आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • LPG Gas Connection Online Portability Process [Updated]; How To Transfer HP Indane Bharat LPG Distributor?, MYLPG.in

एक्सप्लेनर:LPG ग्राहक आता बदलू शकतात आपला वितरक, जाणून घ्या कधीपासून मिळणार हा लाभ आणि काय होतील याचे बदल?

आबिद खानएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

देशातील घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांना सरकार मोठा दिलासा देणार आहे. आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडून LPG गॅस सिलिंडर घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या आवडीचे वितरक निवडण्याचा पर्याय मिळेल. या सुविधेला रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात असून सुरुवातीला प्रायोगित तत्वावर ही सुविधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुढील आठवड्यापासून देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार आहे. त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापर स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलिंडर वापरासाठी उपलब्ध आहेत.हे सिलिंडर वितरित करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. आता या नवीन योजनेनुसार तुम्ही तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकाल.

ही संपूर्ण योजना काय आहे, ग्राहकांना त्याचा कसा फायदा होईल? आणि आपण घरी बसून आपले वितरक कसे बदलू शकता? याबद्दल जाणून घ्या सविस्तर...

सध्या काय नियम आहे?
सध्या, आपण जर गॅस सिलिंडर बुक करत असाल तर आपण ज्या वितरकाकडून कनेक्शन घेतले आहे त्याच्याकडून तुम्हाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळते. म्हणजेच एकदा तुम्ही वितरकाकडून गॅस कनेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्याच वितरकाद्वारे गॅस संबंधित सर्व सुविधा दिल्या पुरवल्या जातात. आपल्याकडे वितरक बदलण्याचा पर्याय नाही.

या योजनेमुळे काय बदलेल?
आपल्या शहरात ही योजना लागू झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही नवीन सिलिंडर बुक कराल तेव्हा तुमच्याकडे वितरक निवडण्याचा पर्याय देखील असेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्व वितरकांची यादी दिसेल. वितरकाचे रेटिंग आणि इतर वैशिष्ट्ये पाहून तुम्ही वितरक निवडण्यास सक्षम असाल. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या वितरकाकडून तुम्हाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळू शकेल.

वितरक रेटिंग म्हणजे काय?
जेव्हा आपण Google वर काही खरेदी करता किंवा शोधता तेव्हा आपल्याला एक स्टार रेटिंग दिसते. हे रेटिंग उत्पादन किंवा सेवा किती चांगले आहे ते सांगते. 5 स्टार रेटिंग म्हणजे सर्वोत्तम आणि 1 स्टार म्हणजे सर्वात वाईट.

त्याचप्रमाणे वितरकाचे रेटिंगही केले जाईल. वितरकाचे रेटिंग जितके जास्त असेल तितके त्याच्या सुविधांचे प्रमाण अधिक चांगले. जेव्हा आपण सिलिंडर बुक कराल तेव्हा आपल्याला प्रत्येक वितरकाचे रेटिंग देखील दिसेल. हे पाहून, तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट वितरकाची निवड करु शकाल.

वितरक निवडण्याची संपुर्ण प्रक्रिया कशी असेल

 • तुम्हाला www.mylpg.in वेबसाइटवर जाऊन एलपीजी आयडीसह लॉग इन करावे लागेल. लॉग इननंतर, जर तुम्ही आधी नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 • येथे तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार वितरकाची माहिती मिळेल. प्रत्येक वितरकाच्या पुढे रेटिंग दिली असेल. त्यावरुन तुम्ही तुमच्या नवीन वितरकाची निवड करु शकाल.
 • वितरकाची निवड केल्यानंतर, मेलवर कन्फर्मेशनसाठी तुम्हाला एक फॉर्म पाठवला जाईल.
 • तुम्ही वितरक बदलत आहात ही माहिती तुमच्या वर्तमान वितरकाकडे पाठवली जाईल. विद्यमान वितरक 3 दिवसांत तुमच्याशी फोनवर संपर्क साधून वितरक बदलू नये अशी विनंती करू शकतो.
 • जर तुम्ही विद्यमान वितरकाकडे बुकिंग सुरू ठेवू इच्छित असल्यास, वितरकाकडे आपली विनंती रद्द करण्याचा पर्याय असेल.
 • तरीही तुम्हाला वितरक बदलायचा असल्यास तुम्ही त्याला याविषयी कळवू शकता. तो तो आपले कनेक्शन नवीन वितरकाकडे त्वरित हस्तांतरित करेल.
 • जर विद्यमान वितरकाने तुमचे कनेक्शन तीन दिवसांच्या आत हस्तांतरित केले नाही तर चौथ्या दिवशी आपोआप तुमचे कनेक्शन नवीन वितरकाकडे हस्तांतरित केले जाईल.
 • तुम्हाला तुमचे सिलिंडर आणि इतर गोष्टी जमा करण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला वितरकाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होईल.
 • या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची नोंदणी फी, सुरक्षा ठेव किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

याचा फायदा संपूर्ण देशातील लोकांना मिळेल?
नाही. सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू केली जात आहे. यासाठी सरकारने देशातील पाच शहरांची निवड केली आहे, जिथे ही योजना सुरू केली जाईल. यासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये पुणे शहरासोबतच चंदीगढ, कोयम्बतूर, गुरगाव आणि रांची या शहरांचा समावेश आहे.

योजना कधी सुरू होईल?
या 5 शहरांमध्ये ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याची सरकारने तयारी केली आहे. रांची येथील वितरकाच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यापासून ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

सिलिंडर ऑनलाईन बुकिंग करण्याची पद्धतदेखील बदलेल का?
नाही. वितरक निवडण्याशिवाय सिलिंडर बुक करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणताही बदल होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...