आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Lord jagannath left for 15 days quarantine absence of devotees in rathyatra for the first time in 284 years

पुरी :भगवान जगन्नाथ 15 दिवस क्वॉरंटाइनमध्ये रवाना; 284 वर्षांत प्रथमच रथयात्रेत भाविकांची अनुपस्थिती

पुरी (अनिरुद्ध शर्मा)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरीमध्ये 1 जुलैपर्यंत कलम 144 लागू; बाहेरची वाहने, रेल्वे भुवनेश्वरमध्येच थांबवल्या
  • या रथयात्रेत पुजारी, पांडे मात्र सहभागी असतील, पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनाही दिले निमंत्रण

ज्येष्ठ पौर्णिमेला स्नानानंतर भगवान जगन्नाथ व त्यांचे भाऊ-बहीण आजारी पडले आहेत. त्यामुळे आता पुढील १५ दिवस ते क्वॉरंटाइन राहतील. त्यांना एकांतात एका कक्षात ठेवले जाईल. मोजक्या सेवकांनाच त्यांच्याजवळ जाण्याची परवानगी असेल. या १५ दिवसांच्या कालावधीस अणसर असे म्हटले जाते. या काळात त्यांना केवळ पाणी, फळ आणि काढा असा नैवेद्य दाखवला जातो.

असे मानले जाते की, एकांतवास आणि औषधांच्या सेवनानंतर जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा १५ दिवसांत पूर्ण बरे होतील. नंतर आषाढ प्रतिपदेस नवयौवन धारण करतील. द्वितीयेला (२३ जून) नऊ दिवसांची रथयात्रा सुरू होईल. दरवर्षी या स्नानयात्रेत सुमारे दोन-अडीच लाख भाविक सहभागी होतात. मात्र, यंदा कोेरोना संसर्गामुळे केवळ पुजारी तसेच पुरोहितांच्या उपस्थितीत स्नान आणि यात्रा होईल. नऊ दिवसांच्या रथयात्रेत या वेळी केवळ पुरीचे पांडे, पुजारी आणि सुरक्षा रक्षकांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण, १ जुलैपर्यंत पुरीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच पुरीत बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी आहे. शिवाय रेल्वेही भुवनेश्वर येथेच थांबवल्या जात आहेत. जगन्नाथ मंदिराचे पुजारी जनार्दन पट्टजोशी महापात्र यांनी सांगितले, स्नान यात्रा आणि रथयात्रेत भगवान जगन्नाथाकडे जागतिक कल्याण करावे आणि कोविड-१९ चा संहार करावा, अशी प्रार्थना करण्यात आली. अणसरच्या माध्यमातून हा संदेश दिला जातो की, आजारी असाल तर एकांतवासात राहायला हवे.

१० वनस्पतींपासून तयार औषधी व इतर काढ्यांचा भोग

मुख्य वैद्य कविराज सर्वेश्वर मिश्रा म्हणाले, जगन्नाथांवर उपचारांसाठी दसमूल (१० औषधी वनस्पती) तयार होेत आहे. एकादशीला ते देण्यात येईल. द्वादशीला भगवान पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना नेपाळहून आलेल्या कस्तुरी रंगाने रंगवले जाईल. आषाढ शुक्ल प्रतिपदेस (२२ जून) जगन्नाथाचे नवयौवन रूप दिसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रथयात्रा सुरू होईल.

0