीही असो. वास्तविक, दक्षिण कोरियामध्ये जन्मतारखेऐवजी नवीन वर्ष हा त्याचा वाढदिवस मानला जातो.
प्रश्न-4: इतर देश देखील कोरियन वय प्रणाली सारख्या पारंपारिक पद्धतींचे अनुसरण करतात का?
उत्तरः चीन, कोरिया, जपान आणि व्हिएतनाममध्ये पारंपारिक पद्धतीने वय मोजण्याची परंपरा आहे. चीन आणि जपानसह इतर देशांनी वय मोजण्याची ही पद्धत रद्द करून आंतरराष्ट्रीय वय मोजणी प्रणाली लागू केली आहे.
वास्तविक, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम अजूनही वय मोजण्याच्या या पारंपारिक पद्धतीचे पालन करतात.
प्रश्न-5: वय मोजण्याच्या पारंपरिक संकल्पनेत काय अडचण आहे?
उत्तरः अलीकडेच पगारासंबंधीत वादाचे एक प्रकरण दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले. कंपन्यांनी पगार वाढवताना कर्मचाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वय लक्षात घेतले पाहिजे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
काही पालक बनावट प्रमाणपत्रे बनवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मुलाच्या प्रवेशात आणि नंतर नोकरीत कोणतीही अडचण येऊ नये. त्यामुळे त्यात बदल करण्याचे काम सुरू आहे.
कोरियन युनिव्हर्सिटीच्या कोरियन भाषा आणि साहित्य विभागातील प्राध्यापक शिन जी-यंग स्पष्ट करतात की, दक्षिण कोरियन लोकांना नाव विचारण्यापूर्वी कोणी मोठे आहे की, लहान आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते त्यांना संबोधित कसे करायचे हे ठरवू शकतील. म्हणजे नावाने बोलवायाचे की, एखाद्या पदासह आवाज द्यायचा.
प्रश्न-6: या पारंपारिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला आहे का?
उत्तर: यापूर्वी देखील दक्षिण कोरियाच्या प्रशासनाने वय मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वय मानक लागू करण्याचा प्रयत्न केला आहे.
2019 आणि 2021 मध्ये दोन खासदारांनी हे बदलण्यासाठी संसदेत विधेयक मांडले. मात्र, ते विधेयक कायदा होऊ शकले नाही.
प्रश्न- 7: या बदलाबद्दल दक्षिण कोरियाच्या लोकांचे काय मत आहे?
उत्तरः पोलस्टर हँकूक रिसर्चने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक हजार लोकांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षण केलेल्या 10 पैकी सात कोरियन लोकांनी कोरियन वय प्रणालीतील बदलांना समर्थन दिले.
हॅन्सुंग विद्यापीठातील कायदा आणि धोरण विभागाचे प्राध्यापक किम युन-जू यांच्या मते, जागतिकीकरणामुळे लोक अधिक जागरूक झाले आहेत. कोरियन वय मोजणी प्रणालीमुळे, आपल्या लोकांची जगभरात थट्टा केली जाते. त्याचबरोबर कोरियन नागरिकही यामुळे नाराज होत आहेत. म्हणूनच ते बदलणे आवश्यक आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आणखी काही लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…
पॉर्न अॅडिक्टचा 10 वर्षीय मुलीवर बलात्कार:भारतात बंदी असूनही पॉर्न फिल्म्सच्या व्यसनात वाढ
26 नोव्हेंबर 2022 रोजी छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. आरोपी मुलाला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, त्याला अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन होते. या घटनेच्या चार दिवसांनंतर 30 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला. येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. या दोन घटनांपासून या चर्चेला जोर आला आहे की, पोर्नोग्राफी व्हिडिओंमुळे बलात्कार आणि लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का? वाचा पूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.