आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टपती जनावरासारखा मारायचा:वयाच्या 14 व्या वर्षी लग्न, 12 वर्षांनी वेगळी झाले; मी 1000 मुलांना शाळेशी जोडले

नीरज झा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आदिवासी कुटुंबात माझा जन्म झाला. पप्पा मजूर होते. 6 बहिणींपैकी फक्त मी आठवीपर्यंत शिकले. मी शाळेत गेले तर उच्चवर्णीय मुले माझी छेड काढायची. ते वडिलांना म्हणायचे - दलित आदिवासी असले तरी तुम्ही तुमच्या मुलीला शिकवता. तुला तिला मास्तरिन (शिक्षक) बनवायचे का? त्यापेक्षा गायी-बकर्‍या चरल्या, आमच्याकड कामे-धंदा केला तर पैसेही मिळतील.

जेव्हा मी 14 वर्षांची झाले तेव्हा कॉलरामुळे आईचा मृत्यू झाला. तरुण मुलगी आईशिवाय घरात राहिली तर गुंड तिच्यासोबत काहीतरी चूकीचे करतील, अशी भीती वडिलांना वाटू लागली. त्यांनी माझे लग्न 24 वर्षांच्या एका रोजंदारी मजुराशी लावले. सासरी आल्यावर पतीने मला जनावरासारखी मारहाण करण्यास सुरुवात केली. बरेच दिवस मी अंथरुणातून उठू शकले नाही. ही मारहाण मला 12 वर्षे सहन करावी लागली. त्यानंतर मी पतीपासून वेगळी झाले.’

ही कथा आहे मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सिया दुलारीची. सिया आदिवासी महिला आणि मुलांसाठी काम करते. 50 गावांतील 1000 हून अधिक मुलांना शाळेत पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ही ती मुले आहेत ज्यांचे शिक्षण थांबले होते. यासोबतच सियाने 'आदिवासी वन हक्क कायद्या'अंतर्गत 1400 हून अधिक लोकांना राहण्यासाठी आणि शेती करण्यासाठी जमिनीचा पट्टा मिळवून दिला.

सिया आदिवासी कुटुंबांना घरोघरी भेट देतात. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मोहीम राबवतात..
सिया आदिवासी कुटुंबांना घरोघरी भेट देतात. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मोहीम राबवतात..

42 वर्षीय सिया 'रेवांचल दलित आदिवासी सेवा संस्था' चालवतात. ज्या भागात सिया काम करतात त्या भागात बहुतेक कोल आदिवासी समाजाची वस्ती आहे. गेल्या तीन-चार वर्षात सुमारे 10-15 गावांमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत, जिथे आदिवासींना गरिबीमुळे आपल्या मुलींची विक्री करावी लागते.

सिया म्हणतात, 'ज्यांचं लग्न होत नाही. मध्यमवयीन पुरुष या मुलींना 80 हजार ते 1 लाख रुपयांना विकत घेतात. हे लोक इतर राज्यातील आहेत. काही वर्षांपूर्वी एका आदिवासी कुटुंबाने त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीला उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाला विकले. मुलगा 40 वर्षांचा होता. त्याला तीन मुले होती.

जेव्हा मला याची माहिती मिळाली तेव्हा मी यूपी आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने एफआयआर नोंदवला. मुलगा तुरुंगात गेला. मुलीची सुटका केली. आज ती मुलगी तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करून जगत आहे. सिया यांनी अशी अर्धा डझन प्रकरणे थांबवण्यात यश मिळवले आहे.

सिया यांच्या कपाळावर एकच टिकली आहे. त्यांच्या हातात काचेची एकच बांगडी घातलेली आहे. सिया म्हणते, 'स्त्रियांच्या बांगड्या विधवा झाल्यावर तुटतात. सिंदूर लावता येत नाही. माझा नवरा जिवंत आहे, तरीही मी विधवेसारखी जगते.

एके दिवशी पतीने काठीने मारहाण करताना सर्व बांगड्या फोडल्या. सिंदूर काढून टाकला. आगीत साडी जाळून खाक केली. म्हणाला की, माझ्या नावाचे सिंदूर कधीही लावू नकोस. तेव्हापासून मी अशीच जगतेय. नंतर लोक म्हणू लागले की, काहीही झाले तरी माझा नवरा जिवंत आहे ना... तेव्हापासून मी फक्त एक टिकली लावते.'

सकाळचे जवळपास दहा वाजले आहेत. सिया यांच्या संस्थेत काम करणारे कर्मचारी यायला लागले आहेत. सिया म्हणते, 'सध्या माझ्यासोबत 15 जणांची टीम काम करत आहे. एके काळी मी एका संस्थेत 300 रुपये महिन्यावर काम करायचे. आज पुन्हा आदिवासी भागात जाऊन पोषण आहाराबाबत सर्वेक्षण करायचे आहे. एका मोठ्या एनजीओसोबत आम्ही या प्रकल्पावर काम करत आहोत.

सिया यांच्या टीममध्ये सध्या 15 लोक आहेत, जे आदिवासींसाठी काम करत आहेत.
सिया यांच्या टीममध्ये सध्या 15 लोक आहेत, जे आदिवासींसाठी काम करत आहेत.

सिया त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगतात, 'मला आठवतं जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा गावातली उच्चवर्णीय मुलं समोरून चालायची. यांचा मला स्पर्ध होवू नये, मी मागे चालायचे. कधी कधी चुकूनही मी या लोकांच्या पुढे गेले की, सोबत आलेले शिक्षक मला थप्पड मारायचे आणि म्हणायचे – तुला खूप पुढे जायचे आहे का.

इयत्ता दुसरीपर्यंत ती घरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावात शिकायला जायचे. ते उच्चवर्णीय गाव होते. हे लोक दलित आदिवासी मुलींची छेड काढायचे. घाणेरड्या डोळ्यांनी पाहायचे. त्यामुळे वडील मला शिक्षण घेण्यास मनाई करायचे. त्यामुळे मोठ्या बहिणींना शिक्षण घेता आले नाही. मी देखील जमीनदाराच्या घरी मातीकाम करायला जायचे, पण मला अभ्यास करायचा होता.

मी शिकायला गेलो तेव्हा उच्चवर्णीय लोक माझ्या वडिलांना टोमणे मारायचे आणि म्हणायचे की, ‘क्यों भाई, बेटी को मस्टराइन बनाओगे’ पप्पा उत्तरात एवढंच बोलू शकत होते की, ‘नहीं साहेब, मस्टराइन न बनिहे, त अपन नाव-गांव त लिखे के जनिहे’ (नाही साहेब, ती शिक्षक होणार नाही, पण ती आपले नाव आणि गाव लिहायला शिकेल).

एका वर्षानंतर माझ्या गावातही शाळा सुरू झाली, पण इमारत नव्हती. कडुलिंबाच्या झाडाखाली वर्ग भरायचा. इथून मी आठवीपर्यंत शिकले. गावात अस्पृश्यतेची परिस्थिती अशी होती की माझे कुटुंबीय शेतातून धान्य तयार करून जमीनदारांना देत असत. घरात गेल्यावर त्याच धान्याला आम्हाला हात लावता येत नव्हता.

असे म्हणत सिया यांचे डोळे भरून आले. त्या तं्याच्या आई-वडिलांना मिस करत आहे, पण त्यांचे एकही छायाचित्र नाही. सिया म्हणतात की, 'मी लहानपणापासून माझ्या आईला सांगत असे की, मला शिक्षिका व्हायचे आहे. आदिवासी मुलांना शिकवायचे, पण वयाच्या 14 व्या वर्षी हे स्वप्नही भंगले.

90 च्या दशकातील गोष्ट आहे. गावात कॉलरा पसरला होता. त्यात आदिवासी लोक सर्वाधिक होते. एके दिवशी आई जमीनदाराच्या घरी भात मळणीसाठी गेली होती. तिथून परतल्यावर तिलाही कॉलरा झाला. उलट्या आणि जुलाब सुरू झाले. आठवडाभरातच आईचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांनी माझे आणि माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न एकाच दिवशी, एकाच मंडपात केले. दोन गावातून मिरवणूक आली होती. बहीण फक्त 12 वर्षांची होती.

सिया नियमितपणे गावोगावी आदिवासी समाजातील महिला आणि पुरुषांच्या भेटी घेतात, त्यांच्या तक्रारी ऐकतात.
सिया नियमितपणे गावोगावी आदिवासी समाजातील महिला आणि पुरुषांच्या भेटी घेतात, त्यांच्या तक्रारी ऐकतात.

तुमच्या पतीचे काही फोटो आहेत का?

सिया काही सेकंद माझ्याकडे बघत राहतात. म्हणतात की, 'शोधावे लागेल....'

बराच वेळ शोधल्यानंतर सिया यांनी एक ब्लॅक अँड व्हाइट पासपोर्ट आकाराचा फोटो दाखवला. त्या म्हणाल्या की, 'जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी आले, तेव्हा माझ्या नवऱ्याची इच्छा होती की, मी घरातच राहावे. कोणाशीही बोलू नये, पाण्याने भरलेले भांडे डोक्यावर ठेवून अनेक किलोमीटर लांबून पाणी घेऊन येत होते.

माझे वय कमी होते, डोक्यावर आणि कमरेवर भांडे उचलता येत नव्हते. ते पडायचे आणि तुटायचे. यामुळे माझा नवराही मला मारहाण करायचा.

2000 ची घटना आहे. मुलांसाठी काम करणाऱ्या CRY (Child Rights and You) या संस्थेचे काही सदस्य गावात आले होते. मी घराच्या उंबरठ्यावरून या लोकांना ऐकत होते. हे लोक आदिवासी समाजातील महिला आणि मुलांबद्दल बोलत होते.

त्यांच्यासोबत काम करावे असे मला वाटले. एके दिवशी मी माझ्या पतीला न सांगता या लोकांना भेटायला गेले. मग मी या टीमसोबत गावोगावी काम करू लागले. कुपोषित मुलांचे सर्वेक्षण करणे हे माझे काम होते. नवऱ्याला कळताच आमच्यात भांडण सुरू झाले.

सिया त्यांच्या पतीचा फोटो दाखवत आहे.
सिया त्यांच्या पतीचा फोटो दाखवत आहे.

सिया सांगतात की, 'दोन-तीन वर्षे काम केल्यानंतर एका एनजीओने मला 300 रुपये महिना पगारावर कामावर ठेवले. मी बरेच दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर राहायचे. यामुळे पतीला संशय येऊ लागला की माझे कोणासोबत तरी अफेअर आहे.

आठवी पास मुलीला सर्व कसे समजेल. मी माझ्या पतीला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याबाबत सांगितले. ते ऐकताच तो संतापला. म्हणाला की, तीन मुलांची आई असूनही तू अभ्यास करशील. घराबाहेर जाशील. त्याने मला मारहाण करून रक्तबंबाळ केले.

मी ठरवलं होतं की मला अभ्यास करायचा आहे. मी प्रवेश घेतला. नोकरीबरोबरच दहावी, बारावी आणि नंतर ग्रॅज्युएशन केले. यानंतर मी माझ्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला 3 मुले होती.

मग माझी स्वतःची एनजीओ सुरू केली. सिया म्हणतात की, 'आदिवासी महिलांमध्ये शोषणाच्या घटनाही सर्वाधिक आहेत. आता परिस्थिती थोडी बदलली आहे. कारण, या लोकांना लिहिता-वाचणे अजिबात कळत नाही, ते अशिक्षित आहेत.

मी आदिवासी महिलांसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला लोकांनी विरोध केला. ते म्हणायचे की, मला माझे घर बसवता आले नाही. आता आमच्या घराचे घर बसवायला निघाले आहेत. हळूहळू जेव्हा मी प्रशासन, ब्लॉक अधिकारी, मोठ्या एनजीओमध्ये काम करू लागले, लोकांना बदल दिसू लागला, तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला सुरुवात केली.

आपल्या समाजातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराशी जोडण्यासाठी सिया पुढाकार घेत आहेत.
आपल्या समाजातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराशी जोडण्यासाठी सिया पुढाकार घेत आहेत.

सिया सांगतात की, आदिवासी कुटुंबातील लोक कमाईसाठी घराबाहेर जातात. गर्भवती महिलांना स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी हे माहित नसते. किती मुले जन्माला घालावी?

अशी प्रकरणे सुमारे 15 गावातून समोर आली होती, ज्यामध्ये महिलांचा गर्भावस्थेतच मृत्यू होत असे. प्रसूतीदरम्यान अनेक महिलांचा मृत्यू झाला. रक्ताची कमतरता, घरी प्रसूती आणि गर्भधारणेदरम्यान वेळोवेळी लसीकरण न करणे ही मुख्य कारणे होती.

अंधश्रद्धेमुळे हे लोक लस घेत नाही. आम्ही त्यांना त्याचे फायदे सांगू लागलो, नंतर हळूहळू केसेस कमी होत गेल्या.

बातम्या आणखी आहेत...