आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Maharashtra Rajasthan Madhya Pradesh (Oxygen) Cylinder Shortage; Why Railways To Run Oxygen Express Trains? Haryana Maharashtra Coronavirus Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:रेल्वेला ऑक्सिजन एक्सप्रेस का सुरु करावी लागली? जाणून घ्या ऑक्सिजनची वाढती मागणी केंद्र सरकार कशी पूर्ण करत आहे?

24 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घेऊया अचानक ऑक्सिजनची मागणी का वाढली? यासह बरंच काही...

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने रौद्र रुप घेतले आहे. कोरोनामुळे दररोजची रुग्ण संख्या आणि मृत्यूचे आकडे नवीन विक्रम नोंदवत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी आणि वापर अनेक पटींनी वाढला आहे. यामुळे काही राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचे वृत्त येत आहे. मध्य प्रदेशात वेगवेगळ्या घटनांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुमारे 25 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही कोरोना रूग्णांना ऑक्सिजन पुरवणे कठीण होत आहे.

राज्यांना ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे आणि किती मिळत आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार काय व्यवस्था करीत आहे हे जाणून घेऊया...

 • सर्व प्रथम, जाणून घेऊया अचानक ऑक्सिजनची मागणी का वाढली?

6 एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांत अडीच लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूची लागण झालेल्या सक्रिय रूग्णांची संख्याही 20 लाखांच्या पुढे गेली आहे. पहिल्यापेक्षा दुसरी लाट जास्त घातक आहे. अधिक रूग्णांना ऑक्सिजन आणि इतर उपायांची आवश्यकता आहे. यामुळे अधिक लोकांना ऑक्सिजनची गरज भासत असते.

ऑक्सिजन देण्यासाठी केंद्राची तयारी काय आहे?

 • केंद्राने यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय रेल्वेने ऑक्सिन वाहून नेण्यासाठी "ऑक्सिजन एक्सप्रेस" नावाने ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता रेल्वे लवकरात लवकर गंतव्यस्थानावर पोहोचू शकेल. 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातून रिक्त टँकर​​​​​​​ घेऊन जाणा-या विशेष गाड्या विशाखापट्टणम, बोकारो आणि राउरकेला येथे गेल्या, तेथून या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले गेले. यासाठी विशाखापट्टणम, अंगुल आणि भिलाई​​​​​​​ येथे विशेष रॅम्प तयार करण्यात आले आहेत जेणेकरुन रेल्वेच्या फ्लॅट डब्यात ऑक्सिजन टँकर बसवता येतील.
 • या व्यतिरिक्त, सर्वाधिक रुग्ण असलेल्या 12 राज्यांना केंद्र 6,177 मेट्रिक टन ऑक्सिजन देईल. या राज्यांत यापुढे ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. 30 एप्रिलपर्यंत या 12 राज्यांना 17 हजार टन पेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवण्याची केंद्राची योजना आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब,​​​​​​​ हरियाणा आणि राजस्थान यांचा समावेश आहे.
 • गृह मंत्रालयाने 22 एप्रिलपासून उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्यावर बंदी घातली आहे. पण फार्मा, पेट्रोलियम, पाणी आणि अन्न उद्योगांसह 9 उद्योगांवर बंदी घातली जाणार नाही. या व्यतिरिक्त सरकारने इतर सर्व उद्योगांना ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
 • आरोग्य मंत्रालयाने 100 रूग्णालयांची निवड करुन तेथे ऑक्सिजन उत्पादनासाठी Pressure Swing Adsorption प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या प्लांटच्या​​​​​​​ मदतीने ही रुग्णालये रुग्णांसाठी स्वतः ऑक्सिजनची निर्मिती करतील. पीएम केअर्स फंड अंतर्गत अशा 162 प्लांटवर काम सुरू आहे.

सध्या किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे?

 • इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) - महाराष्ट्र प्रमुख अविनाश भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार, एकूण रुग्णांपैकी 10% रुग्णांना ऑक्सिजन गरज भासत आहे. सद्यपरिस्थितीत 20 लाख रुग्णांपैकी सरासरी सुमारे 2 लाख लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे.
 • प्रत्येक राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येनुसार ऑक्सिजनची वेगळी आवश्यकता असते. तज्ज्ञांचे दावे मात्र वेगळे आहेत. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सक्रिय रुग्णांमध्ये 60-70 टक्के रुग्ण असे आहेत, ज्यांच्या फुफ्फुसांवर संसर्गामुळे परिणाम झाला आहे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी कुठे येत आहेत

 • सिलिंडरचा अभाव: विशिष्ट टँकरमध्ये विशिष्ट तापमानात वैद्यकीय ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठविला जातो. उत्पादनानंतर हे ऑक्सिजन द्र रुपात टँकरमध्ये​​​​​​​ भरले जाते. रुग्णालयात या द्रव ऑक्सिजनचे पुन्हा गॅसमध्ये रुपांतर होते. संपूर्ण प्रक्रियेसाठी जंबो आणि ड्युरा सिलिंडर्सची आवश्यकता असते, सध्या त्याची कमतरता आहे.
 • टँकरमधून सप्लायचा वेळः टँकरमधून राज्यांना ऑक्सिजन पुरविला जातो. याचा अर्थ म्हणजे, जितके जास्त अंतर असेल, तेवढा जास्त वेळ टँकरला प्लांटवर पोहण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी लागेल.
 • संसाधनांची कमतरता : छोट्या नर्सिंग होम किंवा हॉस्पिटल ज्यांना कोविड सेंटरमध्ये रूपांतरित केले गेले आहे त्यांच्याकडे ऑक्सिजन साठवण्यासाठी आवश्यक स्त्रोत नाहीत. यामुळे, ही केंद्रे टँकरमधून दररोजच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर अवलंबून आहेत.

नवीन ऑक्सिजन प्लांट या समस्येचे निराकरण करु शकतात का?

 • केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात दररोज 7127 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, ऑक्सिजन उत्पादनासाठी नवीन प्लांट निर्माण करण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागू शकतात. खर्चही फार मोठा असेल. सध्या या पर्यायाचा विचार करता येणार नाही.

स्टील कंपन्या आल्या पुढे, ऑक्सिजनचा करत आहेत पुरवठा

 • रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन कमी होताच सरकारने उद्योगांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) आपल्या 5 स्टील​​​​​​​ प्लांट्समधून 35 हजार टन 99.7 टक्के शुद्ध लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. सेलने गेल्या पाच दिवसांत दररोज 600 टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिले आहे. हे भारतातील उद्योगातून आलेले सर्वात मोठे प्रमाण आहे.
 • या व्यतिरिक्त टाटा स्टील आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएमएनएस इंडिया) ने कोविडच्या उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. हा पुरवठा राज्य सरकार व​​​​​​​ रुग्णालयास दिला जात आहे. कोविड -19 च्या रुग्णांच्या उपचारांसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन म्हणजे एलएमओ खूप महत्वाचा आहे.
 • टाटा समूहाची स्टील कंपनी टाटा स्टीलने रविवारी सांगितले की, देशाची गरज लक्षात घेऊन आम्ही ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही दररोज 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवतो आहोत. हा पुरवठा विविध राज्य सरकारे व रुग्णालयांमध्ये केला जात आहे. कंपनी म्हणाली की आम्ही या लढ्यात एकजूट आहोत आणि त्यात नक्कीच विजयी होऊ.
 • आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएमएनएस इंडिया)ने म्हटले आहे की, ते दररोज 200 टन मेडिकल ऑक्सिजन पुरवतात. हे ऑक्सिजन गुजरातच्या आरोग्य संस्थांना दिले जात आहे. AMNS इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ओमान यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून सर्व एजन्सीसह उभे आहोत.
 • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने कोविडचा सामाना करत असलेल्या महाराष्ट्राला 100 टन ऑक्सिजन विनाशुल्क देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील इंदूरला 60 टन ऑक्सिजन पाठविण्यात आले आहे. रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमधून हा ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. जामनगर रिफायनरीमधून अन्य राज्यांतही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...