आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Laws Related To Women And WOMEN SPECIFIC LEGISLATION And Women Rights As Well As The Roll Of National Human Rights Commission Women's Commission

महत्त्वाची बातमी:प्रत्येकाला माहित असायला हवे महिला-मुलींच्या या 9 हक्कांबद्दल, कोणत्या प्रकरणात कुठे मागता येते दाद जाणून घ्या सविस्तर

जनार्दन पांडेय17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • महत्त्वपूर्ण अशा या कायदेशीर हक्कांबद्दल प्रत्येक महिलेला संपूर्ण माहिती असलीच पाहिजे.

दररोज आपण महिलांवर अत्याचाराच्या बातम्या ऐकत आणि वाचत असतो. महिलांवर अनेक वर्षांपासून अत्याचार होत आले आहेत आणि त्या ते आजही मुकाटपणे सहन देखील करत आहेत. कारण महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहितीच नसते. आपणही अन्यायाविरोधात कायदेशीर लढा देऊ शकतो हेच त्यांना माहित नसते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला भारतीय कायदेशीर हक्क किंवा त्या हक्कांबद्दल सांगू इच्छित आहोत जे महिलांचे हित लक्षात घेऊन बनवले गेले आहेत आणि जे सर्वांना माहित असलेच पाहिजेत.

यासाठी आम्ही महिलांशी संबंधित 9 वेगवेगळ्या प्रश्नांसदर्भात काही वरिष्ठ वकिलांशी बातचीत केली. त्याविषयी वाचा सविस्तर...

 • प्रश्न 1: बरेच लोक महिलांवर शब्दांचा मार करत असतात त्यांच्याबद्दल काय करता येईल? त्यावर काही उपाय आहेत का?

उत्तर आणि महिलांचे हक्क: यावर उपाय आहे. घरगुती हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये असे म्हटले आहे की, घरगुती हिंसा हा केवळ हल्ला नाही. टोमणे मारणे, वाईट बोलणे, याचा यात समावेश आहे. तुला तुझ्या आईवडिलांनी काही शिवले नाही का? तुला साधी साडी नीट नेसता येत नाही? नीट स्वयंपाक करता येत नाही? असे टोमणे मारणे. किंवा महिलेचा पगार हिसकावून घेणे. या सर्व गोष्टींना विरोध करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

सर्वसाधारणपणे, आपण शारीरिक शोषण, भावनिक शोषण, आर्थिक गैरवर्तन किंवा लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रार करतो.

हा कायदादेखील घरगुती हिंसाचाराविषयी आहे. केवळ सासरच्यांबद्दलच नव्हे जर तुम्हाला माहेरीदेखील अशा गोष्टींना समारे जावे लागत असेल, तर तुम्हाला निषेध करण्याचा अधिकार आहे.

कुठे तक्रार करावी: सर्वप्रथम महिला हेल्पलाईन 1090, 1091 वर कॉल करा. जर तिथे मदत मिळत नसले तर महिला आयोगाकडे तक्रार करा. राष्ट्रीय महिला आयोग जनपथ, दिल्ली येथे आहे.
याशिवाय प्रत्येक राज्यात महिलांसाठी राज्य आयोग आहे, ज्याचे सदस्य जिल्हा स्तरावर देखील आहेत.

ही गोष्ट लक्षात ठेवा : महिला आयोगाला दिवाणी न्यायालयासारखाच दर्जा आहे. जिल्ह्यात महिला सेल स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याला शोधा एवढे करूनही, जर तुमचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर तुम्ही थेट न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला वकिलाची गरज नाही.

 • प्रश्न 2: जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल कर काय करावे. मुलींचे फोन टॅप होतात, सोशल मीडियावर मुलींच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले जात असतील. चुकीचे फोटो ठेवले गेले असतील तर काय करायचे?

उत्तर आणि महिलांचे अधिकार: अशा परिस्थितीत, तुम्हाला हवे असल्यास, आरोपी अजामीनपात्र वॉरंटवर तुरुंगात जाऊ शकतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (D) मध्ये नमूद केले आहे की अशी प्रत्येक व्यक्ती जी 'स्टॉकिंग'चा दोषी आहे, आणि ती जर तुमच्या मनाविरुद्ध तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, पाठलाग करत असेल, वैयक्तिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा सायबर हेरगिरी कर असेल. किंवा खोटे आरोप करत असेल, धमकी देत असेल, इंटरनेटवरील तुमच्या डेटाचा गैरवापर करत असेल. तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, कलम 66 ई माहिती तंत्रज्ञान कायदा सांगतो की, जर कोणी तुमच्या परवानगीशिवाय तुमचा फोटो प्रकाशित केला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

कुठे तक्रार करावी: तुम्ही प्रथम 1091 वर कॉल करू शकता. तिथे म्हणणे ऐकले गेले नाही तर तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार दाखल करू शकता. त्यानंतर तुम्हाला पावती क्रमांक मिळेल. कमिशन दहा दिवसांत तक्रारीवर काम करते, तुम्ही थेट पोलिसांकडे तक्रारही दाखल करू शकता. जर प्रकरण इंटरनेटशी संबंधित असेल तर तुम्ही सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करू शकता.

 • प्रश्न 3: जर एखादी महिला दुसऱ्या शहरात नोकरी किंवा कोणत्याही कामासाठी गेली आणि त्या शहरात बलात्कारासारख्या घटनेचा बळी ठरली तर तक्रार कुठे करायची.

उत्तर आणि महिलांचे अधिकार: तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात. असे 2012 पूर्वी घडू शकले नसते, परंतु दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारानंतर 0 एफआयआर कायदा करण्यात आला.

तुमच्यासोबत बलात्कारासारखे गुन्हा घडल्यास तुमची 0 एफआयआर जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवा. नंतर पोलीस स्वतः त्याची संबंधित पोलीस ठाण्यात बदली करतील.

 • प्रश्न 4: एक महिला कार्यालयात काम करते, जिला कार्यालयातील अनेक लोकांचे तोंड फोडायचे असते. त्याच वेळी, शेतात काम करणारी आणखी एक महिला आहे, जिच्यावर दररोज दोन -चार लोक विचित्र विनोद करतात. दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत पण समस्या एकच आहे… या महिलांनी काय करावे?

उत्तर आणि महिलांचे अधिकार: तुमच्याकडे या दोन्ही प्रकारच्या लोकांना धडा शिकवण्याचा अधिकार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, निषेध आणि निवारण) कायदा 2013 म्हणजेच POSH कायदा आहे. या अंतर्गत, कोणत्याही ठिकाणी जेथे 10 पेक्षा जास्त लोक काम करतात, कोणी अश्लील फोटो दाखवतो, सेक्सची मागणी करतो, जर कोणी विचित्र विनोद करत असेल तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकतात.

2 एप्रिल 2013 रोजी अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी IPC चे कलम 354A मध्ये सुधारणा करण्यात आली. हा कायदा कामाच्या ठिकाणी लागू होईल आणि तुमच्याशी गैरवर्तन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये स्पष्ट केले होते की, कामाच्या ठिकाणी कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता.

कुठे तक्रार करावी: प्रत्येक कार्यालयात इंटर्नल कंप्लेन कमिटी स्थापन केली जाते, तिथे तुम्ही तक्रार करु शकता. जर तिथे तुमचे म्हणणे ऐकले गेले नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करता येते. जर तिथेही या प्रकरणाची सुनावणी झाली नाही तर तुम्ही महिला आयोग किंवा मानवाधिकार आयोगाकडे जाऊ शकता.

 • प्रश्न 5: महिला बॉस किंवा ऑफिसमधील कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाविरूद्ध काहीतरी बोलण्यास नेहमीच घाबरतात, त्यांची नोकरी गमावण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांना काहीही सांगता येत नाही.

उत्तर आणि महिलांचे अधिकार: नाही. या प्रकरणात तुम्हाला मोठा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपली शक्ती, अधिकार दाखवून तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर त्याला बलात्कारासारख्या गंभीर श्रेणीत ठेवले जाईल. IPC चे कलम 376D यासाठी आहे.

कुठे तक्रार करावी: कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला थेट इंटर्नल कंप्लेन कमिटीअंतर्गत तक्रार करू शकतात.

 • प्रश्न 6: अशी काही प्रकरणे देखील आहेत. जिथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल आहे, पण तरीदेखील नवऱ्याला बळजबरी संबंध ठेवायचे आहेत… अशा परिस्थितीत काय करावे?

उत्तर आणि महिलांचे अधिकार: हे बलात्काराचे प्रकरण आहे. तुम्हाला IPC कलम 376c अन्वये गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे.

कोठे तक्रार करावी: प्रकरण आधीच न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तक्रार थेट न्यायालयातच करावी लागते. परंतु कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात 0 FIR नोंदवून वैद्यकीय चाचणी करता येते.

 • प्रश्न 7: आपण कितीही काम केले, कितीही कष्ट, मेहनत घेतली तरी आपल्याला पुरुषांएवढा पगार मिळू शकत नाही. हेच सत्य आहे

उत्तर आणि महिलांचे अधिकार: नाही तसे नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने वेतनाची मागणी करणे हा तुमचा अधिकार आहे. समान वेतन हक्क कायदा 1976-77 मध्येच लागू करण्यात आला. जर तुम्हाला 2021 मध्ये असे काही सांगायची वेळ आली असेल, तर ही पुरुषांसाठी लज्जास्पद आहे. तरीही, जेव्हाही तुम्हाला तसे वाटले तेव्हा तुम्ही तुमच्या समानतेची थेट मागणी करू शकता.

कोठे तक्रार करावी: तुम्ही तुमच्या क्षेत्रातील कामगार आयुक्त कार्यालयाकडे थेट तक्रार दाखल करू शकता.

 • प्रश्न 8: दररोज आम्ही बातम्या वाचतो की, आईवडिलांनी त्यांच्या मुलीला विकले. आणि बरेच ठिकाणी लोक नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या शहरांमध्ये बोलावतात आणि नंतर मुलांना हेळसांड केली जाते.

उत्तर आणि महिलांचे अधिकार: तुम्ही या सापळ्यातून बाहेर येऊ शकता. तुम्ही त्यांना तुरुंगात पाठवू शकता ज्यांनी तुमच्याशी असे केले. यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 आहे.

कोठे तक्रार करावी: राज्यांना स्पष्ट सूचना आहेत की, अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई केली पाहिजे. प्रत्येक शहरातील सुधारगृहांची मदत देखील घेतली जाऊ शकते.

 • प्रश्न 9: लग्नानंतर, त्यांना त्यांच्या पालकांचे घर सोडावे लागणार, असे नेहमीच मुलींना सांगितले जाते. मुली या परक्याचे धन असतात.

उत्तर आणि महिलांचे अधिकार: नाही तसे नाहीये. तुमच्या आई -वडिलांच्या संपत्तीवर जेवढा तुमच्या भावाचा हक्क असतो, तेवढाच तुमचादेखील असतो. संपत्तीत मुलींना समान वाटा असतो. संपत्तीचा अधिकार आणि न्यायिक निष्कर्ष अनुच्छेद 300-A असे म्हणतो.

कोठे तक्रार करावी: आपण थेट जिल्हा न्यायालयात जाणे चांगले. तुम्ही याचिका दाखल करू शकता.

महिलांचे आणखी बरेच अधिकार आहेत. त्यापैकी हुंडा प्रतिबंध कायदा, 1961, मातृत्व लाभ कायदा 1961 किंवा हिंदू उत्तराधिकार अधिनियम 2005. परंतु जर तुम्ही तुमच्या हक्कांची मागणी केली तरच त्यांना काही अर्थ असेल.

बातम्या आणखी आहेत...