आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण:58% लोकांना वाटते, कोरोनाशी स्वत:च लढावे लागेल; 59% करू इच्छितात आपला व्यवसाय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या एक वर्षातील आठवणी जागवताना दैनिक दिव्य मराठीचा कोरोनाकाळातील विशेष सर्व्हे..

२२ मार्चला जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधानांनी २४ मार्च २०२० रोजी देशात २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाले. हा लॉकडाऊन वाढत वाढत १५ एप्रिल ते ३ मे, नंतर १७ मे आणि शेवटी ३१ मेपर्यंत जाईल, असा कुणी विचारही केला नव्हता. या पूर्ण लॉकडाऊनचे ६८ दिवस हा देश कधीच विसरणार नाही. यानंतर १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत ६ टप्प्यांत अनलॉक झाले. ते अजून सुरू आहे. अनेक व्यवसाय, दुकाने उघडली; परंतु सर्व रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवास अजून सुरू नाही. लॉकडाऊन ते अनलॉक या प्रवासात या वर्षी १.१७ कोटी लोकांना कोरोनाने गाठल्याचे आपण पाहिले आणि १.६० लाखाहून अधिक लोक गमावले. हे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेले. कुटुंबाचे महत्त्व आणि संकटाशी दोन हात करण्याची आपली तयारी आपण ओळखू शकलो. सर्वात महत्त्वाचे आपण काय शिकलो तर, निसर्गापेक्षा शक्तिमान या जगात कुणीच नाही...

कोरोनाकाळाने तुम्हाला काय शिकवले, या प्रश्नाच्या उत्तरात
४२.१ % लोकांनी म्हटले की, संकटासाठी नेहमी तयार राहण्याचा धडा या काळात मिळाला. चांगले आरोग्य सर्वात आवश्यक आहे असा धडा २७.१ % लोकांनी घेतला. १५.२ % नी बचत करण्याचा तर १५.६ % नी कुटुंबाला महत्त्व देण्याचा धडा घेतला. लोकांसाठी आरोग्य मोठी गरज असल्याचे समोर आले.

30.7% चे मत-सर्व सुरळीत होण्यास वेळ लागेल
सर्व्हेत ३४.५% लोकांनी सांगितले की, महामारी नियंत्रणात आल्यानंतर स्थिती पूर्णपणे सुरळीत होण्यास २-३ वर्षे लागतील, तर ३०.७ % लोकांच्या मते त्यापेक्षाही जास्त अवधी लागेल. या वर्षी परिस्थिती सुरळीत होईल, असे १९.४% लोकांना वाटते. पुढील वर्षापर्यंत सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा १५.४% लोकांनी व्यक्त केली आहे.

69% चे मत-मजुरांसाठी सर्वात वाईट काळ
हा काळ कोणासाठी सर्वात वाईट गेला, या प्रश्नाच्या उत्तरात ६९.२% लोकांनी मजूर असे उत्तर दिले. आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात ५२% पेक्षा जास्त लोक म्हणाले की, मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था वेळीच न करणे चुकीचे होते. ३२.३ %ना पक्षांच्या निवडणूक सभा होऊ देणे चुकीचे वाटले. १०.१% लोक म्हणाले, या काळात निवडणूक घेणेच चुकीचे होते.

48% चे मत-रोजगारालाच आमचे प्राधान्य
सर्व्हेत ६२% लोक म्हणाले की, रोजगार गेल्याने अडचण झाली, तर २० % लोक म्हणाले की, आम्हाला लॉकडाऊनमध्ये कुठल्या ना कुठल्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कोरोना काळानंतरच्या सर्वात प्राधान्याच्या प्रश्नावर ४८ % लोकांनी रोजगारालाच आमचे प्राधान्य असल्याचे सांगितले. रोजगार सध्या लोकांच्या प्राधान्यात कुटुंबापेक्षाही वर आहे.

फक्त १५.५% म्हणतात, कोरोना नियंत्रणात सरकार महत्त्वाचे
आमचा प्रश्न होता की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कुणाची. ५८.१% जणांना स्वत:ची जबाबदारी महत्त्वाची मानली. म्हणजे लोक जागरुक आहेत. तर, २१.१% लोकांनी डॉक्टर्स आणि १५.५% लोकांनी सरकार, तसेच ५.३% लोकांनी समाजाची भूमिका महत्त्वाची मानली.

22% लोकांनी प्रथमच घरी अनुभवले महिलांचे स्वयंपाकातील कौशल्य
सर्व्हेमध्ये २२% लोकांनी सांगितले, या काळात प्रथमच जाणवले की घरातील महिला किती चवदार भोजन बनवतात. लॉकडाऊन काळात घरातील महिलांचे कोणते कौशल्य पाहावयास मिळाले, असे आम्ही विचारले होते. १२% लोकांना घरातील महिला कमी पैशात किती चांगले व्यवस्थापन करतात हे जाणवले. काहींना महिलांची गाण्यातील प्रतिभा कळाली. अर्थात महिलांची ही कौशल्ये व कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रोत्साहन देण्याचे सर्वांनी मान्य केले.

29.5% लोकांना नोकरी गमावण्याचा धोका वाटला, 27.3% ना गावी परतण्याची इच्छा
आम्ही विचारले की, कोरोनाकाळात तुमचा अनुभव काय... यात लोकांची उद्यमशीलतेची इच्छा दिसून आली. २९.५% लोक म्हणाले, की नोकरी गमावण्याचा धोका त्यांना वाटत होता. तर, ३२% लोकांच्या मनात स्वत:चा व्यवसाय आणि २७.३% लोकांना गावी परतून काही व्यवसाय-उद्योग करण्याची इच्छा आहे. हे दोन्ही एकत्र केले तर ५९.३% होतात. ११.१% लोक असे होते ज्यांना या कठीण काळातही आपला व्यवसाय बदलण्याचा विचार मनात आला.

22% ना लॉकडाऊनदरम्यान एकाकी वाटले
सर्व्हेत २२% लोकांनी म्हटले की, सतत घरी राहिल्याने, मित्रांपासून दूर राहिल्याने एकाकीपण जाणवले. एका प्रश्नाच्या उत्तरात १५% नी सांगितले की, आम्ही या काळात योग आणि ध्यान ही सवय जडवून घेतली. १६% लोकांनी सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान फालतू खर्च कमी झाला, बचत करणे शिकलो. ४% लोक म्हणाले की मद्यपान करण्याची सवय सुटली.

41% लोकांसाठी आता प्राधान्य कुटुंबालाच
सर्व्हेत ७०% लोक म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यात मिळालेला आनंद महत्त्वाचा वाटला. तर, अन्य एका प्रश्नावर ४१% लोक म्हणाले, आता त्यांचे प्राधान्य कुटुंबालाच असेल. ३३% म्हणाले, लॉकडाऊनच्या या काळात त्यांनी कुटुंबाला मदत करणे शिकले. घरी राहून प्रत्येक कामात मदतही केली.

मुलांसाठी चांगला लॅपटॉप
कोरोनाकाळातील या अडचणींत तुम्ही सर्वात अगोदर कोणती वस्तू किंवा मालमत्ता घेऊ इच्छितात? यावर ४५% लोकांनी आपण स्वत:चे घर घेऊ इच्छित असल्याचे सांगितले. तर, ४१.६% लोकांनी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप किंवा स्मार्टफोन घेऊ, असे नमूद केले. १३% लोक म्हणाले की सर्वात अगोदर ते स्वत:ची गाडी घेऊ इच्छितात.

बातम्या आणखी आहेत...