आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून चित्रपट उद्योग पूर्णत: ठप्प पडला आहे. कामयाब आणि अंग्रेजी मीडियम हे चित्रपटगृहात रिलीज झालेले अखेरचे चित्रपट. आता बमफाड, घूमकेतू, गुलाबो सिताबो हे चित्रपट डिजिटल फ्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाले आहेत. यामुळे चित्रपटगृह चालक, चित्रपट वितरकांचे खूप नुकसान झाले. ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी सांगितले की, चित्रपटगृहांचे मालक आणि वितरकांना दर आठवड्याला सुमारे ५५ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. म्हणजेच दरमहा २०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त फटका बसतो आहे. चित्रपटगृह चालक-मालकांची चिंता निर्मात्यांनाही वाटते आहे. त्याचप्रमाणे मालकांनीही निर्मात्यांची काळजी केली पाहिजे, असे निर्माते कबीर खान म्हणाले.
दरम्यान, चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास सूर्यवंशी, ८३ आणि आमिर खानचा लालसिंह चड्ढासह सुमारे १२ बडे चित्रपटांना प्रदर्शित प्रचंड फायदा मिळवून देऊ शकतात.
आता सोलो रिलीज होणे कठीण
लॉकडाऊन झाला नसता तर अनेक बिग बजेट चित्रपटांना सोलो रिलीज होण्याची संधी मिळाली असती. परंतु पुढील काही महिने एकाच दिवशी दोन-दोन चित्रपट प्रदर्शित होतील, असे उद्योगातील जाणकारांचे मत आहे. दिग्दर्शक करण मल्होत्रा यांच्या मते, चित्रपटांना सोलो रिलीजची परवानगी मिळाली नाही तर त्याला डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सॅटेलाइट हक्काचे पैसेही कमीच मिळतात.
हे आहेत प्रदर्शनाच्या वाटेवर
चित्रपट (अभिनेते)
> लालसिंह चड्ढा आमिर खान
> 83 रणवीर सिंह
> सूर्यवंशी अक्षय कुमार
> सडक-2 संजय दत्त
> चेहरे अमिताभ बच्चन
> शमशेरा रणबीर कपूर
> भुज अजय देवगण
> जर्सी शाहिद कपूर
> गंगूबाई काठियावाडी आलिया भट
> जयेशभाई जोरदार रणवीर सिंह
> पृथ्वीराज चौहान अक्षयकुमार
> ब्रह्मास्त्र अमिताभ बच्चन
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.