आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अतिवृष्टी भागात नेते पोहोचले, मात्र विमा प्रतिनिधी गायब

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वेळीही शेतकऱ्यांना भरपाई मिळवून घेण्यात नेत्यांचे कोरडे दौरे कुचकामी ठरल्याचे पुढे येत आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी, विरोधक अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांचा पूर आला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले. प्रत्यक्षात ही भरपाई देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांच्याकडे शासनाने कोट्यवधींचे प्रीमियम भरले त्या विमा कंपन्यांचे प्रतिनिधीच पोहोचलेले नाहीत. परिणामी काही ठिकाणी विमा प्रतिनिधींशिवाय पंचनामे खोळंबले आहेत, तर काही ठिकाणी विमा प्रतिनिधींशिवाय कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून घेतले आहेत. नेहमीप्रमाणे या वेळीही शेतकऱ्यांना भरपाई मिळवून घेण्यात नेत्यांचे कोरडे दौरे कुचकामी ठरल्याचे, तर विमा कंपन्यांचा अडेलतट्टूपणा कायम असल्याचे पुढे येत आहे.

उस्मानाबाद : अडीच लाख हेक्टरचे नुकसान, विमा प्रतिनिधी फक्त ३८

> माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांचा दौरा सास्तूर, राजेगाव, एकोंडी (ता. लोहारा)
सद्य:स्थिती : महसूल व कृषी विभागाचे पंंचनामे सुरू, विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीत.

> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा काटगाव, अपसिंगा (ता. तुळजापूर)

सद्य:स्थिती : तक्रार करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे विमा कंपनीने पंचनामे केले, बाकीचे शिल्लक

> माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रोसा, जामगाव, खानापूर

सद्य:स्थिती : महसूल व कृषी विभागाचे पंचनामे सुरू, विमा प्रतिनिधी पोहोचले नाहीत.

औरंगाबाद : ४ लाख शेतकऱ्यांचे नुकसान, प्रतिनिधींचा पत्ता नाही

> कृषिमंत्री दादा भुसे यांचा दौरा : नागद सायगव्हाण (ता. कन्नड)

> सार्वजनिक बांधकाम मंंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा : पळशी अंजनदोड

> महसूल राज्यमंंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा : मांजरी (ता. गंगापूर), भगुर (ता. कन्नड)

> फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा : पिंपळवाडी पिराची, नायगाव

> मंत्री अमित देशमुख यांचा दौरा : मुरमा (ता. पैठण) पिंपळगाव (ता. औरंगाबाद)

सद्य:स्थिती : पंचनामे पूर्ण, काही ठिकाणी एकच प्रतिनिधी. काही ठिकाणी प्रतिनिधी अनुपस्थित.

विमा कंपन्यांना ‘वाॅर्निंग’ दिली आहे]

विमा कंपन्यांना आम्ही वॉर्निंग दिली आहे. शेतकऱ्यांनीही ऑनलाइन तक्रारी करणे गरजेचे आहे. -दादा भुसे, कृषिमंत्री

ऑनलाइन तक्रारीही वाऱ्यावर : आम्ही ऑनलाइन तक्रारी केल्या, तरी विमा प्रतिनिधी आले नाहीत. -दत्तात्रेय सुतार, लोहारा, उस्मानाबाद

विमा प्रतिनिधी फिरकले नाहीत : महसूलने पंचनामे केले. विमा प्रतिनिधींनी पंचनामे केले नाहीत. - बाळासाहेब गिरी, रोसा, उस्मानाबाद

> मंत्री धनंजय मुंडे यांचा दौरा : गेवराई

> महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा : पांढरवाडी, पाचेगाव व पाडळशिंगी

> माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांचा दौरा : अंबाजोगाईतील चतुरवाडी

सद्य:स्थिती : विमा कंपन्यांचे अधिकारी बैठकीस उपस्थित, पंचनाम्यांत गैरहजर, विमा प्रतिनिधींच्या कमी संख्येमुळे अडचण.

विमा प्रतिनिधी आलेच नाही

दरवेळी आपत्तीवेळी शेतकऱ्याने तक्रार केली तर विमा कंपनीचे प्रतिनिधी येतात, या वेळी आले नाहीत. - तुकाराम मोटे, कृषी अधीक्षक, औरंगाबाद