आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Lockdwon Effect | Artists Became Businessman; Home grown Vegetable Sales, Grocery Store Options, Digital Marketing, Ready made Biryani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कलावंत झाले व्यावसायिक; घरपोच भाजी विक्री, किराणा दुकानाचा पर्याय, तर कुणी करतंय डिजिटल मार्केटिंग, तयार बिर्याणी विकण्याचा व्यवसाय

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुखवट्यापलीकडचे चेहरे, लॉकडाऊनमुळे अर्थचक्रच थांबल्यामुळे शोधल्या उत्पन्नाच्या नव्या वाटा

(पीयूष नाशिककर)

लाॅकडाऊनमुळे मनोरंजनाचे सगळेच कार्यक्रम बंद पडल्याने कलाकारांचे अर्थचक्रच थांबून गेले. त्यामुळे काेणी कलाकार ऑनलाइन भाजी विकताे अहे तर काेणी घरगुती तयार पीठ विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. किराणा दुकान, तयार बिर्याणीपासून ते डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करत या कलाकारांनी हाती उत्पन्नाच्या नव्या वाटा शाेधल्या आहेत. यात संगीतकार आनंद ओक, लेखक दिग्दर्शक भगवान पाचोरे, लेखक श्रीपाद देशपांडे, सागर घोडके यांचा समावेश आहे.

घरगुती तयार पिठाबराेबर जगण्याचे नवे संगीत

माझ्यासारख्या संगीतकाराला स्टुडिआे, त्याचे भाडे, मेटेनन्स हे काही चुकणार नाही. शिवाय कुटुंब आहे. लाॅकडाऊनमुळे नवीन काम तर नाहीच पण जुन्या कामांचेही पैसे अडकले आहेत. त्यामुळेच मग घरगुती भाजणी, सातूचे पीठ, इतर तयार पिठं घरपोच विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. -आनंद आेक, संगीतकार

ताज्या भाज्या देऊन आराेग्यरक्षण

इंडस्ट्री लगेच सुरू हाेणार नाही आणि घरात बसून शूटिंग वगैरे काही कमर्शिअली खूप शक्य नाही. त्यामुळेच सध्या गरजेचं काय तर लाेकांनी आपलं आराेग्य सांभाळणं. म्हणून नागरिकांचे आराेग्यही राखायचे आणि आपलंही काम सुरू ठेवायचं या दृष्टीने शेतकऱ्यांकडून ताज्या भाज्या घेतलेल्या हॅँडग्लाेव्हज आणि सॅनिटायझरही वापरुन आम्ही लाेकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार पॅकिंग करताे आणि रानभाज्या व्हेजिटेबलच्या माध्यमातून हाेम डिलिव्हरी करीत आहाेत. - भगवान पाचाेरे, लेखक, दिग्दर्शक

कंटेंट रायटिंग ते डिजिटल मार्केटिंग, रिसर्च, वेबसाइट

साॅफ्टवेअरचं काम करत हाेताे. पण आता बराच बदल हाेताे आहे. त्यामुळे कंटेंट रायटिंग आणि डिजिटल मार्केटिंगही सुरू करावं लागलं आहे. मग त्यात प्रमाेशन, सर्च रिझल्ट, वेबसाइट‌्स, विकीपीडिया पेज या गाेष्टींवर काम सुरू केलं आहे. या प्राॅडक्टला खूपच चांगला प्रतिसादही मिळताे आहे. - श्रीपाद देशपांडे, लेखक, अभिनेता

खिमा-बिर्याणीला उत्तम प्रतिसाद

काेराेनाच्या लाॅकडाऊनमध्ये काय करावं. कारण सगळंच बंद झालेलं. उत्पन्नाची साधनं शाेधावी तरी काय? असा प्रश्न असतानाच आपल्यात जी कला आहे त्याचाच कुठे वापर करून काही करता येईल का? असा विचार करतानाच बिर्याणी हा विषय पुढे आला. गेल्या अनेक दिवसांपासून बिर्याणी विकावी हे मनात हाेतंच. या काळात त्यासाठी वेळ आणि बुस्ट मिळाला. सध्या राेज ३ ते ५ किलाे बिर्याणी आणि खिमा याची ऑर्डर मिळते आहे. त्याला प्रतिसादही मिळतोय. - सागर घाेडके, कलाकार

बातम्या आणखी आहेत...