आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77 वर्षे जुनी महिंद्रा अँड महिंद्रा:जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी; पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री होते संस्थापक

लेखक: आतिश कुमार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा अँड महिंद्रा... जीपपासून ते एअरव्हॅन बनवणारी कंपनी. जगातील सर्वात मोठी ट्रॅक्ट बनवणारी कंपनी, जिने एसयुव्हीच्या रुपात बोलेरो आणि स्कॉर्पिओ दिली. स्टील ट्रेडिंगपासून सुरु झालेली कंपनी आज ऑटोमोटिव्हपासून बँक आणि एअरोस्पेसारख्या क्षेत्रात विस्तारली आहे. आज या कंपनीची सूत्रे आनंद महिंद्रांच्या हातात आहेत आणि त्यांच्या काही ट्विटसमुळे कंपनी चर्चेत आहे. आज मेगा एम्पायरमध्ये जाणून घेऊया महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कहाणी जिचे नाव आधी महिंद्रा अँड मोहम्मद होते.

स्वातंत्र्यापूर्वी महिंद्रा अँड मोहम्मद नावाने कंपनी सुरु झाली

देश स्वातंत्र्याचा लढा देत होता, तेव्हा केसी महिंद्रा, जेसी महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांनी महिंद्रा अँड मोहम्मद नावाने कंपनी सुरु केली. 2 ऑक्टोबर 1945 मध्ये पंजाबच्या लुधियानात एक स्टील ट्रेडिंग कंपनीच्या रुपात याची सुरुवात झाली. जेसी महिंद्रा नेहरू आणि गांधींच्या विचारांनी प्रभावित होते. हेच कारण होते की कंपनीत गुलाम मोहम्मद यांची छोटी भागीदारी असूनही त्यांनी त्यांचे नाव कंपनीच्या संस्थापकांत सामील केले. जेणेकरून देशातील लोकांमध्ये एकतेचा संदेश जाईल.

फाळणीने महिंद्रा अँड मोहम्मदला बनवले महिंद्रा अँड महिंद्रा

देशाची फाळणी झाल्यानंतर गुलाम मोहम्मद यांनी कंपनीऐवजी पाकिस्तानची निवड केली आणि ते पाकिस्तानला निघून गेले. तिथे त्यांना पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री म्हणून निवडले गेले. पुढे 1951 मध्ये ते पाकिस्तानचे गव्हर्नरही राहिले. इकडे गुलाम निघून गेल्यानंतर कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम झाला. कंपनीच्या नावाविषयी खूप चर्चा झाल्या. कारण कंपनीच्या सर्व स्टेशनरी एम अँड एम नावाने छापल्या जात होत्या. अशात दुसरे नाव दिल्यास कंपनीला नुकसान होण्याची शक्यता होती. अखेरिस जेसी महिंद्रांनी कल्पनाशक्तीने एम अँड एम टॅग कायम ठेवत याचे नाव महिंद्रा अँड मोहम्मदवरून महिंद्रा अँड महिंद्रा केले.

जीपने सुरु झाली महिंद्राच्या यशाची कहाणी

स्वातंत्र्यानंतर स्टील व्यवसायातून महिंद्रांना तितका नफा मिळताना दिसत नव्हता. यादरम्यान महायुद्ध संपल्याने अमेरिकेची कंपनी विलीस ओव्हरलँड कॉर्पोरेशनच्या जीपची मागणी घटली होती. विलीने उरलेल्या गाड्या सामान्यांना विकायला सुरुवात केली. ही संधी पाहून महिंद्रा अमेरिकेत गेले. त्यांनी विलीची जीप भारतात आयात करण्याचा करार केला. 1949 मध्ये महिंद्रा या जीपची भारतात आयात करून विकायला लागली. नंतर 1959 मध्ये महिंद्रांनी विलींसह एक आणखी करार केला आणि भारतातच जीप बनवण्याचा परवाना घेतला. यामुळे भारतात याची किंमत कमी झाली. तेव्हा भारताच्या 25% कार मार्केटवर याचा कब्जा झाला होता.

शेअर बाजारात उतरल्यानंतर ट्रॅक्टर बनवायला केली सुरुवात

महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 15 जून 1955 मध्ये पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमद्ये लिस्ट झाले. शेअर्सच्या विक्रीतून कंपनीचे भांडवल वाढल्यानंतर त्यांनी व्यवसाय विस्ताराचा निर्णय घेतला. जीपच्या यशानंतर महिंद्राने अमेरिकेच्या इंटरनॅशनल हार्वेस्टर कंपनीच्या सोबतीने ट्रॅक्टर बनवण्याचे काम सुरु केले. ट्रॅक्टरसोबत कंपनीने शेतात वापरली जाणारी यंत्रे, उपकरणे बनवणे सुरु केले. ट्रॅक्टर निर्मिती सुरु केल्यानंतर 20 वर्षांच्या आतच 1983 मध्ये महिंद्रां जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी बनली. आज महिंद्राचे ट्रॅक्टर जगातील 50 हून अधिक देशांत विकले जातात. गेल्या तीन दशकांपासून महिंद्रा टॉप ट्रॅक्टर कंपनी म्हणून कायम आहे.

ट्रॅक्टरच्या यशानंतर एसयुव्ही बनवणे सुरु केले

ट्रॅक्टरने महिंद्राचे नाव घराघरात पोहोचवले. यानंतर 1990 च्या अखेरपर्यंत महिंद्रांनी देशाच्या लोकांना मॉडर्न एसयुव्ही कार देण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतीय बाजारात मारुती आणि हंडैच्या कार्सची चलती होती आणि एसयुव्ही जास्त प्रचलित नव्हती. 2000 मध्ये बोलेरो आधुनिक डिझाईन आणि फीचर्ससह लॉन्च करण्यात आली. देशात मोठ्या कारचे स्वप्न पाहणाऱ्यांची ही पहिली पसंत बनली. आजही महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये बोलेरो सर्वात वर आहे.

रस्त्यांवरून आकाशातही कंपनीची भरारी

महिंद्राचा व्यवसाय केवळ जीप, ट्रॅक्टर किंवा एसयुव्हीपर्यंतच मर्यादित राहिला नाही. डिसेंबर 2009 मध्ये महिंद्राने एअरव्हॅन बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपन्यांमध्ये हिस्सेदारी खरेदी केली. आज ऑस्ट्रेलियात कंपनीच्या 200 हून अधिक एअरव्हॅन सेवेत आहेत. या जंगलात आग विझवण्यासह, लोकांना आणि जनावरांना वाचवण्याचे काम करतात. अनेक लोक याला आकाशातील एसयुव्ही म्हणतात.

देशाला मिळाली पहिली इलेक्ट्रिक कार

सध्या महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारविषयी अनेक महत्वाकांक्षा आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारचा प्रवास त्यांनी एक दशकापूर्वीच रेवा इलेक्ट्रिक कारसह सुरु केला होता. रेवा इलेक्ट्रिक कार कंपनीची स्थापना 1994 मध्ये चेतन मैनी यांनी केली होती. 2001 मध्ये रेवा लॉन्च करण्यात आली होती आणि ती काळाच्या खूप पुढे होती. मे 2010 मध्ये रेवा इलेक्ट्रिक कार कंपनी महिंद्राने अधिग्रहित केली. त्यानंतर 26 देशांमध्ये याची विक्री करण्यात आली. मात्र चार्जिंगच्या अडचणी आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे बाजारात विक्री कमी असल्याने ती बंद करण्यात आली. सध्या महिंद्रा नव्या इलेक्ट्रिक मॉडेलवर काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...