आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचेहऱ्यावर लांडग्यासारखे केस असलेला मुलगा हनुमान नव्हे:ललीतला वेअरवुल्फ सिंड्रोम नावाचा आजार, चुकीच्या औषधामुळे हा आजार होण्याची भीती

नीरज सिंह8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2005 मध्ये मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील नांदलेट गावात एका मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म होताच त्याच्या चेहऱ्यावर लांब केस वाढले होते. काही लोकांनी तर बाळाला बाल हनुमान मानून पूजा करण्यास सुरुवात केली. पण जसजसं हे मूल मोठं होऊ लागलं तसतसं या केसांची मोठी अडचण होऊ लागली.

चेहऱ्यावर केस असल्याने ललितला खाण्यासाठी देखील त्रास होऊ लागला. सोबतची मुलं त्याला माकड म्हणायची, त्याच्याशी खेळायला लाजायची. घरच्यांनी त्याला अनेक ठिकाणी दाखवले, मात्र डॉक्टरांनी हा दुर्मिळ आणि असाध्य आजार असल्याचे सांगितले. ही कहाणी आहे, 17 वर्षीय ललित पाटीदारची, जो त्याच्या संपूर्ण शरीरावरील केसांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, आपण वेअरवुल्फ सिंड्रोम म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत, ज्या आजाराशी सध्या ललित पाटीदार झगडत आहेत…

100 वर्षांपूर्वीपर्यंत चेहऱ्यावरील केस हे उत्पन्नाचे साधन मानले जात होते.

रशियातील रहिवासी असलेल्या फेडोर झेफ्टीच्यू यांनाही वेअरवुल्फ सिंड्रोमने ग्रासले होते. फेडोर जो-जो द डॉग फेस्ड बॉय म्हणून प्रसिद्ध होते.
रशियातील रहिवासी असलेल्या फेडोर झेफ्टीच्यू यांनाही वेअरवुल्फ सिंड्रोमने ग्रासले होते. फेडोर जो-जो द डॉग फेस्ड बॉय म्हणून प्रसिद्ध होते.

1884 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध शोमन पी टी बर्मन यांनी एक शो तयार केला होता. या शोमध्ये कोस्ट्रोमा फॉरेस्टची कथा सांगण्यात आली. त्यात जंगली मनुष्य गुहेत राहत असे. तेथे उपस्थित असलेल्या एका शिकारीला याची माहिती मिळाली. शिकारी जंगली माणसाला (ज्याच्या चेहऱ्यावर केस आहेत) तसेच त्याच्या मुलालाही पकडतो. मुलाच्याही चेहऱ्यावर केस आहेत आणि त्याचा चेहरा कुत्र्यासारखा दिसतो. या शोमध्ये वाइल्ड मॅनच्या मुलाचे नाव 'जो-जो द डॉग फेस्ड बॉय' असे ठेवण्यात आले आहे. विचलित झाल्यावर जो-जो भुंकतो आणि गुरगुरतो. त्या काळी लोकांना ही सत्यघटना असल्याचे वाटत होते.

वास्तविक वाइल्ड मॅन जंगलात राहत नव्हता, तर रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये राहत होता. त्याचे नाव एड्रियन होते. त्याचा मुलगा, जो कुत्र्यासारखा दिसत होता, तो फेडोर झेफ्टिच्यू होता. वडील आणि मुलगा दोघेही हायपरट्रिकोसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. त्यांना वेअरवुल्फ सिंड्रोम म्हणतात. 100 वर्षांपूर्वीपर्यंत लोक या आजाराला कमाईचे साधन मानत असत. एड्रियनचे वडीलही सर्कसमध्ये परफॉर्म करायचे आणि प्रदर्शनात स्वतःला कोस्ट्रोमा फॉरेस्टचा जंगली माणूस म्हणवून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे.

वास्तविक, आपल्या हात-पायांचा आणि प्रत्येक बोटाचा आकार ठरलेला असतो. यासोबतच शरीराच्या कोणत्या भागात केस असतील आणि कुठे नसतील, हेही ठरलेले असते. पण जर आपल्या शरीराचे जीन कोडिंग गडबडले तर ते असे होऊ शकते. उदाहरणार्थ, एक हात खूप लांब होतो किंवा चेहऱ्यावर केस वाढतात. वाइल्ड मॅनची हीच समस्या होती.

पहिली केस कॅनरी बेटावर आढळली

हायपरट्रिकोसिस किंवा वेअरवुल्फ सिंड्रोमची पहिली नोंद झालेली केस कॅनरी बेटांमधील पेट्रस गोन्साल्विस यांची होती. इटालियन निसर्गशास्त्रज्ञ उलिसे अल्ड्रोवंडी यांनी त्याचे दस्तऐवजीकरण केले आणि 1642 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हिस्ट्री ऑफ मॉन्स्टर्स विथ क्रॉनिकल्स ऑफ ऑल अॅनिमल्समध्ये प्रकाशित केले.

गोन्साल्विस यांच्या कुटुंबात दोन मुली, एक मुलगा आणि एक नातू हायपरट्रिकोसिसने ग्रस्त असल्याचे वृत्त आहे. जन्मजात वेअरवुल्फ सिंड्रोमची केवळ 50 प्रकरणे गेल्या 300 वर्षांत नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, साधारणतः अशा सुमारे 100 प्रकरणांचे वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये दस्तऐवजीकरण केले जाते.

स्पेनमध्ये चुकीच्या औषधामुळे 20 हून अधिक मुलांमध्ये अशी लक्षणे समोर आली

2019 मध्ये स्पेनमधील 20 मुलांमध्ये वेअरवुल्फ सिंड्रोमचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. जे चुकीचे औषध दिल्याने झाले. यावेळी मुलांच्या कपाळावर, गालावर, हातावर आणि पायावर मोठ्या प्रमाणात केस उगवले होते.

स्पेनच्या आरोग्य नियामकांना त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की, 2 वर्षांपूर्वी नातेवाईकांनी आपल्या मुलांच्या पोटात दुखणे आणि गॅसच्या तक्रारी असल्याने ते वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्याला ओमेप्राझोल नावाचे औषध सुचवले. नातेवाइकांनी मेडिकल दुकानातून हे औषध विकत आणले आणि मुलांना पाजले. यानंतर मुलं बरी झाली, पण इथूनच मुलांच्या अडचणी सुरू झाल्या.

ज्या मुलांनी हे औषध खाल्ले, त्यांच्या अंगावर नको असलेले केस वाढू लागले. तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनाने याची चौकशी करून या मुलांना चुकून ओमेप्राझोलऐवजी मिनोक्सिडील देण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात असे समोर आले की, मिनोझिडिल या औषध कंपनीने आपल्या सिरपच्या बाटल्यांवर पोटदुखी आणि गॅसवर वापरल्या जाणार्‍या ओमेप्राझोल या औषधाचे लेबल लावले. यानंतर, ते स्पेनमधील अनेक दुकानांमध्ये वितरित केले गेले. वास्तविक मिनोक्सिडिल हे टक्कल पडण्यापासून बचाव करण्यासाठी एक औषध आहे, म्हणजेच हे औषध घेतल्याने केस वाढू लागतात.

मेक्सिकोमध्ये एकाच कुटुंबातील 30 लोकांमध्ये वेअरवुल्फ सिंड्रोम

उजव्या बाजुला हेस्युस एसेव्हस आणि डावीकडे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य ज्यांना वेअरवुल्फ सिंड्रोम आहे.
उजव्या बाजुला हेस्युस एसेव्हस आणि डावीकडे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य ज्यांना वेअरवुल्फ सिंड्रोम आहे.

मेक्सिकोच्या लोरेंटो येथील हेस्युस एसेव्हस एका सकाळी उठले तेव्हा त्यांच्या कुटुंबाला लक्ष्यात आले की, त्यांच्या कुटुंबातील आणखी एका मांजरीची हत्या करण्यात आली आहे. यानंतर जेव्हा ते कामावर निघाले, तेव्हा काही लोक त्यांची खिल्ली उडवत होते आणि त्यांचा फोटो काढण्याआधी त्यांना राक्षसी प्राणी म्हणत होते. आता जगप्रसिद्ध सर्कस कलाकार बनलेल्या 'वुल्फ मॅन' हेसियस एसेव्हसच्या आयुष्यातील हे नित्याचे आहे. वुल्फ मॅनचा संपूर्ण चेहरा दाट, गडद केसांनी झाकलेला आहे. म्हणजेच, वुल्फ मॅन वेअरवुल्फ सिंड्रोमने ग्रस्त आहेत. केवळ वुल्फ मॅनच नाही तर त्याच्या कुटुंबातील इतर 29 सदस्यांनाही याचा त्रास होतोय. संपूर्ण कुटुंब चुए या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे, जीचे नाव 'चुए द वुल्फ मॅन' असे आहे.

बातम्या आणखी आहेत...