आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टपत्नीवर ओरडणे पडले महागात:पतीला सोडावे लागले स्वतःचे घर, प्रोटेक्शन ऑर्डरनुसार पती होऊ शकतो बेघर

अलिशा सिन्हा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर घरात शांती कायम ठेवायची असेल, तर नवऱ्याला घराबाहेर काढणे हाच एकमेव उपाय आहे. न्यायालयांनी याचे आदेश जारी केले पाहिजे. भलेही नवऱ्याला राहायला दुसरे घर नसले तरी. कौटुंबिक हिंसाचाराच्या एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच असे म्हटले आहे.

जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
या प्रकरणातील तक्रारदार पत्नी ही वकील आहे. त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर त्यांनी दुसरी एक याचिकाही दाखल केली. ज्यात त्यांनी घटस्फोटापर्यंत घरात शांतता राहण्यासाठी पतीलाच घराबाहेर जाण्याचे आदेश कोर्टाने द्यावे अशी विनंती केली. तर दुसरीकडे पतीने आपण चांगला नवरा असल्याचा दावा केला.

यावर कोर्टाने पतीला घरात शांती कायम ठेवण्यास सांगितले. मात्र पत्नी या आदेशाशी सहमत नव्हती. त्यावर त्यांनी दुसरी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती मंजुळा यांनी ही याचिका मान्य करत पतीला दोन आठवड्यांत घर सोडण्याचे आदेश दिले.

(न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या महिलांना घरात नवऱ्याच्या उपस्थितीची भीती वाटते, अशा महिलांविषयी न्यायालयांनी उदासीन राहू नये.)

न्यायालय असा निर्णय कधी आणि कोणत्या परिस्थितीत देऊ शकते हे कौटुंबिक आणि फौजदारी कायदेतज्ञ, वकील सचिन नायक यांच्याकडून समजून घेऊया...

प्रश्न: अशा परिस्थितीत कोणतीही महिला (तक्रारदार वकील महिलेप्रमाणे) आपल्या पतीला घरातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयात दाद मागू शकते का?

उत्तर: शंभर टक्के महिला दाद मागू शकते. मग ती महिला गृहिणी असो किंवा नोकरी करणारी. जर तिचा पती कौटुंबिक हिंसाचार करत असेल तर ती न्यायालयात याचिका दाखल करून अपील करू शकते. जर महिलेने कोर्टात आपले म्हणणे सिद्ध केले, तर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 च्या कलम 19B अंतर्गत, पतीने पत्नी आणि मुलाला नवीन घर द्यावे असा आदेशही न्यायालय देऊ शकते. जर तो घर देण्यास असमर्थ असेल तर त्याला स्वतःला घर सोडण्याचाही आदेश कोर्ट देऊ शकते.

बहुतांश प्रकरणांत पती किंवा सासरचे लोक लग्नानंतर कधी हुंड्यासाठी तर कधी मुलगी झाल्यामुळे महिलांचा छळ करतात. अशा परिस्थितीत, विवाहित महिलांसाठी देशात काही कायदे आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी खालील ग्राफिक्स वाचा...

प्रश्नः या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की, जर पतीमुळे कुटुंबातील वातावरण बिघडत असेल, तर Protection Order म्हणजेच संरक्षण आदेशानुसार पतीला घरातून बाहेर काढले जाऊ शकते. हे Protection Order म्हणजे काय आहे?
उत्तर-
Protection Order समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा, वकील सचिन नायक यांनी अधिक चांगल्या पद्धतीने हा विषय उलगडून सांगितला आहे.

प्रश्नः या प्रकरणात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, पतीने नाही. मग घटस्फोट कसा होऊ शकतो?
उत्तरः
पतियाळा हाऊस कोर्टाच्या अधिवक्ता सीमा जोशी म्हणतात की, या प्रकरणात पत्नीला contested divorce म्हणजेच विवादित घटस्फोट मिळू शकतो. याला एकतर्फी घटस्फोट असेही म्हणतात. यामध्ये कोर्ट पत्नीला घटस्फोट का हवा आहे याचा पुरावा मागू शकते.

हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13 मध्ये contested divorce साठीच्या कारणांविषयी स्पष्टपणे नमूद केले आहे-

व्यभिचार - हा गुन्हा आहे, ज्यानुसार पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवत असल्यास.

क्रूरता- यात मानसिक किंवा शारीरिक वेदना, शिवीगाळ, मानसिक किंवा शारीरिक छळ यांचा समावेश असू शकतो.

धर्म परिवर्तन- हिंदू विवाहात पती किंवा पत्नीपैकी एकाने धर्मांतर केल्यास ते घटस्फोटाचे कारण मानले जाऊ शकते.

मानसिक विकार- मानसिक विकारामध्ये मनाची स्थिती, मानसिक आजार किंवा समस्या यांचा समावेश होतो ज्यामुळे व्यक्ती असामान्यपणे आक्रमक बनते.

कुष्ठरोग- कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आणि जुनाट आजार आहे. ज्यामुळे त्वचा आणि नसा खराब होतात.

भागीदारांमध्ये संवाद नाही- जर पती-पत्नीमध्ये सात वर्षांहून अधिक काळ संवाद नसेल, तर ते घटस्फोटाचे कारण मानले जाऊ शकते.

संन्यास- हिंदू कायद्यानुसार संसाराचा त्याग हे घटस्फोटाचे कारण आहे. जर पती किंवा पत्नीपैकी एक निवृत्त झाला असेल तर त्याला घटस्फोट मिळतो.

या संपूर्ण प्रकरणात महिलेचा नवरा काय म्हणाला, जाणून घेऊया

पतीने दावा केला की तो एक चांगला पती आणि पिता आहे. त्याच्या पत्नीला घरात राहणे आवडत नाही. ती बहुतेक प्रसंगी घराबाहेर जात-येत असते. एक आदर्श आई ती असते जी नेहमी घरात राहते आणि घरातील कामे करते. पत्नी वकील असल्यामुळेच ती त्याला कोर्टात खेचत आहे, असे पतीचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने काय म्हटले हेही जाता जाता जाणून घेऊया...

  • एकमेकांवर दोषारोप केल्याने परिस्थिती आणि प्रकरण दोन्ही बिघडेल. या प्रकरणात पती-पत्नीला दोन मुले आहेत. एक दहा वर्षांचा आणि एक सहा वर्षांचा. पती नेहमी शिवीगाळ करेल आणि ओरडेल, हे मुलांसाठी योग्य नाही. त्यांच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल.
  • वैवाहिक जीवन चांगले नसेल तर एकाच छताखाली राहण्यात काही अर्थ नाही. कधीकधी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. पण या प्रकरणात असे होऊ शकत नाही. कारण नवऱ्याच्या वागण्यामुळे मुलं घाबरतात. पत्नीला स्वतःला असुरक्षित वाटत आहे.
  • दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल दिला. न्यायमूर्ती आरएन मंजुळा यांनी आदेश दिला की, पीडित पत्नीच्या पतीने दोन आठवड्यांच्या आत घराबाहेर पडावे. जर पतीने असे केले नाही तर त्याला घरातून हाकलण्यासाठी पोलीस पाठवले जातील.
बातम्या आणखी आहेत...