आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर येथून ग्राउंड रिपोर्ट:शेतकरी म्हणतात- आज आमच्या मुलांना नेत्याचा मुलगा चिरडून 45 लाखांत प्रकरण मिटवतो; उद्या आणखी कुणी मारतील, अशीच प्रकरणे मिटवतील

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात चर्चेत असलेल्या लखीमपूर खिरीतील तिकुनिया गावात आज भयान शांतता पसरली आहे. पेटून राख झालेल्या गाड्या, थकलेले पोलिस आणि सत्य शोधत फिरणारे मोजके पत्रकारही आहेत. याच ठिकाणी 48 तासांपूर्वी 8 जणांचा जीव गेला. पण, सद्यस्थिती पाहून हे प्रकरण इतक्या लवकर इतके शांत कसे झाले? लोक सामान्य कसे झाले? सरकारने एवढे मोठे प्रकरण कसे शांत केले? असे प्रश्न पडतात.

घटनास्थळावर पुढे जात असताना हळू-हळू एक-एक करत सत्य समोर येत जातो. तिकुनिया गावापासून 60 किमी अंतरावर पलिया गाव आहे. तेथील शेतकरी जगरूप सिंगने सांगितले, आज एका नेत्याच्या मुलाने शेतकऱ्याच्या मुलाला चिरडले आणि 45 लाखांत प्रकरण मिटवण्यात आले. उद्या आणखी एखाद्या नेत्याचा मुलगा शेतकऱ्याला मारून 50 लाखांत निपटून घेईल. शेतकऱ्यांनी इतक्या लवकर शांत व्हायला नको होते. कालचीच गोष्ट आहे की या ठिकाणी हजारो शेतकरी होते. आज लाखो जमले असते. पण, राकेश टिकैत यांनी निदर्शने संपवून घाई केली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा ते शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेवर मोकळ्यापणाने बोलत होते. परंतु, यानंतर उसळलेल्या हिंसाचारावर बोलण्यास त्यांनी संकोच केला. आंदोलक शेतकरी आणि स्थानिक नेते येथून 100 किमी दूर असलेल्या बहराइच जिल्ह्यातील नानपारा गावातील घटनेवर चिंतीत होते. याच ठिकाणी हिंसाचारात मारल्या गेलेल्या दोन शिख युवकांचा अंत्यविधी पार पडणार होता.

स्थानिक नेते आपसात चर्चा करताना दिसून आले. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असलेले उत्तर दाबले आहे. सत्य समोर आल्यास शेतकरी आंदोलनाची दिशा भटकेल. त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. पण, मी जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. आपण नानपारा घटनेवर बोलत नाही असे ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून सरकारी चर्चेवर शेतकरी किती नाराज आहेत हे स्पष्ट दिसून येत होते.

सरकारने विरोधक नेत्यांना थांबवले, त्यामुळेच प्रकरण मिटले
3 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले होते. पंजाबच्या विविध भागांमधून शेतकऱ्यांनी तिकुनिया पोहोचणार असल्याची घोषणा केली. याचवेळी शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत सुद्धा घटनास्थळी पोहोचले. घटना वेगाने घडत होत्या. परिस्थिति लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने आसपासच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तिकुनिया पोहोचण्याचे आदेश दिले. परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणणे हे सरकारचे प्रथम प्राधान्य होते असे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले.

पोलिस निरीक्षक स्तराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की "मला रात्री उशीरा अचानक तातडीने तिकुनिया गाठण्याचे आदेश मिळाले. मी जसा होतो तसाच तिकुनियाच्या दिशेने निघालो. सरकारच्या आदेशानुसार, आसपासच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलिस सक्रीय झाले आणि राजकीय नेत्यांना त्याच ठिकाणी रोखण्यात आले." राजकीय विरोधकांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. फक्त राकेश टिकैत यांना एंट्री देण्यात आली. त्यांनीच सरकारच्या प्रतिनिधींशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी मृतदेहांचा ताबा घेतला.

दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, "सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांच्याकडे विरोध करण्यासाठी कारण उरले नव्हते." तिकुनियामध्ये परिस्थिती सामान्य होण्याचे आणखी एक कारण होते की त्यातील मृतांमध्ये कुठल्याही स्थानिक व्यक्तीचा समावेश नव्हता असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला. ज्या पत्रकाराचा मृत्यू झाला तो 20 किमी दूरच्या गावातील रहिवासी होता.

घटनास्थळी उपस्थित पत्रकार आणि स्थानिकांचे ऐकल्यास काही प्रश्न उद्भवतात. जेव्हा कारने शेतकऱ्यांना चिरडले तेव्हा गाडीत अजय मिश्र यांचा मुलगा आशीष होता का? घटनास्थळी गोळीबार खरंच झाला का? घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी आम्हाला असे अनेक व्हिडिओ दाखवले ज्यात गोळी झाडल्याचा आवाज येतो. पण, त्या कुणी झाडल्या ते दिसत नाही.

अद्याप ठोस पुरावे सापडले नाहीत
भारतीय शीख संघटनेचे गुरमीत सिंग रंधावा यांनी सांगितल्याप्रमाणे, अजय मिश्र यांचा मुलगा गाडीत होता आणि फायरिंग करताना घटनास्थळावरून पसार झाला. ते पुढे म्हणाले, आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते सुद्धा गाडीखाली आले होते. सध्या ते गुरुग्राम येथील मेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले की आशीष त्या गाडीत होता आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला.

एका पत्रकाराने सुद्धा घटनास्थळावरून पसार होताना आशीषला पाहिले आहे. पण, त्याचा व्हिडिओ उपलब्ध नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकाराने म्हटले, की आम्ही सर्वच पत्रकार घटना कव्हर करत होतो. सर्वांचे वेग-वेगळे अँगल होते. पण, त्यात असे काही घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. घटना खूप लवकर घडल्या. मी सुद्धा पळून लपलो होतो. एक व्यक्ती कारमधून उतरून शेतात पळ काढताना मला दिसून आला. मला वाटते तो आशीष उर्फ मोनूच होता. पण, माझ्याकडे व्हिडिओ नाही. इतक्या घाईत मी काही अचूकपणे सांगू शकत नाही. गोळ्या झाडल्या जात होत्या. मला देखील एखादी गोळी लागली असती. त्यामुळे मी लपलो होतो.

केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्र यांनी त्यावेळी आपला मुलगा घटनास्थळी नव्हताच असा दावा केला आहे. त्यांचा मुलगा आशीषने सुद्धा आपण दिवसभर बनवीर गावात होतो असे म्हटले आहे. मला मुद्दाम या प्रकरणात ओढले जात आहे. घटनेचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. ते पत्रकारांनी काढलेले आहेत. असाच एक व्हिडिओ संबंधित पत्रकाराने आपण लपलेल्या वीज केंद्रातून देखील शूट केले. त्यामध्ये वाहने पेटताना आणि शेतकरी सैरा-वैरा धावताना दिसून आले.

पोलिस काय करत होते?

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. घटनेपूर्वी पोलिसांची गर्दी दिसून येते. पण, घटनेच्या वेळी पोलिस दिसत नाहीत. प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने सांगितल्याप्रमाणे, "शेतकऱ्यांवर कार चढवण्यात आली तेव्हा पोलिस घटनास्थळावरून पळून गेले. एका पोलिस अधिकाऱ्याचा तर बूट पायातून निघाला. पोलिसांनी जमलेली गर्दी पांगवण्यासाठी किंवा गर्दीच्या तावडीत सापडलेल्यांना सोडवण्यासाठी काहीच केले नाही. महिला पोलिस सुद्धा पळथ सुटल्या होत्या. पोलिस स्वतः आम्हाला जीव वाचण्यास सांगत होते."

ही प्रश्ने अनुत्तरीतच...
संपूर्ण घटनाक्रमात सर्वात मोठा प्रश्न असा की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मनाईनंतर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वळवण्यात आला होता. अशात भाजप खासदारांच्या गावातून लोकांनी भरलेल्या या 3 गाड्या घटनास्थळी कशा पोहोचल्या. त्यांचा हेतू काय होता?

दुसरा प्रश्न असा की आशीष मिश्र वाहनात असेल तर तो गाडी चालवत असेल किंवा गाडीत बसला असेल. मग कुठल्याही व्हिडिओमध्ये तो स्पष्ट कसा दिसत नाही? तो इतका सुरक्षित कसा? तसेच घटनास्थळावरून कसा पळून गेला?

या घटनेत पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला. त्यांना कुणी मारले? काहींच्या मते, त्यांच्या मोबाईलमध्ये काही ठोस पुरावे होते त्यामुळेच त्यांना ठार मारण्यात आले.

शीख समुदाय चिंतीत
तिकुनिया भारत-नेपाळ सीमेवर वसलेले एक मिश्रित गाव आहे. या ठिकाणी बहुसंख्या शीख शेती करतात. येथे दोन गुरुद्वारा आणि एक शीख शाळा सुद्धा आहे. शीखांचे वर्चस्व या गावात स्पष्टपणे दिसून येते. ठिक-ठिकाणी मोठी शेतीची अवजारे दिसून येतात. या घटनेनंतर शीख समुदाय चिंतीत आहे. एका मंत्र्याच्या मुलावर आणच्या गावातील मुलाला ठार मारल्याचा आरोप आहे. हे गाव आणि केंद्रीय मंत्री समोरा-समोर आले आहेत. त्यामुळे समस्त गाव चिंतीत आहे.

बातम्या आणखी आहेत...