आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उपमिता वाजपेयी
ही गाथा त्या रसूल गलवानची आहे ज्यांचे नाव गलवान खोऱ्याला देण्यात आले आहे. हेच ते गलवान खोरे जे भारत आणि चीनच्या सैनिकांत झालेल्या हिंसाचारानंतर जगभरात चर्चेत आहे. याच ठिकाणी भारताने आपले 20 सैनिक गमावले. याच दरम्यान गलवान कुटुंब लेहच्या बाजारापासून जगभरात प्रसिद्धीला आला. या भागाचे नाव याच कुटुंबातील पुरुषाच्या नावावर ठेवण्यात आले आहे. गलवान गेस्ट हाऊस जगात तर सोडाच लेहमध्ये सुद्धा एवढा प्रसिद्ध कधीच नव्हता. लेह बाजारात सुद्धा त्याच्या कुठेही चर्चा नव्हत्या. ताशी नावाची व्यक्ती आम्हाला या कुटुंबियांच्या घरात घेऊन गेली. सध्या सर्वत्र या कुटुंबियांची चर्चा आहे असे ताशीने सांगितले.
घराच्या बाहेरच रसूल गलवान यांची चौथी पिढी काही अभ्यास करताना पाहायला मिळाली. त्यामुळे, पहिला प्रश्न आम्ही त्यांनाच केला. यात आपले पंजोबा रसूल गलवान यांच्याबद्दलची माहिती आपल्याला गेल्या आठवड्यातच मिळाली असे या मुला-मुलींनी सांगितले. आईने त्यांना आपल्या आजोबांच्या वडिलांबद्दलची माहिती टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांनंतर दिली होती.
मोहम्मद अमीन हे रसूल गलवान यांचे नातू आहेत. विविध माध्यमांकडून त्यांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याने ते सध्या व्यस्त आहेत. त्यांच्याकडे खाण्या-पिण्यासाठी सुद्धा वेळ नाही. लेहच्या यूरटुंग परिसरात ते एक छोटेसे गेस्ट हाउस चालवतात. तत्पूर्वी ते सरकारी कार्यालयात क्लार्क होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.
अमीन आपल्या आजोबांची गाथा सांगायला लागले. ते हीच गोष्ट मीडियावाल्यांना एकसारखीच ऐकवत आहेत. "गलवान खोऱ्याचे नाव कसे पडले आणि तुमचे आजोबा काय करतात? याशिवाय मीडियावाल्यांकडे दुसरा प्रश्नच नाही." असे अमीन म्हणाले.
12 वर्षांचे असताना गाइड होते आजोबा
अमीन मोठ्या अभिमानाने आपल्या आजोबांबद्दल सांगतात, की "माझे आजोबा वयाच्या 12 व्या वर्षी गाइड होते. 10 दिवस पायी चालत ते लडाख ते जोजिला दर्रा पार करून काश्मीरला जायचे. 1888 मध्ये असेच एकवेळ इंग्रजांसोबत ट्रेकिंग करताना ते काराकोरम जवळ होत अक्साई चीन मार्गे जात होते. त्याचवेळी ते लोक एका उभ्या डोंगरावर अडकले. पुढे जाण्यासाठी रस्ताच दिसत नव्हता. त्यावेळी माझ्या आजोबांनी मार्ग काढला आणि सर्वांना वाट मोकळी करून दिली. ते चपळ आणि बुद्धीमान होते. त्याचवेळी इंग्रजांनी खुश होऊन त्या खोऱ्याला माझ्या आजोबांचे नाव दिले."
अमीन पुढे म्हणाले, "माझ्या आजोबांना दोन मुले होती. एक माझे वडील आणि एक काका. 30 मार्च 1925 रोजी आजोबांचे निधन झाले. त्यावेळी माझे वडील खूप लहान होते." अमीन सांगतात की सर्वप्रथम आपल्या आजोबांची गोष्ट त्यांना त्यांच्या वडिलांनीच सांगितली होती. कसे आजोबा कुठेही निघून जायचे हे देखील माझे वडील सांगायचे.
आजोबांच्या आठवणीत केवळ एक पुस्तक
मोहंमद अमीन यांच्याकडे आपल्या आजोबांची आठवण म्हणून केवळ एक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी 1995 मध्ये प्रकाशित केले होते. अमीन यांच्या मते, त्यांच्याकडे या पुस्तकाशिवाय आपल्या आजोबांचा दुसरा फोटो नाही. लेहमध्ये ज्या ठिकाणी रसूल राहत होते. त्या ठिकाणी आता एक संग्रहालय आहे. त्यांचे घर आणि सभोवतालची जागा इंग्रजांनीच त्यांना दिली होती.
चीन सध्या जमीनीवर दावा करत असल्याचे ऐकून अमीन म्हणाले, माझे आजोबा भारतीय होते आणि जमीन त्यांच्या नावे होती. मग, चीन त्या जमीनीवर आपला दावा कसा करू शकतो. माझे कुटुंबीय आजही गलवान खोरे पाहू इच्छितात. परंतु, अजुनही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. अमीन यांनी तक्रार देखील केली की हे पुस्तक काश्मीरींनी प्रिंट केले. तसेच प्रिंट करण्यापूर्वी आम्हाला सांगितले सुद्धा नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.