आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'20 डिसेंबर 2022, ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क भागात झुडुपांत फेकलेल्या बालिकेविषयी माहिती मिळाली. कुत्रे बालिकेचे लचके तोडत होते. ती 4-5 तासांपूर्वीच जन्मली होती. गर्भनाळही ताजी होती. कडाक्याच्या थंडीत एका पातळ शालीत लपेटलेली. भूकेने रडत होती. फेकल्याने तिचा एक पाय मोडला होता. सकाळी 8.30 वाजता मी तिथे पोहोचलो. बालिकेला घरी आणले आणि पत्नीकडे सोपवले. पत्नीने छातीशी धरून आपले दूध पाजले. गरम कपड्यांत लपेटले. तेव्हा तिला रुग्णालयात पोहोचवले. तिला हायपोथर्मिया झाला होता. निरागस मुलीला मशीनद्वारे ऊब दिली तेव्हा तिचे प्राण वाचले.'
ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क ठाण्यातील SHO विनोद कुमार सिंह यांनी दैनिक भास्करला फोनवरून सांगितले की बालिकेकडे पाहून असा विचार मनात आला की, कुणी आपल्या बालकाला अशा स्थिती कसे फेकू शकते?
ही स्थिती एका शहराची नाही, तर बालकांना फेकल्याच्या बातम्या प्रत्येक शहर-गावात ऐकायला मिळतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दरवर्षी गर्भपात, इन्फन्टिसाईड(एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाची हत्या), फीटिसाईड(भ्रूणहत्या) आणि अबॅन्डन्मेन्ट(जन्मानंतर बालकाला सोडून देणे) यावर आपला अहवाल जारी करते. हे ग्राफिक्स बघा.
भारतच नव्हे पूर्ण जगात फेकली जातात बालके
नवजात बालकांना फेकण्याचा गुन्हा भारतच नव्हे तर अमेरिका आणि युरोपातील देशांतही आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, युरोपातील देश इटली, हंगेरी, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, ग्रीससारख्या विकसित देशांतही नवजात रस्त्यावर फेकले जातात किंवा टॉयलेटमध्ये सोडून दिले जातात. भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि बांग्लादेशातही नवजातांना फेकण्याच्या घटना समोर येतात.
युरोपातून झाली बेबी हॅचेसची सुरुवात
'द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकानुसार, 18 व्या शतकात युरोपात फेकल्या गेलेल्या नवजातांना वाचवण्याची सुरुवात झाली. याला 'बेबी हॅचेस' असे नाव देण्यात आले. हे एक असे आश्रयस्थळ आहे जे पाळण्यासारखे असते आणि एखाद्या रुग्णालयाशी जोडलेले असते. जे आई-वडील आपल्या बालकांचे पालन-पोषण करू शकत नाही, ते त्यांना इथे सोडून जातात. पाळण्यात बालके आल्यानंतर त्याच्या पालन-पोषणाची पूर्ण जबाबदारी सरकारवर असते. या बालकांना दत्तक घेण्याची कुणाची इच्छा असल्यास, कायदेशीर प्रक्रियेने ते दत्तक घेऊ शकतात. आता संपूर्ण युरोपात बेबी हॅचेसची प्रथा आहे.
जर्मनीत 200 हून अधिक जागी बेबी हॅचेस
काही देशांत बेबी हॅचेसना 'फाऊंडलिंग व्हील्स' असे नाव देण्यात आले आहे. इटली, हंगेरी, पोलंड, रशिया, जपान, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, अमेरिकेत बेबी हॅचेस सेंटर आहेत. चीन आणि पाकिस्तानातही 'सेफ आयलंड बेबीज' नावाने बालकांसाठी बेबी हॅचेस आहेत. जर्मनीत 200 हून अधिक ठिकाणी बेबी हॅचेस आहेत. अमेरिकेत रुग्णालये, पोलिस ठाणे, अग्निशमन स्थानकांबाहेर बेबी हॅचेस बनवण्यात आले आहेत.
देशात तमिळनाडूतून सुरू झाली नवजातांना वाचवण्याची मोहीम
भारतातील तमिळनाडू हे पहिले राज्य आहे, जिथे सर्वात आधी फेकलेल्या बालकांना वाचवण्याची मोहीम सुरू झाली. 1991 मध्ये जेव्हा जयललिता मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांची पहिली योजना क्रेडल बेबी स्किम हीच होती.
याचा उद्देश होता महिला भ्रूणहत्या आणि गर्भपात कमी करणे. युरोपातील देशांप्रमाणे पाळण्यात आढळणाऱ्या बालकांची देखरेख आणि त्यांना दत्तक घेण्याची जबाबदारी राज्याची आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, योजना सुरू झाल्याच्या 25 वर्षांनंतर तमिळनाडूत पाच हजारहून अधिक बालकांना क्रेडल बेबी स्किमद्वारे वाचवले गेले आहे. यात चार हजारहून अधिक मुली आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे क्रेडल बेबी रिसेप्शन सेंटर
केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात क्रेडल बेबी रिसेप्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. ज्याची संपूर्ण जबाबदारी एसएएवर असते. ही एजन्सी सरकारी असू शकते किंवा एखादा एनजीओही ती चालवू शकतो. जिल्ह्यात गर्दीची ठिकाणे जसे बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालयाबाहेर क्रेडल पॉईन्टस बनवले जातात. जेव्हा यात एखादे बालक सोडले जाते तेव्हा अलार्म वाजू लागतो.
पाळणा स्थळी बालक आल्यावर काय होते -
फेकू नका आम्हाला द्या, पाळण्यात सोडून द्या
राजस्थानसह देशाच्या वेगवेगळ्या भागात पाळणा स्थळ सुरू करणाऱ्या महेशाश्रमचे संस्थापक योगगुरू देवेंद्र अग्रवाल फेकलेल्या बालकांचे प्राण वाचवण्यात गुंतले आहेत. ते म्हणतात झुडुपांत फेकलेल्या नवजातांविषयी ऐकायचो, पाहायचो तेव्हा मन हळहळायचे. तेव्हा 2007 मधअये मी एक मोहीम सुरू केली. 'फेकू नका आम्हाला द्या, ओळख न सांगता पाळण्यात सोडून द्या.' आम्ही उदयपूरमध्ये पाळणा स्थळ बनवले जिथे कोणतीही महिला आपली ओळख न सांगता नवजाताला सोडू शकते. पहिल्याच महिन्यात आम्हाला तीन बालके मिळाली. तेव्हापासून ते आतापर्यंत शेकडो बालके पाळण्यात आली आहेत.
क्रेडल रिसेप्शन सेंटरमध्ये पाळणा कसा असतो आणि तो कसे काम करतो, हे ग्राफिक्समधून बघूया.
कचराकुंडीत आढळलेली 99% बालके वाचू शकत नाही
देवेंद्र अग्रवाल सांगतात की, कचराकुंडी किंवा झुडुंबात आढळलेल्या बालकांना वाचवणे खूप कठीण असते. त्यांच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. ते प्रयागराजचे उदाहरण देतात की गेल्या 2 वर्षांत 29 नवजात कचराकुंडीत आढळले आहेत. यात 21 बालिका होत्या. वर्ष 2020 आणि 21 मध्येही सुमारे इतकीच बालके कचराकुंडीत आढळली. यापैकी एक-दोघांनाच वाचवले जाऊ शकले.
देवेंद्र सांगतात की ही तर ती संख्या आहे जी अधिकृत आहे वास्तविक संख्या यापेक्षाही जास्त आहे. अशीच स्थिती उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या जिल्ह्यांतही आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच नव्हे तर जवळपास पूर्ण देशात कमीअधिक अशीच स्थिती आहे.
पाळणा स्थळात मिळालेल्या बालकांना मिळते जीवन
सूरतचे उदाहरण देताना देवेंद्र सांगतात की तिथे 5 वर्षांत 120 नवजात कचराकुंडीत आढळले आहेत. यापैकी 99% ना वाचवले जाऊ शकले नाही. तर पाळणा स्थळ किंवा बेबी हॅचेसमध्ये त्यागलेली बालके वाचवली जातात.
देशाच्या अनेक राज्यांत क्रेडल बेबी स्कीम चालवली जात आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांत 16 नवजातांना पाळणा स्थळावर सोडले गेले. ही सर्व बालके सुरक्षित आहेत. तर राजसमंदमध्येच 6 बालके जंगल, झुडुपे किंवा दुसऱ्या असुरक्षित ठिकाणी फेकली गेली. यापैकी एकालाही वाचवले जाऊ शकले नाही.
फेकलेल्या बालकांतील 70% मुली
आर्थिकदृष्ट्या मागास राज्यांतच नव्हे, तर विकसित राज्यांतही बालकांना फेकण्याचा ट्रेंड सारखाच आहे. हायटेक सिटी हैदराबादेत 2022 मध्ये अशी 92 बालके मिळाली आहेत. ज्यातील 52 मुली होत्या. सर्व 92 बालकांपैकी 66 बालकांचे वय 0 ते 2 वर्षांदरम्यान होते. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात अशा प्रकारे नवजात फेकण्याच्या घटना समोर येतात. या राज्यांतही क्रेडल बेबी स्कीम स्वीकारली गेली आहे.
भ्रूणहत्या, नवजातांना फेकल्यास नुकसान झाल्यास शिक्षेची काय तरतूद होती, चला जाणून घेऊया.
पाळणा घरात आलेली बालके दत्तक घेतली जात आहेत
पाळणा स्थळांत मिळालेली बालके पाळणा घरांत पाठवली जातात. तथापि गेल्या 12 वर्षांचा डेटा बघितला तर बालके दत्तक घेणे कमी झाले आहे. केंद्रिय दत्तक संसाधन प्राधिकरणानुसार, 2021-22 मध्ये 2991 बालके दत्तक घेतली गेली. यापैकी 1293 मुले आणि 1698 मुली आहेत. विशेष म्हणजे यापैकी 414 बालके परदेशी दाम्पत्यांनी दत्तक घेतली आहेत.
जाता-जाता...
पाळणा घरात तीन ते सहा महिन्यांपर्यंतची बालके ठेवली जातात. जिथे ती दत्तक घेतली जातात. याची प्रक्रिया केंद्रिय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडून पूर्ण केली जाते. जर एखादे बालक योग्य कालावधीत दत्तक घेतले गेले नाही तर त्यांना शिशूगृहात पाठवले जाते. जिथे ते सहा वर्षांची होईपर्यंत राहतात. या शिशू गृहांमध्ये बालकांच्या देखरेखीची सर्व जबाबदारी सरकारवर असते. सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बालकांना 18 वर्षांची होईपर्यंत बालक वा बालिका गृहात ठेवले जाते. इंटिग्रेटेड चाईल्ड प्रोटेक्टेड स्कीम जिला आता वात्सल्य योजना म्हटले जाते, यानुसार बालकांचे शिक्षण, कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. सज्ञान झाल्यावर या बालकांना तिथून बाहेरच्या जगात सोडले जाते.
ग्राफिक्सः सत्यम परिडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.