आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सकलुझिव:आता फक्त 2200 रूपयात कोराेना चाचणी; दिव्य मराठीच्या दणक्यानंतर आराेग्यमंत्र्यांनी निम्म्याहून कमी केले दर

नाशिक (भूषण महाले)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याहून कमी हाेणार दर; 1700 रूपयापर्यंत खर्च आणण्यासाठी प्रयत्न - टाेपे

कोविड 19 अर्थातच कोराेनाच्यापार्श्वभुमीवर खासगी लॅबने 4500 हजाराहून तर दाेन हजारापर्यंत प्रति चाचणीसाठी दर आकारणीसाठी थाटलेल्या बाजाराचा दिव्य मराठीने 2 जून राेजी पर्दाफाश केल्यानंतर राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी अवघ्या 13 दिवसात तज्ञांची समिती नेमून अहवाल घेत कोराेना चाचणीचे दर निम्म्याहून अधिक घटवले. पुर्वी साडे हजार ते पाच हजार रूपयात हाेणारी चाचणीचे अप्पर लिमीट आता 2200 रूपये इतके आहे. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये आकारणी हाेणार आहे. दिव्य मराठीशी खास बाेलताना टाेपे यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना अधिकार देवून खासगी लॅबशी स्थानिकपातळीवर चर्चा करून प्रति केराेना चाचणीचे दर 1700 ते 1800 रूपयापर्यंत आणण्याचा प्रयत्न असल्याच स्पष्ट केले. दिव्य मराठीच्या दणक्यानंतर केराेना चाचणीसाठी सर्वात कमी दर निश्चित करणारे देशातील एकमेव महाराष्ट्र राज्य ठरणार आहे. 

2 जून राेजी दिव्य मराठीने केराेना चाचणीचा खासगी बाजार या मथळ्याखाली स्टींग आॅपरेशन करून खासगी लॅबकडून प्रति चाचणीसाठी कशापद्धतीने दर आकारणीची मनमानी केली जाते याचा भांडाफाेड केला हाेता. केंद्र शासनाने 4500 रूपयापेक्षा अधिक पैसे प्रतिचाचणीमागे घेवू नका असे सांगितले असले तरी, मुळात त्यावेळी चाचणीसाठी आवश्यक किट हे परदेशातून येत असल्यामुळे दर अधिक हाेता. त्यात काही लॅब तर दाेन हजारापर्यंत चाचणी करून देण्यास तयार असल्यामुळे दर तफावत व कमिशन खाेरीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आराेग्यमंत्री टाेपे यांनी गंभीर दखल घेतली हाेती. ज्या दिवशी वृत्त प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी अर्थातच 2 जून राेजी टाेपे यांच्या आदेशाानुसार  आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार जेथे 4500 रूपये प्रतिचाचणीसाठी लागत हाेते तेथेच आता 2200 रूपये आकारणी हाेणार आहे. यासंदर्भात मुंबईत घाेषणा करताना आराेग्यमंत्री  टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला तर 5200 रुपये आकारले जात होते. मात्र समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त 2200 रुपये आकारले जातील तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नाही. 

1700 रूपयापर्यंत खर्च आणण्यासाठी प्रयत्न - राजेश टाेपे

> दिव्य मराठीने हा विषय मांडल्यानंतर कमी कालावधीत दर कसे कमी केले?

उत्तर: निश्चितच तुम्ही गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. हातात खूप कमी कालावधी होता. प्रश्न गंभीर होता तातडीने समिती नेमून कमीत कमी अर्थातच पूर्वीपेक्षा 50% दर कमी केले.

> देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत हे दर सर्वात कमी आहेत का?

उत्तर: नक्कीच. पूर्वी साडेचार ते पाच हजार रुपये चाचणीसाठी लागत होते आता मात्र रुग्णालयातील चाचणीसाठी 2200 रुपये तर घरगुती चाचणीसाठी 2800 रुपये लागतील. अभिमानाने सांगू इच्छितो की देशातील सर्वात कमी केरोना चाचणीसाठी दर निश्चित करणारे महाराष्ट्र हे राज्य आहे.

> 2200 रुपये दर निश्चित आहे का? त्यापेक्षा कमी दर आकारणी होऊ शकेल.

उत्तर: या ठिकाणी तुम्ही निश्चित सांगू शकतात की बावीसशे रुपये हे अप्पर लिमिट आहे. खाजगी लॅबशी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त वाटाघाटी करून यापेक्षाही कमीत कमी दरामध्ये चाचण्या करू शकतात. साधारण सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत दर खाली येऊ शकतात.

> दर कमी करण्यासाठी नेमके काय केले.

उत्तर: पाच दिवसात आम्ही संबंधित चाचणीसाठी आवश्यक असलेले आरटीपीसीआर किट, पीपीइ किट, विटीएम किट यांचे दर निश्चित करून चाचणी साठी लागणारे दर कमी केले. संबंधित चाचण्यांवर आकारला जाणारा व साहित्यावर आकारला जाणारा जीएसटी सारख्या करही कमी करण्याचा प्रयत्न केला.

> नागरिकांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? 

उत्तर: केरोना चाचणीसाठी साडेचार ते पाच हजार रुपये दर हे निश्चितच खूप होते. आता संबधित दर आपण निम्म्यापेक्षा कमी केले असून आता प्रत्येक जण चाचणी करून सुरक्षित राहू शकतो. बड्या इमारतीमधील रहिवासी तसेच मोठ्या अस्थापना उद्योग पल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षितेसाठी चाचणी करू इच्छित असेल तर त्यांना परवडण्याजोगे दर आहेत. गोरगरिबांना दिलासा देण्याच्या उद्देशातून परवडणारे दर जाहीर केले आहे.

हे हाेते समितीत 

2 जून रोजी चार सदस्यीय समितीची स्थापना केल्यानंतर  त्यात,  राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. 

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोराेना चाचणी

टाेपे यांनी सांगितले की, राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत 6 लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 01 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. 

यापेक्षा जास्त दर घेतले तर कारवाई..

हाॅस्पीटलने स्वॅब दिला तर 2200 रूपये आणि घरी जावून स्वॅब घेतला तर 2800 रूपये प्रतिचाचणीसाठी दर निश्चित केले. हातात कमी दिवस असताान विषयाचे गांर्भीय लक्षात घेत समितीने दर कमी केले. दर कमी करताना प्रतिचाचणीसाठी लागणारे मटेरियल, मॅन वाॅपर, किटस, ट्रान्सपाेर्ट, मशिनरी भांडवल या सर्वांचा विचार केला. कमी केलेल्या दरात 25 टक्के तरी प्राॅफीट आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा तर लॅबचे नुकसान नाही. ग्राहकांची गैरसाेय हाेणार नसून सरकारी लॅबची क्षमता वाढलेली आहे.यापेक्षा जास्त दराने चाचणी करणाऱ्या लॅबवर गंभीर कारवाई हाेईल. - सुधाकर शिंदे, सीईआे राज्य आराेग्य हमी सेवा साेसायटी तथा अध्यक्ष, काेविड चाचणी दर निश्चिती समिती.   

बातम्या आणखी आहेत...