आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गर्दी असलेल्या देशात तिरुपती, वैष्णोदेवी किंवा शिर्डीच्या साई मंदिरात गर्दीचे खूप चांगले व्यवस्थापन केले जाते, तर तुम्हाला या यादीत आणखी एक नाव जोडून घ्यायला हवे. हे आहे राजधानी दिल्लीच्या सीमांना स्पर्श करणारा एनएच-४४ चा परिसर. जणू काही एक पूर्ण शहरच येथे येऊन स्थायिक झाले आहे. येथे लोकांकडे सर्व सुविधा आहेत ज्या त्यांच्या घरात असतात. एखाद्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला येथे शिकण्यासारखे खूप काही आहे. असे काहीच नाही जे तुम्हाला येथे आढळणार नाही. बहुतांश मोफत आहे.
हेल्थ मॅनेजमेंट : जर कडक थंडीचा सामना करणारी गर्दी आहे, तीही महामार्गावर तर नक्कीच त्यातील काही आजारी पडतील. आणि आंदोलकांना हे चांगले माहीतही असावे. त्यांची व्यवस्थित वैद्यकीय सुविधा ज्यात रुग्णवाहिकेपासून व्हेंटिलेटर आणि मेडिकल स्टोअरचाही समावेश आहे, अनेक किलोमीटरपर्यंत प्रत्येक काही मीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे आणि त्यात औषधीही दिली जात आहेत. एखाद्याला जेलुसिलसारख्या अँटासिड सिरपची गरज असल्यास ते एका लहानशा प्लास्टिकच्या डबीत दिले जात आहे, ज्यात पानवाले चुना ठेवतात. तपासणीसाठीच नव्हे तर आपत्कालीन सेवेसाठीही डॉक्टर हजर आहेत. अत्याधुनिक मोबाइल व्हॅनमध्ये उपचार होतात, जी एखाद्या फाइव्ह स्टार रुग्णालयासारखी दिसते.
सुविधा मॅनेजमेंट : मोबाइल चार्जिंग स्टेशन, इतर आधुनिक उपकरणाच्या दुरुस्तीसाठी मदतच नव्हे तर फाइव्ह स्टार हॉटेलद्वारे कंगवा, तेल, टूथपेस्ट उपलब्ध करणे जुनी कल्पना झाली आहे. जर एखादा शेतकरी अंडरविअर, बनियन, रुमाल किंवा मोजे आणण्यास विसरला असेल तर तेदेखील येथे उपलब्ध आहे, बिलकुल मोफत.
होमसिक मॅनेजमेंट : जर तुम्हाला गरमागरम कोबी, मुळा आणि आलूच्या पराठ्याचा स्वाद घराची आठवण करून देत असेल तर चिंतेचे कारण नाही. आंदोलक शेतकऱ्यांना येथे त्यांच्या आवडीची लस्सी, भाजी, मक्याची भाकरही मिळते. येथे लंगरमधील पाहुणचार बघण्यासारखा आहे. तुम्ही आंदोलक असाल किंवा बघण्यासाठी आलेले, तुम्हाला पाहुण्यांसारखी वागणूक दिली जाईल आणि आवडीचे गरमागरम जेवण दिले जाईल. आंदोलनस्थळी स्नॅक्सचीही अनोखी व्यवस्था आहे. तुमच्या शुगर आणि कोलेस्टेरॉल लेव्हलनुसार तुम्ही आंदोलनात बसल्या बसल्या गरिबांचे भाजलेले शंेगदाणे, श्रीमंतांचे काजू- बदामही खाऊ शकता. ही पूर्ण भोजन व्यवस्था सेवाभावनेसह आहे आणि यामुळेच पोटच नव्हे तर मनही भरते.
सिक्युरिटी मॅनेजमेंट : बहुतेक आजच्या काळातील सर्वात उत्तम द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्थापन. आंदोलनात एखादे असामाजिक तत्त्व गैरफायदा तर घेत नाही ना हे बघण्यासाठी निहंगांची सेना पूर्ण आंदोलनात फिरून लक्ष देत आहे. ते प्रत्येक ट्रॅक्टर, ट्रक आणि बसमध्ये एका व्यक्तीला रात्रभर जागे ठेवतात. सुरक्षा करणाऱ्या स्वयंसेवकांना आणि निहंगांना प्रत्येक ३०० मीटर अंतरावरील चहा आणि उष्ण पेयांच्या काउंटरची मदत होत आहे. आंदोलनस्थळी उपस्थित महिलांना युवा स्वयंसेवकांकडून वेगळी सुरक्षा पुरवली जात आहे.
(मनीषा भल्ला आणि राहुल कोटियाल यांच्या अतिरिक्त इनपुटसह)
मॅनेजमेंट गुरू
एन. रघुरामन
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.