आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टमुलगी देणार लालूंना किडनी:अवयवदानात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर, किडनी दानानंतर गर्भधारणेत अडचण येते का?

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालू प्रसाद यादव यांना किडनी म्हणजेच मूत्रपिंडशी संबंधित समस्या आहे. गेल्या महिन्यात ते त्यांची मुलगी रोहिणी आचार्यला भेटण्यासाठी सिंगापूरला गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानंतर रोहिणीने वडिलांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी लालू या महिन्यात पुन्हा सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे.

किडनी प्रत्यारोपणाबाबत अनेक गैरसमज आहेत, आज आपण कामाची गोष्ट मध्ये त्यावर चर्चा करणार आहोत, तसेच जाणून घेऊया किडनी प्रत्यारोपणाची गरज का असते? आपल्या शरीरात किडनीचे कार्य काय असते?

आजचे तज्ञ डॉ. डी. एस. राणा, नेफ्रोलॉजिस्ट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली, आणि डॉ. आयुष पांडे, डॉ प्रियदर्शिनी रंजन, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन हे आहेत.

प्रश्न 1- किडनीची जबाबदारी काय असते?

उत्तर- शालेय दिवसांपासून आपल्याला दोन गोष्टी माहित आहेत की मानवी शरीरात दोन किडनी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे एक खराब झाली तर दुसरी किडनी काम करू शकते.

विज्ञानानुसार किडनी हा बीनच्या आकाराचा अवयव आहे. हा मणक्याच्या दोन्ही बाजूला, आतड्याच्या खाली आणि पोटाच्या मागे असतो.

आपली किडनी 4 ते 5 इंचाची असते. तीचे काम रक्त शुद्ध करणे आहे. या कामात नेफ्रॉनची मदत होते. सोप्या भाषेत सांगायचे तर ती चाळणीसारखे सतत काम करते. आपल्या शरीरात जो काही कचरा जातो, तो काढून टाकला जातो. आणि अर्थातच, मूत्रपिंड द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची पातळी योग्य ठेवली जाते.

प्रश्न 2- नेफ्रॉन म्हणजे काय?

उत्तर- माणसाच्या मूत्रपिंडात रक्त पोहोचताच कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पाणी, मीठ आणि खनिजे देखील अ‍ॅडजस्ट होण्यास सुरूवात होते. कचऱ्याचे रुपांतर लघवीत होते आणि तो बाहेर पडतो. हे सर्व नेफ्रॉनच्या मदतीने घडते. प्रत्येक किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचे लाखो छोटे फिल्टर असतात. जर मूत्रपिंडात रक्त जाणे थांबले तर त्याचा तो भाग काम करणे थांबवेल, ज्यामुळे किडनी निकामी होऊ शकते.

प्रश्न 3- मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा खराब झाल्यास काय होते?

उत्तर- किडनी नीट काम करू शकली नाही, तर त्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि सूज येते. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते.

प्रश्न 4- किडनी प्रत्यारोपणाचा अर्थ काय?

उत्तर- जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून किडनी काढली जाते आणि ती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात टाकली जाते तेव्हा या प्रक्रियेला किडनी प्रत्यारोपण म्हणतात.

प्रश्न 5- कोणत्या प्रकारचे रुग्ण किडनी प्रत्यारोपण करू शकतात?

उत्तर- ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार…

  • किडनी प्रत्यारोपण किंवा शस्त्रक्रियेचे परिणाम आणि इफेक्ट सहन करण्याची क्षमता असलेल्या रुग्णाची.
  • ज्या रुग्णाची प्रकृती अशी आहे की, त्याचे प्रत्यारोपण यशस्वी होण्याची शक्यता असते.
  • प्रत्यारोपणानंतर आवश्यक ती सर्व औषधे आणि उपचार घेण्यास तयार असल्यास.

प्रश्न 6- एका व्यक्तीची किडनी दुसऱ्या व्यक्तीला कशी बसते?

उत्तर- एखाद्या व्यक्ती रंग-रुप भलेही वेगळे असले तरी त्याच्या शरीराच्या अवयवाचा आकार सारखाच असतो. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी प्रत्यारोपण करत असलेला अवयव कितपत निरोगी आहे हे पाहिले जाते.

खालील 5 कारणांमुळे किडनी प्रत्यारोपण करता येत नाही

  • तीव्र स्वरुपात हृदयरोग
  • वय जास्त झाल्यावर
  • यकृत खराब असल्यास
  • कर्करोग असेल किंवा झालेला असेल.
  • मानसिक आजार

खालील रिसर्चमधील सार देखील वाचा

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, अवयवदानात पुरुषांपेक्षा महिला पुढे आहेत. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) नुसार, गेल्या 20 वर्षांत भारतात 78 ते 80% अवयव दाता महिला आहेत.

हीच गोष्ट केवळ भारतातच नाही तर अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्येही आहे. यूएस मध्ये 60% अवयव दाता महिला आहेत. स्वित्झर्लंडमध्ये, 631 मूत्रपिंड प्रत्यारोपणापैकी, 22% महिलांनी त्यांच्या पुरुष साथीदारांना अवयव दिले, तर पुरुषांच्या एकूण संख्येच्या फक्त 8%.

किडनी रुग्णांसाठी आशेचा नवा किरण

यूकेच्या केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी किडनी दात्यांचा रक्तगटच बदलला. अनेक दिवसांपासून किडनी प्रत्यारोपणाची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी हे संशोधन आशेचा नवा किरण आहे. यामुळे अवयवांच्या कमतरतेचा सामना करण्यास देखील मदत होईल.

शास्त्रज्ञांच्या मते, या शोधामुळे प्रत्यारोपणासाठी किडनीचा पुरवठा जलद होऊ शकतो. विशेषत: अशा लोकांसाठी, जे अशा जाती किंवा गटाचे आहेत, ज्यांची किडनी जुळण्याची शक्यता खूपच कमी असते.

प्रश्न 7- ठिक आहे, पण किडनी प्रत्यारोपणासाठी 2 व्यक्तींची किडनी जुळणे आवश्यक आहे का?

उत्तर - नक्कीच, ते आवश्यकच आहे. हे एका उदाहरणाने समजून घ्या- समजा पहिल्या व्यक्तीचा रक्तगट A आहे आणि दुसऱ्याचा B आहे, तर अशा स्थितीत A रक्तगट असलेली व्यक्ती B रक्तगट असलेल्या व्यक्तीला किडनी दान करू शकत नाही. किंवा B रक्तगटाचा A रक्तगट असलेल्याही करुन शकत नाही.

प्रश्न 8- किडनी प्रत्यारोपणानंतर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी?

उत्तर- खालील 3-4 गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे-

  • धुम्रपान अजिबात करू नका.
  • फक्त निरोगी अन्न खा.
  • उंचीनुसार वजन जास्त असेल तर ते जास्त वाढू देऊ नका.
  • कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्याचा प्रयत्न करा.

प्रश्न 9- किडनी निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगू शकाल का?

उत्तर- सुरुवातीची लक्षणे ओळखणे थोडे कठीण आहे. सहसा लोकांना ही तीन लक्षणे जाणवतात...

  • लघवी कमी होते
  • फ्ल्यूड रिटेंशनमुळे सुज
  • श्वास घेण्यात अडचण

प्रश्न 10 - किडनी दान केल्यावरही महिला गरोदर राहू शकतात का?

उत्तर- होय अगदी. किडनी दान केल्याने तुम्हाला गर्भवती होणे किंवा मुलाला जन्म देण्यास काहीही अडचण नाही. किडनी दान केल्याने महिला किंवा पुरुषांना प्रजनन समस्या उद्भवत नाही. तथापि, महिलांनी किडनी दान केल्यानंतर एक वर्ष प्रतीक्षा करावी. यामुळे तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी भरपूर वेळ मिळतो.

अखेरीस पण महत्त्वाचे

मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर रुग्णाचा आहार खालील प्रमाणे असावा

  • शक्यतो हलके, कमी चरबीयुक्त, कमी मीठ असलेले अन्न खावे.
  • दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे.
  • जास्त सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम घेऊ नये.
  • पालक, हिरवी कोथंबिर, अरबी, बटाटा, रताळे अजिबात खाऊ नयेत.
  • मांसाहार, न धुतलेली फळे, शिळे अन्न आणि भाज्या देखील घेऊ नयेत.

किडनी प्रत्यारोपणानंतर, रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेव्हा...

कोणत्याही प्रकारची जखम झाली

  • पुरळ
  • इजा
  • यूरिन संसर्ग
  • सर्दी किंवा खोकला यांसारखे श्वसन संक्रमण होणे

आता जाणून घ्या किडनीच्या आजारावर देशातील आकडेवारी कशी आहे....

देशात

  • 78 लाख लोक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत.
  • 24 लाख लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
  • 1 लाख लोकांना दरवर्षी किडनीच्या आजाराचे शेवटच्या टप्प्यात निदान होते.
  • 1,200 किडनी तज्ज्ञ आहेत.
  • 1,500 हीमोडायलिसिस सेंटर आहेत.
  • 10,000 डायलिसिस केंद्रे आहेत.
  • 80% किडनी प्रत्यारोपण खासगी रुग्णालयात होत आहे.
बातम्या आणखी आहेत...