आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ एक्स्क्लुझिव्ह:जन्मापासून इथंच राहत होतो, आता कुठं जाऊ? लेबर कॉलनीतील नागरिकांचा आक्रोश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या लेबर कॉलनीमध्ये आज सुमारे 65 वर्षांपासून वसलेल्या लेबर कॉलनीवर बुलडोजर चालवण्यात आला. याठिकाणची जुनी घरे जीर्ण झाल्यानं ती सोडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला होता. कोर्टानेही प्रशासनाच्या बाजुने निर्णय दिला. त्यामुळं अखेर येथील घरांवर कारवाई करत बुधवारी ही घरे जमीनदोस्त करण्यात आली. दिवसभर याठिकाणी अनेकांचा आक्रोश पाहायला मिळाला. जन्मापासून इथंच राहणाऱ्यांना घर सोडून कुठं जायचं हेही कळत नव्हतं. पण याठिकाणी आता केवळ ढिगारे शिल्लक आहेत. प्रशासनानं पुनर्वसन करण्याची मागणी येथील नागरिकांनी केलीय. तर प्रशासनानंही पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलंय. या कारवाईसंदर्भातील दिव्य मराठी व्हिडिओ रिपोर्ट...

बातम्या आणखी आहेत...