आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या 'विक्टिम कार्ड'चे बळी:पुरुषांच्या 4 कहाण्या; कुणाला तुरुंगात जावे लागले तर कुणाचे करिअर उद्धवस्त झाले, एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या नेमके काय घडले होते...

तुम्ही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओत एक लखनौच्या अवध चौकात तरुणी भररस्त्यात एका कॅब चालकाला मारहाण करताना दिसतेय. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या चालकाने तिला धडक दिल्याचे ही तरुणी ओरडून सांगतेय. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथे येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणे थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते. ही मुलगी उद्धट आहे, असे अनेकजण म्हणत असल्याचे या व्हिडिओत ऐकू येते. पोलिसांनी या कॅब चालकाला ताब्यातही घेतले होते.

तर दुसऱ्याच दिवशी, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि मारहाण करणा-या मुलीचे 'विक्टिम कार्ड' उघड झाले. सीसीटीव्हीमध्ये उघड झाले की, मुलीला कॅबने धडक दिली नाही. यानंतर, नेटकऱ्यांनी या मुलीला अटक करण्याची मागणी केली होती. 2 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत, पोलिसांनी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रियदर्शनी यादव या मुलीवर गुन्हा दाखल केला होता.

या घटनेने पुन्हा एकदा 'विक्टिम कार्ड'वर वाद सुरू झाला आहे. कारण यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये महिलांनी आरोप केले आणि याची शहानिशा न करता त्यांच्या आरोपांना सत्य म्हणून स्वीकारले गेले, परंतु नंतर आरोप सिद्ध झाले नाहीत. या दरम्यान बर्‍याच मुलांना त्यांचा स्वाभिमान, करिअर, पैसा याशिवाय बरेच काही गमावले. आम्ही अशाच चार चर्चित प्रकरणांविषयी येथे सांगत आहोत...

1. ट्रॅफिक लाइटवरुन झाला वाद, मुलीने लावला लैंगिक शोषणाचा आरोप

सर्वजीत सिंग बेदी या छायाचित्रात दिसत आहेत, ज्यांच्यावर जसलीन कौर नावाच्या तरुणीने त्यांचे हेच छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करून अश्लील कमेंट केल्याचा आरोप केला होता.
सर्वजीत सिंग बेदी या छायाचित्रात दिसत आहेत, ज्यांच्यावर जसलीन कौर नावाच्या तरुणीने त्यांचे हेच छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करून अश्लील कमेंट केल्याचा आरोप केला होता.

सुरुवातीची कहाणी : जसलीन कौरने 23 ऑगस्ट 2015 रोजी एक ट्विट केले. त्यात रॉयल एनफील्डवर स्वार सर्वजित सिंगचा फोटो होता. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, या व्यक्तीने टिळक नगरमध्ये माझ्यावर अश्लील कमेंट केल्या. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हे ट्विट रिट्विट केले आणि जसलीनच्या शौर्याचे कौतुक केले. जसलीनने सर्वजीतविरोधात एफआयआरही दाखल केला. सोशल मीडियापासून मीडियापर्यंत सर्वजीतला खलनायक बनवण्यात आले.

नंतर सत्य समोर आले: या प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात चार वर्षे चालली. जसलीनची विधाने सतत बदलत होती, ज्यावर न्यायालयाने विश्वास ठेवला नाही. 2019 मध्ये सर्वजीत निर्दोष सिद्ध झाले.

सर्वजीत म्हणतात, "जसलीन खोटे आरोप करून परदेशात गेली, पण यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आई ब्लड प्रेशरची रुग्ण झाली. माझी नोकरी गेली. लोकांनी मला नालायक म्हणून घोषित केले."

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सर्वजीत यांनी आता जसलीनवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे वकील अमिष अग्रवाल म्हणतात की, जसलीन कौरला खोट्या आरोपांसाठी तुरुंगात टाकले पाहिजे. तसेच, सर्वजीतला ज्या त्रासाला सामोरे जावे लागले त्याची भरपाई त्यांना मिळाली पाहिजे.

2. फूड डिलिव्हरीला विलंब झाल्यावरुन वाद, माराहाण केल्याचा आरोप

हितेशाने डिलिव्हरी बॉय कामराजवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर कामराजनेही रडत आपली बाजू मांडली होती.
हितेशाने डिलिव्हरी बॉय कामराजवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर कामराजनेही रडत आपली बाजू मांडली होती.

सुरुवातीची कहाणी : बंगळुरूच्या हितेशाने 10 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तिने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने तिच्यावर कसा हल्ला केला हे सांगितले होते. हितेशाने आपली आपबीती सांगताना म्हटले होते की, डिलिव्हरीला विलंब झाल्यामुळे तिने ऑर्डर घेण्यास नकार दिला. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, डिलिव्हरी बॉयने तिच्या नाकावर मुक्का मारला आणि पळून गेला. यानंतर हितेशाच्या नाकातून रक्त येऊ लागले. तिच्या नाकाचे हाडही फ्रॅक्चर झाले होते. हितेशाने पोलिसांत तक्रारही केली. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली.

नंतर सत्य समोर आले: काही दिवसांनी डिलिव्हरी बॉय कामराजने आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले, 'पावसामुळे फूड डिलिव्हरीसाठी विलंब झाला. यानंतर तरुणीने ऑर्डरच्या बदल्यात पैसे देण्यास नकार दिला. मी जेवण परत करण्यास सांगितले, पण मुलीने जेवण परत केले नाही. या दरम्यान तिने मला चप्पलेने मारण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला वाचवत असताना, मुलीचा हात तिच्या चेहऱ्यावर लागला आणि अंगठीने तिला दुखापत झाली.'

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल म्हणाले की, डिलिव्हरी बॉयचे रेटिंग 5 पैकी 4.75 आहे. झोमॅटोने कामराजला कायदेशीर मदत करण्याचे ठरवले. या प्रकरणातील लेटेस्ट अपडेट असे आहे की, हितेशाने या प्रकरणात तिचे विधान नोंदवले नाही. तिने सोशल मीडियावर सांगितले की, ती बंगलोर सोडत आहे. पोलिसांनी हे प्रकरण बंद केल्याचेही वृत्त आहे.

3. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा इंस्टाग्रामवरुन केला आरोप, मुलाने आत्महत्या केली

सुरुवातीची कहाणी : 2020 मध्ये, 'बॉईज लॉकर रूम' हे इंटरनेटवरील एक स्कँडल समोर आले. यात अल्पवयीन मुले सोशल मीडिया ग्रुपवर बलात्काराबद्दल बोलत असल्याचे समोर आले. यासंदर्भातील बातम्या वाचल्यानंतर गुरुग्राममधील एका अल्पवयीन मुलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्यात तिने आरोप केला की, मानव सिंगने दोन वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. ही पोस्ट व्हायरल झाली आणि मानववर कॉल आणि मेसेजेसचा भडीमार झाला. मानवाने ट्रोलिंगच्या दबावाखाली 2 तासांच्या आत 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला.

नंतर सत्य समोर आले: ज्या तरुणीने मानव सिंगवर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बलात्काराचा आरोप केला होता, तिने याविषयीची कोणतीही पोलीस तक्रार केली नसल्याचे समोर आले. मानवच्या कुटुंबीयांनी मुलीवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. वडिलांचा आरोप आहे की, गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही. यानंतर मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेला करायला सांगितले आहे.

मानव सिंगच्या कुटुंबीयांचे वकील अमिश अग्रवाल यांनी म्हटले की, एका खोट्या आरोपामुळे माझ्या क्लायंटच्या एकुलत्या एका मुलाचा जीव गेला. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे, सोबतच मानवच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईदेखील मिळायला हवी.

4. बसच्या सीटवरून वाद, मुलीने बेल्टने मारहाण केली

रोहतकच्या दोन बहिणींनी तरुणांना बेल्टने मारहाण केली. मुलींनी आरोप केला की, तरुण त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते.
रोहतकच्या दोन बहिणींनी तरुणांना बेल्टने मारहाण केली. मुलींनी आरोप केला की, तरुण त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते.

सुरुवातीची कहाणी : ही घटना डिसेंबर 2014 ची आहे. रोहतक रोडवेज बसस्थानकातून सोनीपतकडे जाणारी बस प्रवाशांनी भरलेली होती. कॉलेजमधून घरी परतणाऱ्या पूजा आणि आरती नावाच्या दोन बहिणीही बसमध्ये होत्या. वादानंतर या दोन्ही बहिणींनी तीन तरुणांना बेल्टने मारहाण केली. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ बनवला, त्यानंतर या दोन बहिणींच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक केले गेले. तरुण जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या मुलींनी केला होता. त्यानंतर मुलांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

नंतर सत्य समोर आले: बसमधील इतर प्रवासी पुढे आले आणि त्यांनी सांगितले की, ही विनयभंगाची घटना नाही. केवळ बसमधील एका जागेवरुन हा वाद होता. हे प्रकरण अडीच वर्षे चालले. मार्च 2017 रोजी न्यायालयाने रोहतकमधील आसन गावातील रहिवासी कुलदीप, मोहित आणि दीपक या तीन तरुणांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, तोपर्यंत मुलांचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

बातम्या आणखी आहेत...