आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात २०१९ या वर्षात प्राण्यांच्या ३६८ नव्या प्रजातींचा शोध लागला. पैकी ११६ प्राणी प्रथमच आढळले. १० वर्षांत प्राण्यांच्या शोधमोहिमेतील ही दुसरी सर्वात मोठी संख्या आहे. २०१८ मध्ये ३७२ नव्या प्रजातींचा शोध लावला होता. १० वर्षांत भारतात एकूण २,४४४ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. २०१० मध्ये फक्त २८ नव्या प्रजातींची ओळख पटली होती, पण या वर्षी जगात आधीपासून अस्तित्वात असलेले २५७ प्राणी आढळले. सर्व नव्या प्राण्यांची चित्रे व त्यांची संपूर्ण माहिती झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (झेडएसआय) ‘अॅनिमल डिस्कव्हरीज-२०१९ : न्यू स्पेसीज अँड न्यू रेकॉर्ड’ मध्ये प्रकाशित केली आहे.
पर्यावरण मंत्रालय या आठवड्यात हा अहवाल जारी करणार आहे. झेडएसआयचे संचालक कैलाशचंद्र यांनी सांगितले की, या वेळी अॅनिमल डिस्कव्हरी-२०१९ मध्ये निमेसपिस प्रजातीच्या ८ पालींचा शोध लागला. संशोधक व शोधाच्या ठिकाणावर या पालींची नावे ठेवली आहेत. सालेम जिल्ह्यात आढळलेल्या पालीच्या प्रजातीचे नाव संशोधक ईशान अग्रवाल यांच्या नावावर ‘अग्रवाली’, तर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा या गावाजवळ आढळलेल्या पालीच्या प्रजातीचे नाव ‘अंबा’ ठेवले आहे. सालेममधील पालीचे नाव निसर्गविज्ञानात महत्त्वाचे योगदान देणारे तेजस ठाकरे यांच्या नावावर ‘ठाकरे’ ठेवले आहे. केरळच्या पट्टनमिथिट्टा जिल्ह्यात आढळलेल्या माशाचे नाव या भागातील प्रसिद्ध राजा ‘महाबली’च्या नावावर ठेवण्यात आले आहे. कैलाशचंद्र यांनी सांगितले की, जगभरात दरवर्षी १५ ते १८ हजार नव्या प्रजातींचा शोध लावला जातो व त्यांचे वर्गीकरण होऊ शकते.
झेडएसआय १०४ वर्षांपासून भारतात प्राण्यांचा शोध व पडताळणी तसेच त्यांचे दस्तावेजीकरण करत आहे. देशात आतापर्यंत १,०२,१६१ प्राण्यांचा शोध लागलेला आहे, त्याचे प्रमाण जगात असलेल्या १५,८४,६४७ प्राण्यांचा प्रजातीच्या ६.५२ टक्के आहे. जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या ३६ हॉटस्पॉटपैकी ४ भारतात आहेत. भारतात हिमालय, वाळवंट, गंगेचे मैदानी भाग, दक्षिण पठार, पश्चिम घाट, बेटे आणि किनारपट्टीच्या भागात विविध प्रकारचे प्राणी आढळतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.